खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचा गैरवापर – खा. आढळराव पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

राजगुरुनगर – खेड तालुक्यातील कनेरसर येथील यमाई देवी देवस्थानला भेट देणाऱ्या भाविक भक्तांसाठी खासदार निधितून मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या सांस्कुतिक सभामंडपाचे मंगल कार्यालय करून त्याद्वारे व्यवसाय सुरू केल्याचा गंभीर प्रकार देवस्थानचे विश्वस्त मोहन दौंडकर यांनी केला आहे. या प्रकरणाची खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दखल घेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली आहे.

कनेरसर येथील यमाई देवीच्या उत्सव काळात राज्यभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या खासदार निधीतून सात ते आठ वर्षापुर्वी या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आले होते.परंतु गेल्या काही महिन्यांपासून येमाई देवस्थानचे विश्वस्त मोहन दौंडकर यांनी “खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून” असा उल्लेख असलेला नाम फलक कुठल्याही परवानगशिवाय काढून टाकला असून त्या जागी “श्री कुलस्वामिनी गार्डन मंगल कार्यालय” असा फलक लावून सांस्कृतिक व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. या बाबत खासदार आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोर राम यांच्याकडे तक्रार केली आहे.

शासकीय निधीतून बांधलेल्या सभागृहाचा वापर व्यवसायासाठी करणे हा नियमभंग आहे. त्यामुळे नियमभंग केलेल्या विश्वस्त मोहन दौंडकर यांच्या वर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मंगल कार्यालयाचा नामफलक हटवून तिथे खासदार स्थानिक विकास निधीचा असा नामफलक पुन्हा लावण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही दिवसापासून यमाई देवस्थानच्या गैरव्यवहार प्रकरणी वाद विवाद चालू असतानाच देवस्थानचे विश्वस्त मोहन दौंडकर यांच्याविरुद्ध आढळराव पाटील यांनी केलेल्या तक्रार यासंदर्भात आता जिल्हाधिकारी संबंधितावर कुठली कारवाई करणार हीच चर्चा खेड तालुक्यात आहे.

Read more...

अष्टविनायक रस्ते विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते – आढळराव पाटील

संतोष पाचपुते, आंबेगाव ( सजग वेब टीम)

पारगाव | अष्टविनायक रस्ते जोडणी कामांचा भूमीपूजन समारंभ दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहुर्तावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

खासदार आढळराव पाटील म्हणाले कि, युती सरकार सत्तेवर आल्यानंतर आपण केंद्राच्या भारतमाला रस्ते जोडणी प्रकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायकाचे दर्शन एक दिवसात करता यावे यासाठी अष्टविनायक मार्ग किमान दुपदरी व्हावा अशी आपण मुख्यमंत्र्यांसह बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. ८ मार्च २०१५, ३ एप्रिल २०१५, १६ ऑक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रव्यवहार करून व समक्ष भेट घेऊन अष्टविनायक जोडणी प्रकल्प मंजूर करावा यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबत मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री यांनी पुणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता यांना याबाबतचा आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते. प्रस्ताव लवकरात लवकर सादर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनाही पत्र्यवहार व बैठकीद्वारे पाठपुरावा केला होता. तसेच हा रस्ता ज्या भागातून जातो त्या भागातील लोकप्रतिनिधींनी देखील या कामासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्यांचेदखील अभिनंदन करतो. शिवजयंतीच्या निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री शिवनेरी गडावर येत असून या शुभमुहूर्तावर राज्य शासनाच्या हायड्रेड अॅन्युयिटी अंतर्गत मंजूरी मिळालेल्या २८१.१३ किमी लांबीच्या ८३५.८० कोटी रकमेच्या प्रकल्पाचा भूमीपूजन समांरभ आयोजित केला आहे. या समारंभास महाराष्ट्र शासनाचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शिरूर-आंबेगाव-जुन्नर तालुक्यातील रामा १२८ – रांजणगाव- मलठण – खडकवाडी- नारायणगाव- ओझर- ओतूर रस्ता ७३ किमी, जुन्नर तालुक्यातील प्रजिमा २- बनकरफाटा ते लेण्याद्री ११.५० किमी, प्रजिमा ३५-लेण्याद्री ते ओझर १० किमी, लेण्याद्री फाटा-पिंपळगाव सिध्दनाथ- गणेशखिड- सितेवाडी रामा २२२ रस्ता १३ किमी, शिरूर तालुक्यातील प्रजिमा ४०- तांदळी-इनामगाव रस्ता ६ किमी, रामा ११८- न्हावरा-कर्पेवाडी रोड १० किमी, प्रजिमा १०० कर्पेवाडी-रांजणगाव रस्ता ९ किमी या रस्त्याचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. युती शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प मंजूर झाल्याने या भागातील रस्ते मजबूत होऊन दळणवळणासाठी मोठी चालना मिळू शकेल.

याशिवाय किल्ले शिवनेरी अबारखाना संग्रहालय व जुन्नर नगरपरिषदेच्या माध्यमातून होमारे जिजामाता उद्यानातील संग्रहालयाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यानी सांगितले.

Read more...
Open chat