बाळासाहेब औटी यांची आमदार अतुल बेनके घेणार भेट; उपोषण मागे घेण्यासंदर्भात करणार चर्चा

बाळासाहेब औटी यांची आमदार अतुल बेनके घेणार भेट; उपोषण मागे घेण्यासंदर्भात करणार चर्चा

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी हे वाढीव वीजबिले, कृषीपंप बिले आणि ऊर्जा विभागासंदर्भातील विविध मागण्यांसाठी राजुरी याठिकाणी आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला शेतकरी वर्गाचा आणि सामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान शासनाने दोन दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशाराही उपोषणकर्ते औटी यांनी दिला आहे.

आमदार अतुल बेनके यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही मंत्र्यांनी चर्चेदरम्यान उपोषणातील मागण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे. उद्या आमदार बेनके हे उपोषणस्थळी राजुरी याठिकाणी जाऊन औटी यांच्याशी उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat