Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
Editorial | Sajag Times

संभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास

संभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास 

सजग अतिथी संपादकीय

महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि वलय आहे. त्यांचा ज्वलंत इतिहास, शौर्य, पराक्रम, विचार लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात “शिवाजी” आणि “संभाजी” ही नावे कित्येक व्यक्ती, संस्था, नगर, गाव, रस्ते, उद्याने, बांधकामे, उद्योग, व्यवसाय, इत्यादिंना दिलेली पहायला मिळते. ही नावे देण्यामागे देणाऱ्यांचे प्रेम, आदर किंवा स्वार्थ यापैकी काहीही असु शकते. त्यामध्ये जरी महाराजांचा अवमान करण्याच्या किंवा नावाला कमीपणा आणण्याचा हेतू नसला तरी कालांतराने त्याबाबत वाद उपस्थित होतात हे आपल्याकडच्या अनेक घटनांमध्ये दिसून आले आहे.

सध्या महाराष्ट्रात “संभाजी बिडी”चा विषय चर्चेत आहे. बिडीसारख्या अंमली पदार्थाला “संभाजी” हे नाव देणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आहे, त्यामुळे बिडी उत्पादनाला दिलेले संभाजी महाराजांचे नाव बदलावे अशी शिवप्रेमींकडुन मागणी होत आहे आणि ती रास्त आहे.

बिडीच्या उत्पादनाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि बंडलावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र छापायला सुरुवात कुणी केली हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. कारण त्या काळामध्ये पुण्यातील “शिवाजी विडी वर्क्स”चे वल्लभभाई दलाभाई पटेल, “श्री शिवाजी मराठा विडी वर्क्स”चे जहागीरदार आणि “छत्रपती विडी वर्क्स”चे रघुनाथ साबळे या बिडी उत्पादकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि चित्र वापराच्या अधिकारावरुन अनेकदा एकमेकांसोबत वाद झाले होते आणि ते कोर्टकचेऱ्यांमध्येही गेले होते. परंतु इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चित्र तर इतिहाससंशोधक वा.सि.बेंद्रे यांनी १९३३ मध्ये शोधले आणि उजेडात आणले; त्यानंतरच महाराष्ट्राला शिवराय कसे दिसायचे हे समजले. त्यामुळे त्यापूर्वी जे बिडी उत्पादक शिवरायांचे चित्र हा आपलाच ट्रेडमार्क असल्याचे दावे करुन जो वाद घालत होते तो वाद किती निराधार होता हे स्पष्ट होते.

आज “संभाजी बिडी” वरुन जो वाद सुरु आहे त्याची सुरुवात रघुनाथ रामचंद्र साबळे यांच्यापासून होते. १९३२ मध्ये रघुनाथ साबळेंनी आपला विडी व्यवसाय सुरु केला. त्यांनी आपल्या बिडी उत्पादनाला “शिवाजी बिडी”, “छत्रपती बिडी” अशी नावे दिली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित झाल्यानंतर त्यांनी बिडी बंडलावर महाराजांचे चित्र छापले. महाराजांच्या नाव आणि चित्रामुळे त्यांचा व्यवसाय प्रचंड वाढीस लागला. त्यामुळे २५ नोव्हेंबर १९३८ रोजी त्यांनी आपल्या बिडी उत्पादनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि चित्र ट्रेडमार्क करुन घेतले.

१९४३ मध्ये रघुनाथ साबळे यांचे निधन झाले. पुढे त्यांचे पुत्र शंकर साबळे यांनी हा व्यवसाय आपल्या हातात घेतला आणि पुण्यात आपले वर्कशॉप सुरु केले. तेथे त्यांची ओळख तपकिर आणि तंबाखूचा व्यवसाय करणाऱ्या हरिभाऊ मारुती वाघिरे यांच्याशी झाली. १८ ऑक्टोबर १९४४ रोजी शंकर साबळे आणि हरिभाऊ वाघिरे यांनी भागदारीमध्ये “साबळे वाघिरे आणि कंपनी” सुरु केली.

१ सप्टेंबर १९५० पासुन भारतात “Emblems & Names (Prevention of Improper Use) Act 1950” हा कायदा लागू झाला. या कायद्याच्या कलम 9A मध्ये नोंद असणाऱ्या राष्ट्रीय प्रतीके आणि व्यक्तिमत्त्वांच्या नावाचा कॅलेंडर वगळता इतर ठिकाणी व्यावसायिक व व्यापारविषयक कारणांसाठी गैरवापर करता येणार नाही असे नमूद करण्यात आले. १६ मार्च १९६८ रोजी केंद्र सरकारने एक सुचनापत्र काढले, त्यानुसार या कायद्याच्या कलम 9A मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा समावेश केला आणि चित्रमय दर्शन हा शब्द जोडण्यात आला. तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि चित्र या दोन्हींच्या व्यावसायिक कारणासाठी होणाऱ्या गैरवापरावर बंदी आणण्यात आली.

व्यावसायिक कारण सांगुन साबळे वाघिरे आणि कंपनीने शिवाजी महाराज हे ट्रेडमार्क ३१ मार्च १९७२ पर्यंत वापरण्याची सरकारला परवानगी मागितली, पण सरकारने त्यांना ३१ मे १९६९ पर्यंतच हे ट्रेडमार्क वापरण्याची मुदत दिली. ही मुदत संपल्यानंतर जॉईंट रजिस्ट्रार ऑफ ट्रेडमार्क यांनी १६ ऑक्टोबर १९६९ रोजी एक नोटीस काढून Emblems & Names (Prevention of Improper Use) Act 1950 आणि Merchandise Marks Act, 1958 नुसार
साबळे वाघिरे आणि कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव व चित्र वापरायला बंदी घातली. त्यावर हरकती मागवल्या.

यावर साबळे वाघिरे आणि कंपनीने वेळ मागून घेतला आणि Emblems & Names (Prevention of Improper Use) Act 1950 कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आणि त्यातील तरतुदींना आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात रीट पिटीशन दाखल केली. तसेच १६ ऑक्टोबरच्या १९६९ च्या बंदीच्या नोटिसला आव्हान देऊन ही नोटीस रद्द करण्याची विनंती केली. २१ मार्च १९७५ रोजी सुप्रीम कोर्टाने आपला अंतिम निकाल देत साबळे वाघिरे आणि कंपनीची याचिका फेटाळून लावली आणि बंदीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे साबळे वाघिरे आणि कंपनीला कायद्यापुढे गुडघे टेकावे लागले आणि आपल्या बिडी उत्पादनावरुन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव व चित्र हटवावे लागले.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या बिडी उत्पादक कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांकडे आपला मोर्चा वळवला. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव व चित्र बिडीच्या बंडलावर छापून सर्रासपणे विक्री सुरु केली. तोपर्यंतच्या काळात इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांची रंगवलेली चुकीची प्रतिमाच प्रचलित असल्याने समाजातुन याविरुद्ध उठाव झाला नाही. हळूहळू संभाजी महाराजांच्या चरित्राचे संशोधन व्हायला लागले. खरा इतिहास समोर यायला लागला. तरुणांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण वाढायला लागले. लोक जागृत व्हायला लागले. एका निर्व्यसनी राजाच्या नावाने बिडीची विक्री चुकीची असल्याचे मत जनमानसांत बनू लागले.

२००३ च्या जेम्स लेन प्रकरणानंतर उघडपणे इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज व्यक्त व्हायला लागली. इतिहासकारांनी विविध आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केलेल्या संभाजी महाराजांवरील आरोप खोडून काढण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन व्हायला लागले. कधी नव्हे तो शिवप्रेमी वर्ग जागृत बनला. चुकीच्या इतिहासावर, गोष्टींवर बोलू लागला, लिहू लागला. प्रसंगी आक्रमक होऊ लागला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर उभ्या राहिलेल्या संभाजी ब्रिगेडने २००९ साली “संभाजी बिडी” या विषयाला हात घातला. समाजात जनजागृती सुरु केली. डिसेंबर २०११ मध्ये साबळे वाघिरे आणि कंपनीला बिडीच्या बंडलावरुन छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आणि चित्र हटवण्याबाबत इशारा दिला. संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर कंपनीने आपल्या बिडीच्या बंडलावरुन छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र आणि छत्रपती हा शब्द टप्प्याटप्प्याने हटवण्याचा निर्णय घेतला आणि २०१३ पर्यंत तो अंमलात आणला.

आता पुन्हा एकदा संभाजी बिडीचा विषय ऐरणीवर आला आहे. साबळे वाघिरे आणि कंपनीने बिडी उत्पादनाला दिलेले संभाजी हे नाव बदलावेच या मागणीने जोर धरला आहे. शिवप्रेमींनी उपोषण, आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.

८ सप्टेंबर २०२० रोजी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने पुण्यात साबळे वाघिरे आणि कंपनीच्या संचालकांची भेट घेतली. २०११ मध्ये त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली तसेच त्यांनी त्यावेळी संभाजी ब्रिगेडला दिलेले पत्र दाखवले. आपल्याला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आहे, परंतु यावेळी राज्याच्या सर्व भागांतील शिवप्रेमींच्या भावना तीव्र असुन कंपनीला आपले व्यावसायिक नुकसान आणि ६०-७० हजार कामगारांच्या प्रपंचाची काळजी असेल तर कोणत्याही परिस्थितीत बिडी उत्पादनाचे “संभाजी” हे नाव बदलणे हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर राहिल्याचे त्यांना पटवून दिले. संभाजी ब्रिगेड चर्चेच्या माध्यमातून हया प्रश्न सोडवू इच्छित आहे, त्यामुळे कायदा हातात घेण्याची वेळ येऊन देऊ नका असा इशाराही या शिष्टमंडळाने दिला. साबळे वाघिरे आणि कंपनी जर नाव बदलायला तयार असेल, तरच संभाजी ब्रिगेड त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेईल असेही ठणकावून सांगण्यात आले. त्यानंतर साबळे वाघिरे आणि कंपनीच्या संचालकांनी आपसात चर्चा करुन दोन दिवसात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपला बिडी उत्पादनाच्या नाव बदलाबाबतचा निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे लवकरच आनंदाची बातमी ऐकायला मिळेल अशी आशा आहे.

हे सगळं वाचल्यानंतर एक गोष्ट आपल्याला समजली असेल की Emblems & Names (Prevention of Improper Use) Act 1950 कायद्यातील 9A मध्ये म्हणजेच थोडक्यात राष्ट्रपुरुषांच्या यादीत जर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश झाला, तर त्यांच्या नावाचा व्यावसायिक आणि व्यापारविषयक कारणांसाठी होणाऱ्या गैरवापरावर आपोआप आळा बसेल. त्यासाठीही शिवप्रेमींनी शासनाकडे मागणी आणि पाठपुरावा केला पाहिजे..

– अनिल माने.

Read more...

… राजगुरुंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत

स्वातंत्र्यवीर हुतात्मा राजगुरु यांना जन्मदिनानिमीत्त
विनम्र अभिवादन 

सजग अतिथी संपादकीय 

” लाहोरच्या कडक उन्हाळयात चहूबाजूंनी भट्ट्या लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. इंद्रीय पिरगळण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर मनाच्या राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत. ” 

राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे २४ आॅगस्ट १९०८ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे. राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात राजगुरू आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले.

लहानपणी म्हणजे वयाच्या १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले.आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयात, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने – वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणातच जात होता. त्या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती,आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते.मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री.हनुमान आखाड्यात
व्यायाम विशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशी येथे परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला ,आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात सामील करून घेतले. त्या क्रांतिमय वातावरणामधे वावरताना राजगुंरुमधील क्रांतिकारकं घडत गेला.कोणत्याही मोहिमेसाठी ते एका पायावर तयार असत. वेळ पडली तर या क्रांती संग्रामात बलिदान देण्याची देखील त्यांची तयारी होती.

चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू एकत्र आले .एकत्र आल्यानंतर लाहोर येथे नॅशनल कॉलेजमध्ये असताना त्यांनी भारताचा वैभवशाली इतिहास आणि जगातील क्रांती विषयक तसेच रशियाच्या क्रांती विषयक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक मंडळ स्थापन
केले .युवकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणे , साम्यवादा विरुद्ध लढा देणे आणि अस्पृश्यता निवारण ही या सभेची उद्दिष्ट होती. चंद्र्शेखर आणि राजगुरू यांचे ३६ गुण जुळाले. इंग्रज सरकारशी ३६चा आकडा हेच या गुणांचे फलित होते,आणि या ध्येयासाठी व हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. या संदर्भातील त्यांच्या भावना, त्यांचे वागणे विलक्षण होते, त्यागासाठी ते कायम तयार व आसुसलेले होते. ही भावना इतकी पराकोटीची होती की,आपल्या आधी भगतसिंह किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती.

आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असे सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूं यांच्याजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिववर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने वर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले,आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती. इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरुळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरुळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती.

राजगुरू यांची सहनशीलता दाखवणारे प्रसंग अनेक होते.
एकदा राजगुरु भट्टीतल्या निखाऱ्यांवर आपल्या क्रांतीकारी मित्रांसाठी पोळया भाजण्याचे काम करत होते. तेव्हा एका सहक्रांतीकारकाने निखाऱ्यांची धग लागत असतांनाही शांतपणे पोळया भाजत असल्यामुळे त्यांची प्रशंसा केली. तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याला जाणूनबुजून डिवचले आणि `त्याने कारागृहात गेल्यावर तेथे होणारा भयंकर छळ सहन केला तरच मला कौतुक वाटेल’, असे म्हटले. आपल्या सहनशीलते विषयी घेतलेल्या शंका न आवडून राजगुरूंने पोळया उलथण्याची लोखंडी सळई गरम करून आपल्या उघड्या छातीला लावली. छातीवर टरटरून फोड आला. पुन्हा एकदा त्यांनी तसेच केले आणि हसत-हसत त्या मित्राला म्हणाले,“आता तरी मी कारागृहातील छळ सहन करू शकेन याची निश्चिती पटली ना ?” राजगुरूच्या सहनशीलतेविषयी शंका घेतल्याने त्या मित्राला स्वत:चीच लाज वाटली. `राजगुरू, तुझी खरी ओळख मला आता झाली’, असे सांगत त्याने राजगुरूची क्षमाही मागितली.
कारागृहात अनन्वित छळ होऊनही राजगुरूंनी सहकाऱ्यांची नावे कधीच सांगितली नाहीत. एका फितुरामुळे राजगुरु पकडले गेले. लाहोरमध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. लाहोरच्या कडक उन्हाळयात चहूबाजूंनी भट्ट्या लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. इंद्रीय पिरगळण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर मनाच्या राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत.

स्वत:च्या दु:खातही इतरांचा विचार करणाऱ्या राजगुरूना फाशी जाण्याआधी कारागृहातील एका सहकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना राजगुरु म्हणाले, “बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळया शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दु:ख वाटते.” २३ मार्च १९३१ या दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग, राजगुरु,आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आले. हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेले.स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे हे थोर क्रांतिकारक होते.

अशा या स्वातंत्र्यवीराला जन्मदिनानिमीत्त शतशः प्रणाम, विनम्र अभिवादन!.

– डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Read more...

राम मंदिरासाठी अयोध्येत पाठविण्यात आली होती चांदीची वीट

राम मंदिरासाठी अयोध्येत पाठविण्यात आली होती चांदीची वीट

कुणी पाठवली होती ती चांदीची वीट? 

सजग संपादकीय, स्वप्नील ढवळे 

सध्या देशभर श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा आनंदोत्सव साजरा होताना दिसत आहे. राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. असाच एक शिवसेनेचा नेता होऊन गेला ज्याने सन १९८७ साली महाराष्ट्रातून पहिली चांदीची वीट राम मंदिरासाठी अयोध्येत पाठवली होती. एका शहरातून पहिली चांदीची वीट अयोध्या येथे पाठविण्यात आली होती. हे शहर मुंबई नाही तर ते ठाणे शहर होते. शिवसैनिकांच्या धर्मवीरांचे ठाणे.

एके काळचे ठाण्याचे शिवसेनाप्रमुख असणारे आनंद दिघे यांनी ती पहिली चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना कोणतीही जाहिरातबाजी न करता दिघे यांनी ती वीट बाबरी मशिद पाडण्याच्या ५ वर्ष आधी पाठवली होती. दिघे यांनी त्या जागी मंदिर व्हावे म्हणून पहिली चांदीची वीट बनवून घेतली होती. त्या वीटेला बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नवरात्रौत्सवाच्या पूजेत ठेवली होती. अनेक शिवसैनिकांनी त्या वेळी बाळासाहेबांच्या आदेशानुसार त्या उत्सवासाठी दानधर्म केले होते. रोज त्या चांदीच्या वीटेचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागत होत्या, त्यावेळी संपूर्ण ठाणे हे राममय झाले होते. आज इतक्या वर्षांनी दिघे यांनी त्या काळी पाहिलेल्या स्वप्नातील राम मंदीराचे भूमिपूजन आज पूर्ण होत आहे. राममंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने आनंद दिघे यांची आठवण अनेक शिवसैनिक काढत आहेत.

Read more...

सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स मिळणे हा महिलांचा अधिकार – निकिता गोरे

सॅनिटरी पॅड्सचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यासाठी औरंगाबादच्या कन्येचा न्यायालयात लढा

सजग आरोग्य

“सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स कर सवलतीत व स्वस्त दरात मिळावेत जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्रियांना देखिल ते वापरता येतील”

मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनासाठी आवश्यक सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स मिळणे हा महिलांचा अधिकार आहे, त्यामुळे भारतात आणि जगभर “सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स कर सवलतीत व स्वस्त दरात मिळावेत जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्रियांना देखिल ते वापरता येतील” अशी मागणी होत असते. कोरोना पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतर देशभर श्रमिक/श्रमिक कुटुंबातील महिला शहरीभागाकडून त्यांच्या मूळगावी चालतं जातं होत्या,
“काही महिलांना पाळीतर आलीच असेल, त्यांच्या कडे मध्यम वर्गीयां सारखे सॅनिटरी पॅड तर नसतीलच, त्या आपल्या तयारीने काही जुने फडके घेऊन निघाल्या असतील. पाळी मध्ये सतत चालण्याचा त्यांचा हा त्रास किती वेदनादायी असेल ? फडंक बदलायला कुठे आडोसाही मिळत नसेल ? अशा परिस्थितीत त्या मैलो चालत आहेत, ही स्थिती स्त्रीसाठी फार अस्वस्थ करणारी असते, याचा आरोग्यावरही परिणाम होतो. योनीत संक्रमनाचीही शक्यता असते” यासर्व प्रश्नांकडे संवेदनशील स्त्री म्हणून पाहतांना काय करता येईल ? याविचारा सोबत, मे २०२० ला आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे, यांत “सॅनिटरी नॅपकिन्सना अत्यावश्यक वस्तू घोषीत करून रेशनिंग दुकांनमध्ये अत्यावश्यक वस्तूंसोबत पुरवठा करण्याचे आदेश मिळावेत, जेणेकरूण ग्रामीण व आदिवासी भागांतील गरीब महिलांना उपलब्ध होतील”

‘मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन’ या अतिशय संवेदनशील आणि महत्वाच्या विषया बाबती स्कॉटलंड या देशाने मात्र जगासमोर उत्तम उदाहरण ठेवलं आहे. स्कॉटलंड जगातील पहिला देश आहे ज्याने, सॅनिटरी नॅपकिन्स व टॅपोन्स मोफत देण्याबाबत दि.२३ एप्रिल २०१९ रोजी स्कॉटिश पार्लमेंटमध्ये यासाठी “पिरिएड्स प्रॉडक्ट प्रोव्हिजन” बिल मांडल. हे बिल त्वरीत संमत होऊन त्याची अंमलबजावणी प्रक्रिया देखिल, स्कॉटलंड मधील सार्वजनिक ठिकाण जसं की, शाळा-कॉलेज, सिनेमागृह, बस स्टँड, रेल्वेस्टेशनस इत्याद ठिकाणी वेन्डिंग मशिन्स द्वारे उपलब्ध करून झाली आहे. आपल्या देशात देखिल अशाच धोरणाची मांडणी होऊन-योग्य अंमलबजावणी होईल तो समस्थ भारतीय महिलांसाठी सुदिन म्हणावा लागेल.

निकीता गोरे, औरंगाबाद.

Read more...

हरिश्चंद्र देसाई महाराष्ट्राला लाभलेले फणसकिंग

महाराष्ट्राला लाभलेले फणसकिंग – हरिश्चंद्र देसाई

सजग संपादकीय

रत्नागिरी जिल्ह्यातील, लांजा तालुक्यातील झापडे ह्या गावात श्री हरिश्चंद्र देसाई ज्यांना अक्खा महाराष्ट्र #फणसकिंग म्हणून ओळखतो व त्यांच्या सोबत त्यांच्या मुलगा मिथिलेश देसाई (B. Tech Agriculture Engg, Rahuri) त्यांनी आगळी वेगळी अशी फणस लागवड केली आहे.

जगभरात फणसाच्या साधारण १२८ व्हरायटी आहेत त्यातील देसाई ह्यांनी ७२ व्हरायटी सध्या लावल्या आहेत, आणि मिथिलेश याचे ध्येय अस आहे की किमान १२८ पैकी १०० व्हरायटी तरी लागवड करायची. देसाई यांची सध्या तब्बल १२५० फणस झाडांची लागवड झाली आहे आणि इतक्या व्हरायटी आणि इतकी लागवड करणारे ते महाराष्ट्रातील, गोव्यातील आणि कर्नाटक मधील एकमेव शेतकरी आहेत. आता सर्वांना फणसाच्या फक्त दोन प्रकार माहिती आहेत, कापा म्हणजे कडक Shell वाला आणि बरका म्हणजे नरम Shell वाला फणस पण Commercially काप्या फणसाला खूप डिमांड असल्याने देसाई ह्यांची ७२ व्हरायटी आणि १२५० लागवड ही काप्या फणसाची आहे. मग सगळ्यांना फणसाच्या गाऱ्याचा रंग पिवळा इतका माहिती आहे पण ह्यांच्याकडे भगवा, पांढरा, लाल, पिंक किंवा वर्षातून दोन वेळा येणारे फणस किंवा निर फणस अश्या वेग वेगळ्या जाती आहेत.

देसाई यांचे म्हणणं आहे, फणस फक्त थंड हवे च ठिकाण सोडल्यास सगळीकडे फणस येऊ शकतो म्हणजे सर्वांना वाटत की फणस फक्त कोकणात येतो तर तस नाही, देसाई यांच्या कडील ७२ व्हरायटी पैकी संशोधन करून देसाई यांनी आशा काही व्हरायटी निवडल्या आहेत ज्या पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ आशा सर्व विभागांमध्ये येऊ शकतात आणि फणस हे अस एक मेव झाड आहे जे पूर्ण पणे ऑरगॅनिक आहे, रासायनिक फवारणी नको व झाडाचं आयुष्य किमान १०० ते जास्तीत जास्त ३०० वर्ष इतकं आहे. देसाई यांच्या नावाने म्हणजे देसाई कापा म्हणून कोकणातील त्यांनी विकसित केलेली फणसाची व्हरायटी केरळ राज्यात विकली जात आहे, आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

मिथिलेश यांचे अस म्हणणं आहे की लोकांनी किमान हळू हळू आता कोंकण सोडता महाराष्ट्राच्या वेग वेगळ्या भागांमध्ये फणसाची लागवड ट्रायल बेसिस वर सुरवात केली पाहिजे. यावर्षी पहिल्यांदाच देसाई यांनी फणसाची नर्सरी सुरू केली असून तब्बल ३००० फणस झाड त्यांनी दिली असून यावर्षी महाराष्ट्रात पहिल्यांदाच फणसाची लागवड झाली. मिथिलेश च म्हणणं असे आहे की, जसे Jackfruit Mission for Kerala , JF Mission for Andhra, Jackfruit Mission for Meghalaya आहे तसे अपल्याकडे #Jackfruit_Mission_for_Maharashtra सुरू केलं पाहिजे. फणस हे अस फळ आहे ज्याच्या कडे फळ म्हणून न पाहता अन्न म्हणून पाहिल पाहिजे कारण फणस हे येत्या काळातील #Global_Fruit असणार आहे. देसाई यांचा ह्या प्रकल्पाला सरकार ची पाहिजे ती साथ मिळाल्यास मिथिलेश व त्या वडिलांना त्यांचा इथे #Jackfruit_Research_Centre उभारायच आहे,जेणे करून महाराष्ट्राला फणस लागवड करता येईल. येत्या काळात लवकरच त्यांचं स्वतः Food Processing Plant देखील सुरू होणार असून फणस हा Main Product ठेऊन बाकी Innovative Food Products राहणार आहेत.

फणसकिंग हरिश्चंद्र देसाई
9422624101

मिथिलेश देसाई
Jackfruit Enterpreneur
8275455176 (Whatsapp)

Read more...

मकर संक्रांत आणि कृषी संस्कृती – राज जाधव

सजग संपादकीय

मकर संक्रांत आणि कृषी संस्कृती – राज जाधव

उत्तर भारतात या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळेच तेथे संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात.

भारतीय संस्कृतीचा विचार केल्यास भारतातील सण, उत्सव हे सर्व साधारणपणे कृषी संस्कृती तसेच सूर्य-कालगणना आणि चंद्र-कालगणना यावर आधारित आहेत. मकर संक्रांत हा सूर्यकालगणना यावर आधारित तसेच कृषी संस्कृतीशी निगडित असा देशभर साजरा होणारा सण.

संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अथवा प्रवेश होणे. संक्रांती ही प्रत्येक महिन्याला येत असते, सूर्य जेंव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेंव्हा त्या पर्वास मकर संक्रांत म्हटले जाते. या संक्रमणापासून सूर्याचे उत्तरायणाला सुरुवात होते म्हणून या संक्रांतीस उत्तरायणी देखील म्हटले जाते. गृह्यसूत्रे, मस्त्यपुराण, देवीपुराण यामध्ये देखील ह्या उत्सवाचा उल्लेख आलेला आहे, सूर्यकालगणनेशी निगडित असा हा अत्यंत महत्वपूर्ण उत्सव आहे. भारतात हा सण सर्वत्र साजरा केला जातो, मकर संक्रांतीला प्रदेशपरत्वे भिन्न नावे दिसून येतात..

उत्तर भारतात या दिवशी डाळ व भात यांची खिचडी खातात आणि दान देतात त्यामुळेच तेथे संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. बंगालमध्ये यादिवशी काकवीत तीळ घालून बनलेला तिळुआ नावाचा पदार्थ, तसेच तांदळाच्या पिठात तूप-साखर घालून केलेला पिष्टक नावाचा पदार्थ खातात व वाटतात म्हणून तेथे संक्रांतीला तिळुआसंक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. तर पंजाबमध्ये या सणाला लोहडी म्हणतात यादिवशी त्या भागातील लोक आपले पारंपरिक लोकनृत्य करतात तसेच गूळ, रेवडी, भुईमूग शेंगा असे पदार्थ खातात आणि वाटतात.

दक्षिणेत याच वेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. तामिळ बांधव हा सण नववर्षाचा उत्सव म्हणून साजरा करतात. माघ बिहू किंवा भोगली बिहू हा सण आसाममध्ये याच दिवशी साजरा केला जातो, हा सण पिकांच्या कापणीचे प्रतीक व त्यातून होणारे उत्पन्न या आनंदात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला सकरात किंवा सुकरात म्हणतात.

महाराष्ट्रात या सणाचे खूप महत्व असून संक्रांतीच्या आदल्या दिवशी या ऋतूत उपलब्ध असलेल्या सर्व शेंंगभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार केली जाते. तसेच या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून अर्पण करतात. यावरून संक्रांत हा सण कृषी संस्कृतीशी देखील निगडित आहे हे स्पष्टच होते..

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ??

– राज जाधव

Read more...

लिव्हिंग वॉटरलेस जगणं पाण्याविना…

लिव्हिंग वॉटरलेस जगणं पाण्याविना…

आपल्याकडे पाणी हेच जीवन आहे असं लोकं म्हणतात. उत्तम आरोग्यासाठी पाणी हा सुद्धा एक अत्यावश्यक आणि महत्वाचा घटक मानला जातो.

हाच महत्वाचा घटक कुणाच्या जीवनात एक अडथळाही ठरू शकतो.

अंगाला घाम येईल, रडताना डोळ्यातून अश्रू येतील याची कधी कुणाला भीती वाटेल का? आपल्या अंगाचा संपर्क पाण्याशी येऊ नये असं कुणाला वाटेल का?

जगात कुणा व्यक्तीला पाण्याची ऍलर्जी आहे असं कुणी सांगितलं तर…

होय तुम्ही अगदी बरोबर विचार करताय पाण्याची ऍलर्जी कशी काय असू शकते. सुरुवातीला यावर माझाही विश्वास बसला नाही पण माहिती घेतल्यावर कळलं की जगात असाही एक आजार आहे.

aquagenic urticaria असं या ऍलर्जी शी संबंधित आजाराचे नाव. हा जगातला फार दुर्मिळ ऍलर्जी चा प्रकार आहे.

या विकाराने त्रस्त असलेल्या माणसांना आंघोळही करता येत नाही, घाम आला, रडताना डोळ्यात पाणी आलं तरीही त्रास होतो. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर काही मिनिटांत अंगाला खाज सुटणे, पुरळ येणे, ताप येणे, मायग्रेन अशी लक्षणे दिसून येतात. आज जगातील जवळपास १०० माणसे या आजाराने त्रस्त आहेत.

कॅलिफोर्नियातील टेस्सा हॅन्सन-स्मिथ या महिलेला या पाण्याच्या ऍलर्जी च्या आजाराने ग्रासले आहे. टेस्साला वयाच्या ८व्या वर्षापासून या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर लगेचच तिला खाज सुटणे, सूज येणे, पुरळ येणे, ताप, मायग्रेनचा त्रास जाणवू लागतो. टेस्सा च्या वयाच्या १०व्या वर्षी या रोगाचे निदान झाले. यामुळे ती कुठला खेळही खेळू शकत नाही आणि कॉलेज कॅम्पस च्या बाहेरही पडू शकत नाही. सुरुवातीला हा साबण किंवा शाम्पू च्या ऍलर्जीचा प्रकार असावा असं तिच्या कुटुंबियांना आणि डॉक्टरांना वाटत होते.

या दुर्मिळ प्रकारच्या ऍलर्जीमुळे टेस्सा ला महिन्यातून फक्त दोनदा आंघोळ करता येते त्याचबरोबर रडताना डोळ्यात पाणी येणे आणि घाम येणे याकडेही विशेष लक्ष द्यावे लागत आहे. तिच्या आईनेच या आजाराचे निदान केले.

“माझी आईच आमची फॅमिली डॉक्टर असल्याने या सर्व विचित्र परिस्थितीत मी स्वतःला भाग्यवान समजते” असं टेस्सा म्हणते.
हे सांगतानाच ती पुढे असं म्हणते

“Aquagenic Urticaria हा आजार म्हणजे नियतीचा मानसिक खेळ आहे. हा आजार कधीही बरा होणारा नाही हे माहीत असूनही दिवसातून जवळपास १२ गोळ्या खाणे म्हणजे कठीणच काम आहे. सुरुवातीला काही काळ दिवसाला १२ गोळ्या खाव्या लागत आता नऊ गोळ्या खाव्या लागतात. त्याचबरोबर मी फार निश्चयी आणि स्वावलंबी असते. माझ्या कॉलेजच्या शिक्षणासाठी मी गाव सोडले. प्रत्येक दिवस आधीच्यापेक्षाही अधिक चांगला वाटतोय आणि एक दिवस हे सगळं थांबेल”

एवढं सगळं सहन करत आयुष्यातील आव्हाने आणि परिस्थितीशी टेस्सा धैर्याने तोंड देत आहे. एक दिवस हे सगळं थांबेल असा तिला विश्वास आहे.

टेस्सा ची माहिती आणि या ऍलर्जी विषयीची जनजागृती करण्यासाठी इन्स्टाग्रामवर @livingwaterless या नावाची एक प्रोफाईल तयार करण्यात आले आहे. या मधून या दुर्मिळ आणि विचित्र अशा आजाराविषयी ची महत्वाची आणि संशोधनात्मक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

जगातील या दुर्मिळ आजाराविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा लेख मी लिहिला आहे.

– स्वप्नील ढवळे
मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज

माहिती स्रोत- ग्रीनलेमन संकेतस्थळ

Read more...

युवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व

युवकांना दिशा देणारे सहृदयी, समाजशील नेतृत्व

स्वप्नील ढवळे,
मुख्य संपादक, सजग टाईम्स न्यूज

रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.

प्रत्येक व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असतात, परंतु हे पैलू आपोआप पडत नाहीत. माणसाच्या जीवनात येणाऱ्या अनुभव आणि प्रसंगांना ती व्यक्ती कोणत्या पद्धतीने सामोरी गेलेली असते यावरून त्या व्यक्तीचे पैलू ध्यानात येत असतात. असंच विविध अनुभवांमधून पैलू पडत चाललेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अतुल बेनके यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष होते. कारण काँग्रेस राष्ट्रवादी च्या अनेक युवा नेत्यांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरली होती. अपवादात्मक काही नेते सोडले तर इतरांनी भाजपची वाट धरली होती. जुन्नरचं युवा नेतृत्व अतुल बेनके यांनी मात्र पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही उलट जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निष्ठावान सखासोबती सारखं अभियान राबवलं, तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून जबरदस्त जनसंपर्क वाढवला, कार्यकर्ता मेळावे असतील विविध आंदोलने असतील सतत कार्यकर्त्यांमध्ये राहून राष्ट्रवादी काँग्रेस चा जनाधार वाढवला. या सातत्यपूर्ण कामगिरीची प्रचिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आली राष्ट्रवादीने तालुक्यात जुन्नर नगरपरिषदेत चांगलं यश संपादन करून सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन काम करणारा संघटक म्हणून त्यांनी आपली एक वेगळी छापही पाडली.

प्रत्येक व्यक्तीची एक काम करण्याची पद्धत असते. गरज असेल तिथे आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती हे गुण संयुक्तपणे अतुल बेनके या व्यक्तीमध्ये दिसतात. पुणे नाशिक बायपास आणि चाळकवाडी टोलचा प्रश्न ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला जिल्हाधिकारी कार्यालय, NHAI च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाचा केलेला पाठपुरावा असेल. बायपास आंदोलनावेळी भर पावसात केलेलं तडफदार भाषण हे त्यांच्यातील आक्रमकता अधोरेखित करते.

जुन्नर तालुका क्रिकेट असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या कबड्डी संघाला आणि एकूणच त्या खेळाला त्यांनी दिलेलं बळ हे निश्चितच कौतुकास्पद आहे, सर्व जिल्हा परिषद शाळांचा एकत्रितपणे घेतलेला सांस्कृतिक महोत्सव, नृत्यस्पर्धांचे आयोजन असेल, फुटबॉल सारख्या खेळाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे या सारख्या विविध उपक्रमांकडे आणि कार्यक्रम पाहिल्यानंतर या प्रत्येक क्षेत्राकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या व्यक्तीकडे आहे अस आपण म्हणू शकतो.

आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि त्याची तयारी करण्याची संधी जुन्नर तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून युनिक अकॅडमी सारख्या नामवंत संस्थेचे नारायणगाव याठिकाणी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी MPSC, UPSC सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे वर्ग त्यांनी चालू केले.इयत्ता दहावी मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ‘अतुलनीय शिष्यवृत्ती’ सारख्या संकल्पनेतून प्रत्येकी एक ते दिड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले. त्याच बरोबर अनेक गरीब आणि गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. ‘अनिक्क्षा’ या त्यांच्या पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी ५१ अनाथ मुलींचे पालकत्व स्वीकारून केले. या मुलींना दत्तक घेऊन त्यांची सर्व जबाबदारी घेतली आणि समाजासमोर मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचं एक उदाहरण ठेवले.

पिंपळगाव जोगा येथील शाळेच्या नवीन इमारत बांधणीसाठी केलेली मोठी मदत तसेच करिअर मार्गदर्शन, नोकरी मेळावे, कॉलेज कट्टा, विद्यार्थी संवाद यांसारखे उपक्रम पाहिल्यानंतर शिक्षण या क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम उभं करण्याचं उद्दिष्ट्य त्यांच्या या विविध उपक्रमांमधून दिसून येते.
पुण्यासारख्या शैक्षणिक सुविधा आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना इथेच मिळाल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

महिलांना उद्यमशील आणि स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी गौरी बेनके यांना त्यांचे कायम मार्गदर्शन असते, पेपरबॅग्स बनविण्यासारखे उद्योग तसेच इतरही सामाजिक उपक्रमांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी अंजनी उन्नती फाऊंडेशन सारख्या संस्थेची स्थापना ही केली आहे. आशावर्कर्स, अंगणवाडी मदतनीस यांसारख्या घटकांकडे त्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष असते. रक्षाबंधन सारखा सण एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा करणारा दिलदार भाऊ अस म्हंटलं तरी वावगं ठरू नये.

शेतकरी संपात पिंपरी पेंढार याठिकाणी शेतकऱ्यांसोबत झोपून रात्र काढणारा, कांदा उत्पादक आंदोलन असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याठिकाणी हा नेता आपल्या परीने जे जे करता येईल ते करत असतो. मीना खोऱ्यातील१२ गावांतील शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. सत्ता नसतानाही अधिकाऱ्यांशी आणि पक्षातील नेतृत्वाची ताकद वापरून ज्या पद्धतीने प्रश्न हाताळले ते प्रशंसनिय आहे.

आदिवासी भागात पडलेल्या दुष्काळ दौऱ्यात स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करणारा त्यांच्यात मिळून मिसळून त्या बांधवांसोबत भाकरी खाणारे जागृत नेतृत्व म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडे पाहिले गेले.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने पायी चालल्या होत्या विचारपूस केली असता कळले की त्यांचे पास संपले असल्या कारणाने त्या पायी चालल्या होत्या बेनके यांनी त्याच वेळी रस्त्याने जाणारी एक एसटी थांबवली आणि नवीन पास काढण्यासाठीची तरतूद करून त्या सर्व विद्यार्थिनींचे त्या दिवसाची तिकिटे काढून त्याचे पैसे वाहकाला दिले हा याच दौऱ्यात घडलेला एक प्रसंग आपल्याला त्यांच्यातील एक सहृदय माणूस दाखवतो.

नारायणगाव येथे झालेल्या राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान च्या शिवजयंती कार्यक्रमात
“मी तुम्हांला मदत करू शकलो नाही हे मी माझे दुर्भाग्य समजतो” असे नारायणगावचे सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांच्याबद्दल त्यांनी काढलेले कौतुकास्पद उदगार. समोरची व्यक्ती राजकीय क्षेत्रात असूनही त्यांचं केलेलं कौतुक तेही एवढ्या मोठ्या जनसमुदाया समोर म्हणजे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांनी दाखवलेल्या समंजसपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे.

रात्री दौऱ्यावरून कितीही वाजता घरी आले तरी सकाळी कुठल्या तरी गावची दशक्रिया किंवा काही कार्यक्रमास पोहचण्यासाठी पुन्हा सकाळी त्याच ऊर्जेने तयार, दौरा संपवून रात्री एक वाजता आपल्या तापाने फणफणलेल्या मुलीला भेटायला पुण्याला जाणारा बाप असो की मायेने आपल्या कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कौटुंबिक आधार असो या व्यक्तीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची विविध अंगे स्पष्ट करतात.

२०१३ चा लोकमत वृत्त समूहाचा राजकिय क्षेत्रातील युथ आयकॉन अवॉर्ड तसेच बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे सारख्या शहरात कमावलेला नावलौकिक आणि विश्वासार्हता असो.

बेनके कुटुंबियांचं गेल्या अनेक वर्षांपासून अनेक उपक्रम आणि मदतकार्य अखंडपणे चालू आहे. अनेकांना उभं केलं बळ दिलं संकटकाळी मागे उभे राहिले. परंतु हे आम्ही केलं ते आम्ही केलं स्वतःबद्दल उगाचच कधीही प्रौढी न मारणारे जनतेसंबंधी एक कणव आणि समर्पण भावना असलेलं सहृदयी नेतृत्व म्हणून अतुल बेनके हे उदयास आले आहेत.

अतुलजी बेनके आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच तालुक्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडो याच मनापासून सदिच्छा. ?

Read more...

डिजिटल युगातील स्मार्ट उद्योजक अरुण काळे

 

“डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.”

स्मार्ट फोनच्या जमान्यात अरुण काळे यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘महालक्ष्मी पब्लिसिटी’ या नावाने ओळख मिळाली अरुण काळे म्हणतात,

‘‘डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.

काही दिवस घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला. एक लॅपटॉप आणि डेटा कार्डच्या मदतीने ‘डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय घरूनच सुरू झाला. अनेक चांगले ग्राहक मला मिळत गेले. त्यातूनच आर्थिक बळासह आत्मविश्‍वास दुणावला. लोक मोबाईल फोन आणि लॅपटॉप अधिक वापरत असल्याने कंपन्यांचा डिजिटल मार्केटिंगवर भर असतो. एकूणच व्यवसाय ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रॉडक्‍ट (उत्पादन) किंवा सर्व्हिसेस (सेवा) किंवा ब्रॅंडबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांची विक्री कशी वाढवता, येईल यासाठी मी प्रयत्न करत गेलो.’’अनेक उद्योजक सुरवातीला स्वतःची वेबसाइट बनवण्यासाठी आग्रही असायचे, पण फक्त वेबसाइट बनवून किंवा व्यवसाय सुरू करून कधीच बिझनेस मिळत नाही. ती वेबसाइट किंवा तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचायला हवा. हेच अरुण काळे यांनी प्रत्येक वेबसाइट बनवणऱ्याला सांगितले.अशा पद्धतीने एक-एक प्रॉडक्‍ट वाढत गेला आणि त्यांची कंपनी आज डिजिटल मार्केटिंगच्या १५ ते २० सर्व्हिसेस देते.

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल ॲडव्हाइस, मोबाईल ॲप्स, ई-मेल यांसारख्या विविध इंटरनेटवरील माध्यमांचा वापर केला जातो.सध्या जगातील एकूण इंटरनेट यूजरपैकी ८० टक्‍क्‍यांहून अधिक लोक स्मार्ट फोनचा वापर करत असल्याने या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या कंपनीचे, वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाईल ॲप तयार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कंपनीच्या मोबाईल ॲप्सद्वारे लोक त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग ही बदलत्या काळाची गरज आहे. अरुण काळे म्हणतात, ‘‘प्रत्येक व्यवसायात चांगला फायदा मिळविण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा आराखडा असणे गरजेचे आहे.

त्यामुळे सध्याच्या जगात कसला ’ट्रेंड’ सुरू आहे, हे ओळखून कौशल्य मिळवा आणि कामाला लागा. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. सध्या हा माझा व्यवसाय चाकण या शहरात चालु आहे .
वर्षाला एक ते दोन लाख रुपये मिळायचे. आता व्यवसायात वाढ करून व्यवसाय पाच ते सहा लाखापर्यंत पोचला आहे. मी आतापर्यंत 70 हुन अधिक लोकांना रोजगार दिला,नाशिक,जुन्नर ,आंबेगाव ,राजगुरुनगर,चाकण,पुणे,भोसरी,सतारा,बारामती या ठिकाणी माझी कंपनी सर्व्हिस देण्याचे काम करत आहे.

अनेक युवा तरुण व्यवसायिकांना हा ’डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय कसा सुरू करायचा हे सांगितले आहे. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना मी एवढेच सांगेन की, प्रामाणिकपणे काम करा. ग्राहकांना सांभाळा, तुमची सर्व्हिस चांगली द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. यावरच कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.

पुढील येत्या काळात जाहिरातीच्या नवनवीन संकल्पना तयार करुन त्यावर कामे केले जाईल असे अरुण काळे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे.

Read more...

Happy नसलेला पर्यावरण दिन

Happy नसलेला पर्यावरण दिन. 

सजग संपादकिय – तेजल देवरे

मानवी मन जितकं संवेदनशील आहे, कधी कधी तितकाच निष्ठूर मानवी स्वभाव भासतो. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करू शकतो; पण आपली हाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही. असं गांधीजींनी विसाव्या शतकात सांगूनही आपण (किमान गांधीजींचे देशवासी) आपली हाव काही कमी करायला तयार नाही. म्हणजे एखाद्या महान व्यक्तिमत्वाला महात्मा, राष्ट्रपिता अशी संबोधनं लावून आपण विषयाला आवर घालत असतो. कारण त्यांचे विचार कृतीत आणणं जड़ जात असतं. कृती अवघड असू शकते पण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं ठरलं तर तिला सहजता प्राप्त होते. परंतू, सगळ्यांना एकत्रही यायचं नाहीये आणि ठरवायचं तर मुळीच नाहीये. खरंतर, आपण आपल्या आईसाठी काय करू शकतो? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा. उत्तर होकार्थी येते तर, सगळ्या सजीवांना पोटात घेणाऱ्या धरणीमाई बद्दल आता प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आणि उत्तरांवर अंमलबजावणी करण्याची चालू क्षणा खेरीज दुसरी योग्य वेळ असूच शकत नाही. कारण पर्यावरणाचा ऱ्हास मानवाने केला आहे मग उपाययोजना देखील मानवानेच करायला हव्या.
पर्यावरणातील एक एक घटकाचे ऋण आपण जाणतो. वातावरणातील हवा, शिलावरणातील दगड, जलावरणातील पाणी आणि ह्या सगळ्यांना भेदणारे जीवावरण ही विविधतेला सामावून घेणारी एक उत्तम सांगड आहे. काही गरजा आणि त्यातून जन्म घेणारा स्वार्थ यामुळे ही सांगड मोडकळीला आली. पण जैव विविधतेचं महत्व आपण जाणतो तर त्यासाठी योगदान देणंही कर्मप्राप्तच आलं. शेवटी, आपणही ह्या विविधतेतीलच एक घटक आहोत. गोष्टी सामान्य माणसासाठी किंचित दूरच्या असल्या तरी माधव गाडगीळांसारखे काही ज्येष्ठ शास्त्रज्ञ आपलं सर्वस्व पणाला लावून फक्त पर्यावरणासाठी झटत असतात. सरकार येतात, जातात पण शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक आधार घेऊन बनविलेले अहवाल मात्र सगळयांनाच खोट्या विकासाआड़ येणारे वाटतात. तसं असेल तर, का येतात आपत्ती? त्या खरंच 100 टक्के नैसर्गिकच असतात का? आता तरी ह्याचा विचार केला पाहिजे. अहवाल मान्य नसतील तर किमान त्यांचा विपर्यास करणे टाळले पाहिजे. अहवाल दडपणे सोपे आहे; पण सत्य कसे दडपले जाईल? ते आपत्तींच्या रूपाने सर्वांसमोर उभे ठाकतेच..
उत्तम वेव्हारे निसर्गा राखोनी।
विकास साधू या विवेकाने!
माधव गाडगीळांनी असं म्हणून मांडणी खुप सोपी केली. कमीत कमी पर्यावरणीय कायद्यांनुसार वागणे.. यात कोणाचेच काही नुकसान नाहीये. विकास तर जन्म घेईलच अधिक आपण जन्म घेतलेल्या सृष्टीचे सौंदर्य देखील अबाधित राहील. आणि येणाऱ्या पिढया सुद्धा सुरक्षित राहतील जेणेकरून त्यांना अजून एका ग्रहाला दूषित करण्याची संधी मिळता कामा नये. दिवंगत थोर वैज्ञानिक स्टीफेन हॉकिंग्स यांनी मानवाचा हावरट पणा असाच राहिला तर पृथ्वीचं पुनर्वसन करण्याची वेळ येईल असं काही वर्षांपूर्वीच म्हटलं होतं. म्हणजे पृथ्वी मानवाला राहण्यास अनुकूल असणार नाही; पण पर्यावरणाचा ऱ्हास होतो याचा अर्थ मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. तिकडे अंतराळात मानवी बुद्धीचा आविष्कार म्हणून संशोधन चालू असेल आणि इकडे सामान्य माणूस पृथ्वीवरची सोय संपली म्हणून ग्रह बदलासाठी तयार असतील. पण शरीरच साथ देत नसेल तर हा बदल नियम तरी काय कामाचा? आणि असं करणं म्हणजे आपल्या स्वार्थी पणाचं एक वेगळं रूप असेल ते..
व्यवस्था हे विसरून जाते की, ते स्वतः सुद्धा ह्या निसर्गाचे घटक आहेत आणि यामुळेच फक्त नफ्या पोटी बेकायदेशीर स्टोन क्रशर वापरले जाते. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत विरतात. याचा परिणाम आरोग्यावर होतो. धुळीची एलर्जी असतांना इतके धूलिकण नाका तोंडात गेले तर श्वासोच्छवासाला अडचण येते आणि मनुष्यबळ एका तरहेने अकार्यरत बनते. बेकायदेशीर खाणकाम आणि त्याचे परिणाम यावर वृत्तपत्रांचे मथळे भरून आले तरी राज्यव्यवस्था आपले डोके भरून ही गोष्ट लक्षात घ्यावयास तयार नाही. हे असेच चालू राहिले तर सौन्दर्याचे भूषण असणारे पश्चिम घाट कधी दुःखाचे कारण बनेल सांगता येत नाही. जगभरात चांगले वाईट उदाहरणं तर आहेतच पण जवळच साध्या राज्यात आणि भारतातही त्यांची कमतरता नाही. माळीण सारखं एक संपूर्ण गांव नामशेष होतं म्हणजे काय? शेवटी निसर्ग हाच राजा असतो. त्याला समानते साठी कुठल्या कलमाची गरज नाही. तो हेच योग्य आहे म्हणून वेळेत न्याय निवाड़ा करतो. आपण त्याला ओरबाडलं तर तो आपल्याला स्वतःच्याच मातीत जागा देतो.
पर्यावरणाचा विचार करणं म्हणजे अविकसितपणाचं ते लक्षण आहे. असं वाटतं असेल तर जगातील सगळ्यात आनंदी, प्रगत आणि निसर्गाला पूरक अशा नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी, आणि स्वीडन या राष्ट्रांकड़े पाहिले पाहिजे.
संध्याकाळी नदीच्या काठी बसून आयुष्याचा आनंद घेणे वगैरे सारख्या कल्पना, पुढच्या काही पिढ्यां साठी भाकड कल्पना म्हणूनच उरण्याची भीती वाटते. कारण अलिकडे, नदयांचं संवर्धन नाही झालं तर त्या हळू हळू नष्ट होतील अशी शंका उपस्थित केली जातीये. हे भविष्य असलं तरी वर्तमानात देखील नदीकाठच्या दुर्गंधी मुळे हवा तो आनंद मिळू शकत नाही. धर्म सांगतो म्हणून नदीची आरती करता येते पण त्या आरती मागची शिकवण विसरून जागीच निर्माल्य वाहिले जाते. आरतीने काहीच होत नसले तरी केर क़चर्याने नदी प्रदूषित होते आणि पर्यायाने तिचं पाणी पिउन सजीव धोका पत्करत आहेत, हे सुद्धा प्रगतीची कास धरणारा माणूस समजू शकत नसेल तर यापेक्षा दूसरी अधोगती नसावी.
पर्याय म्हणून सेंद्रिय व्यवस्था, सौर ऊर्जा यांचा
उपाय सांगितला जातो. हळूवार, खर्चिक अशा या गोष्टी असल्या तरी असाध्य नाही आहेत. शक्य तिथे यांचा वापर व्हावयास हवा. सौर ऊर्जे वर आधारित विमान या संकल्पनेचे जनक बट्रांड पिकार्ड यांनी अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन दिल्यास जागतिक पर्यावरणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे म्हटले होते. ‘सोलर इम्पल्स 2’ हे विमान चालविणारे वैमानिक बोशबर्ग या वैमानिकाने देखील सौर क्षेत्रात जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने सौर विमानाच्या सहाय्याने जग भ्रमन्तिचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. कारण, जेवढा जीवाश्म इंधनांचा वापर जास्त, तेवढं कार्बन डायऑक्साइड चं उत्सर्जन जास्त.. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या वाढीस लागून, हवामान बदल, अतिदुष्काळ जन्य परिस्थिती उद्यास आली आहे. तिसरे विश्व महायुद्ध पाण्यामुळे नाही झाले म्हणजे मिळवले, अशी जगाची सद्य स्थिती आहे. वर्षाला शंभर कुटूुंबं वापरतील एवढं पाणी पंच तारांकित हॉटेल्स मध्ये 180 लोकं 55 दिवसांत वापरतात. ह्या सर्वाचा विचार केला तर शेतकरयावर किंवा इतर काही दुष्काळी भागातील माणसांवर त्यांचीच बांधवं अन्याय करतात असे दिसते.
आंतरराष्ट्रीय शिखरे म्हणजे शोभेच्या बाहुल्या आहेत. त्यातही ‘ट्रम्प विचार’ हे सर्व थोतांड आहे असं म्हणत पॅरिस करारातून बाहेर पडतात, म्हणजे पूर्वी सुधारणा नव्हती आणि आता चुकीची जाणीवही नाही. माणसं, पर्यावरण असं सर्वांचंच शोषण करणाऱ्या भांडवलशाही कडून आणखी अपेक्षा ती काय करणार? या सर्वांतून धड़ा घेऊन मिश्र व्यवस्था स्वीकरणाऱ्या भारताने तरी आपले योगदान द्यावे, शेवटी भारताला ‘गांधी विचार’ लाभले आहेत, हे विसरून चालणार नाही. संपूर्ण जगात एक माणूस, प्रति वर्षी दिड टन कार्बन उत्सर्जना साठी कारणीभूत असतो. यात आघाडीवर चीन-28%, अमेरिका-14%, यूरोपियन महासंघ- 10%, आणि भारत-7% आहे. 2014 मध्ये 9.9 अब्ज टन इतके कार्बन उत्सर्जन झाले होते, ते 2013 पेक्षा 2.5 टक्के अधिक होते. क्योटो करारा नुसार हे प्रमाण 1990 पेक्षा 61 टक्क्यांनी अधिक आहे. भारतात 2022 पर्यन्त सौर व्यवस्थेचे ध्येय आहे, त्याला कृतीची जोड़ मिळाली तर पर्यावरणाचे संवर्धन शक्य होईल. भारतात गुजरात ला ‘सोलर सिटी’ करण्याचे आश्वासन राज्य कर्त्यांनी दिले आहे. ह्याच राज्यकर्त्यांनी समुद्रावर अन्याय करत महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे देखील आश्वासन दिले आहे. आपल्या उक्ती आणि कृतींमध्ये समन्वय राखायला ही व्यवस्था कधी शिकणार कोणास ठाऊक?
रसायनांचा घातक मारा पावसावर निर्बंध आणतोय, ह्या छोट्या पण मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टींकडे आता आपण लक्ष दिले पाहिजे. प्लास्टिक वाचून काही गोष्टी आडत असतील तर 50 मैक्रॉन च्या वरील प्लास्टिक चा वापर असं नियमाला धरून वागू शकतो पण नियंत्रण ही गोष्ट जणू अशक्य आहे असं हल्ली आपण दाखवून देतो आणि मग थेट बंदी कड़े वळतो. अनेक प्रकारच्या प्रदूषणांपैकी ध्वनी प्रदूषणाकड़े सातत्याने दुर्लक्ष केले जाते. पण ती एक गंभीर बाब आहे. भोंगे असो वा डीजे प्रश्न भावनांचा नाही कानांचा आहे. आणि ते सर्वच धर्मियांना असतात, हे सांगण्याची बालिश वेळ येण्या इतपत माणूस वागतोय. दोन महिन्यांपूर्वी, आर्क्टिक ध्रुवावर, संपत आलेल्या बर्फा वर बसून समुद्राकडे पोलार बीअर पाहत असल्याचा फ़ोटो इंस्टाग्राम वर पाहिला होता. काही वर्षांपूर्वी बर्फ नसलेल्या आर्क्टिकची भीती शास्त्रज्ञांनी बोलून दाखवली होती, तिचं भयानक रूप पोलार बिअर्स च्या डोळ्यांत दिसून येतं. आपल्या चुकांमुळे ह्या जिवांनी कुठे जायचं? माणूस काहीही करेल पण हे जीव कुठून आणणार स्वतः साठी बर्फ?
इ वेस्ट ही एक समस्या पर्यावरणा पुढे आहे. तिचे वेळीच व्यवस्थापन व्हायला हवे.
शेवटी, पृथ्वी, नदया, समुद्र, डोंगर, दरया हे फक्त साहित्याचा भाग म्हणून वापरायचे की येणाऱ्या पिढीला चांगल्या स्वरुपात दाखवायचे? हे आजच मनाशी ठरवूया.. आणि आपल्याला सुख देणाऱ्या पर्यावरणाला आपणही सुख देऊया.

Read more...
Open chat