खरपुडी येथील खंडोबा मंदिर परिसरात गावठी दारूविक्री

 

खरपुडी येथील खंडोबा मंदिर परिसरात गावठी दारूविक्री

सजग वेब टीम, बाबाजी पवळे – राजगुरूनगर

राजगुरुनगर- खेड तालुक्याच्या पुर्व भागात खुलेआम गावठी दारूचे धंदे सुरू असून अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी वहावत चालली आहे.या अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे…

खेड  तालुक्यापुर्व भागातील खरपुडी,दावडी, निमगाव या परिसरात गावठी दारूचे धंदे सुरू असून हा धंदा राजरोस व निर्भयपणे सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्‍यातील ,गोसासी, रेटवडी, कनेरसर परिसरात दारूधंदे राजरोसपणे संबंधितांकडून चालवले जातात.त्यामुळे या अवैध धंद्यांना रोखणार तरी कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गावठी दारू धंद्यांवर कारवाई व्हावी, गावठी दारू तयार होऊच नये, गावठी दारूधंदे बंद करणे व ते पून्हा सुरु होणार नाहीत. बेकायदेशीर दारू उत्पादन व विक्री होऊ नये, ही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असल्याने याकडे उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देणे गरजेचे असते. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांची मदत घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. सरकारमान्य देशी दारुची दुकाने सकाळी दहा नंतरच उघडली जातात. मात्र गावठी दारू पहाटेपासूनच सर्वत्र उपलब्ध होते. त्यांच्यावर वेळेचे बंधन व अंकुश नाही. या धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली. मात्र गावठी दारूचा धंदा बंद होणे गरजेचे असताना देखील राजरोसपणे गावठीची विक्री सुरु आहे. पुर्व भागात ठिकठिकाणी अवैध धंदे बोकाळले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्थ होऊ लागले आहेत. हे धंदे बंद करण्याची मागणी होत आहे. हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच या परिसरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत.

तसेच या परिसरात गुन्हेगारी घटना घडत आहेत खरपुडी खुर्द (ता खेड ) येथे दोन दिवसांपुर्वी गावठी दारूचा धंदा सुरू करण्यात आला आहे.या ठिकाणी खड्डा घेऊन गावठी दारू रापण्यास ठेवली आहे.. या परिसरात गावठी दारुचा वास सुटला आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची ग्रामस्थ मागणी करत आहेत

Read more...
Open chat