राहुल नवले यांना राज्यस्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार प्रदान

सजग वेब टीम, जुन्नर
नारायणगाव | ग्रामोन्नती मंडळाचे गुरूवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरातील क्रीडा शिक्षक राहुल सर्जेराव नवले यांना 2019-20 या वर्षाचा महाराष्ट्र राज्य कृती समितीतर्फे विशेष शैक्षणिक कार्याबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय ‘ कृतीशील शिक्षक पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला.
पंढरपूर येथील श्री.विठ्ठल रूक्मिणी पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देवून श्री.नवले यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक महेंद्र कदम,उद्योगपती गिरीष घाटे,कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बाबा पाटील,सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलावडे,पुणे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष कल्याणराव बरडे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक समाधान घाडगे,सुनिल वाव्हळ इ.मान्यवर उपस्थित होते.
राहुल नवले हे सबनीस विद्यालयात 20 वर्षे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या मार्गदर्शना खाली अनेक विद्यार्थ्यांची राज्य व राष्ट्रिय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे.राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत त्यांनी पंच म्हणून कामगिरी केली आहे.विद्यामंदिरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणा-या विद्यार्थी दत्तक पालक योजनेचे ते प्रमुख म्हणून कार्य करतात.मुलांना मोफत गणवेष , शैक्षणिक साहित्य वाटप,दत्तक विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शैक्षणिक खर्च दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने उपलब्ध करणे,विविध आरोग्य शिबिरांचे,क्रीडास्पर्धांचे आयोजन करणे इ.विशेष शैक्षणिक कार्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहीती जुन्नर तालुका कृती समितीचे अध्यक्ष सुनिल वाव्हळ यांनी दिली.
ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे,कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर ,कार्यवाह रवींद्र पारगावकर,क्रीडा प्रमुख सुजीत खैरे, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले ,शिक्षक प्रतिनिधी विजय कापरे यांनी श्री.नवले यांचे अभिनंदन केले.

Read more...
Open chat