नारायणगाव कोविड सेंटरमधून ४९ वर्षाच्या महिलेची कोरोनावर मात

नारायणगाव कोविड सेंटरमधून ४९ वर्षाच्या महिलेची कोरोनावर मात

नारायणगाव कोविड सेंटरमधून पहिला रुग्ण कोरोनामुक्त डाॅक्टरांनी आनंद व्यक्त करत गुलाबपुष्प देऊन केले डिस्चार्ज

नारायणगाव | नारायणगाव कोविड सेंटरमधून वैष्णवधाम येथील ४९ वर्षाच्या महिला संजीवनी निवृत्ती पवार यांच्यावर ११ दिवस चांगल्या पद्धतीने उपचार करुन कोरोनामुक्त केले. आज नारायणगाव कोविड सेंटरमधील पहिल्या रुग्णाला ठणठणीत बरे करुन डाॅक्टरांच्यावतीने गुलाबपुष्प देऊन डिस्चार्ज करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये शासकीय डाॅक्टरांसह जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनचे खाजगी डाॅक्टरही याठिकाणी सेवा देत आहेत.

यानिमित्तानं पवार आजींनी खंबीरपणे कोरोनाला समोरे जा घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगत कोविड सेंटरचे डाॅक्टर, नर्सेस व सर्व कर्मचारी यांचे आभार मानले.

यानिमित्तानं डाॅ.प्रसाद शिंदे, डाॅ.योगेश आगम, डाॅ.मिलिंद घोरपडे, डाॅ.अभिजित काळे, डाॅ.शशांक, डाॅ.ऋषिकेश रासने, डाॅ.लहु खैरे, वाजगे सिस्टर, पाडेकर सिस्टर, राजवाडे सिस्टर, कुटे सिस्टर, काळे सिस्टर, क्षिरसागर सिस्टर यांसह ईतरही डाॅक्टर, नर्से व कर्मचारी उपस्थित होते.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat