‘मी टू’ प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासून बघावी: आदित्य ठाकरे
‘मी टू’ प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासली पाहिजे, असे मत शिवसेनेचे नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. जिथे महिलांसोबत लैंगिक गैरवर्तनाचे प्रकार होतात तिथे तातडीने कारवाई झालीच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे हे मंगळवारी रात्री डोंबिवीलीतील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नवरात्रोत्सवात उपस्थित होते. या सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी टू’ मोहीम आणि एसएनडीटीमधील विद्यार्थिनिंनी महिला वॉर्डनवर केलेल्य आरोपांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. एसएनडीटीमधील घटनेचा दाखला देत आदित्य ठाकरे म्हणाले, हे प्रकार जिथे होतात तिथे कारवाई होणे गरजेचे आहे. मी टू ही मोहीम आत्ताच सुरु झाली आहे. आम्ही आणि अक्षय कुमार आधीपासूनच महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देत आहोत. अशा प्राध्यापकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. असे प्रकार पुन्हा घडणार नाही याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘मी टू’सारख्या घटना आमच्याकडेही येत असतात. पोलिसांनी अशा प्रकरणात दोन्ही बाजू तपासून बघितली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply