करणी सेना महाराष्ट्र राज्य मिडिया सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदी अतुलसिंह परदेशी यांची निवड
करणी सेना महाराष्ट्र राज्य मीडिया सेलच्या प्रदेश पदी अतुलसिंह परदेशी यांची निवड
सजग वेब टीम, जुन्नर
जुन्नर | करणी सेना महाराष्ट्र राज्य मीडिया सेलच्या प्रदेश अध्यक्ष पदी अतुलसिंह परदेशी यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुरजपाल सिंह अम्मूजी(राजपूत)व राष्ट्रीय सचिव संजयसिंह राणा , राष्ट्रीय उपाध्यक्ष मधूकर आप्पा साहेब ढोमसे (राजपूत) यांच्या उपस्थितीत २४ जुलै रोजी करण्यात आली. करणी सेना ही देशभरामध्ये देव देश धर्म यासाठी प्रमुख काम करीत आहे.
एक कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून करणी सेनेचे काम सर्वांना परिचित आहे अशा महाराष्ट्र राज्य करणी सेनेच्या इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया सेल च्या प्रदेश अध्यक्ष पदी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अतुलसिंह शैलेंद्रसिंह परदेशी यांची निवड करण्यात आली
महाराष्ट्र वरीष्ठ समिती पुढील प्रमाणे
कमेटी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- देविचंद सिंह बारवाल.
महाराष्ट्र प्रदेश महीला अध्यक्ष -संध्या ताई राजपूत
महाराष्ट्र वरीष्ठ प्रवक्ता-दिनेश सिंह जाधव (राजपूत )
महाराष्ट्र युवा शक्ति- अध्यक्ष-गिरीश सिंह परदेशी
शुरवीर महाराणा प्रताप तसेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे पालन करून राज्यातील हिंन्दू बांधवांच्या समस्या आणि संघटनसाठी राष्ट्रीय करणी सेना सदैव तत्पर असेल असे प्रतिपादन अतुलसिंह परदेशी यांनी केले.
Leave a Reply