अस्मिताताई गणेश कवडे यांचे आगळेवेगळे रक्षाबंधन, पोलीस अधिकारीही झाले भावूक

आदर्श सरपंच अस्मिताताई गणेश कवडे यांच्या कार्यामुळे पोलिस अधिकारीही भावूक

कोरोना प‍ार्श्वभूमीवर अस्मिताताई कवडे यांचे आगळेवेगळे रक्षाबंधन

श्री क्षेत्र ओझर आदर्श सरपंच अस्मिताताई गणेशभाऊ कवडे यांनी जुन्नर तालुक्यातील पोलिसांना राखी बांधत रक्षाबंधन केले साजरे

सजग प्रतिनिधी, ( संपादक – प्रा.अशफाक पटेल )

ओझर | कोरोना काळात श्री क्षेत्र ओझर आदर्श सरपंच अस्मिताताई कवडे व ओझर देवस्थानचे विश्वस्त शिवसेनेचे युवा नेते,अश्वमेघ युवा मंच चे संस्थापक गणेश कवडे यांनी गावाच्या व तालुक्याच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवले असुन आरोग्य कर्मचारी, महसूल विभाग ,पोलिस बांधव, अंगणवाडी व आशासेविका यांना मास्क, सॅनिटायझर, थर्मामीटर, पीपीई किट, किराणा किट, अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप, फेस शील्ड वाटप, रक्तदान शिबिराचे आयोजन, गावाचे कोरोनापासुन सरंक्षण व्हावे यासाठी विलगीकरण कक्ष सुरु करुन नागरिकांना सुविधा पुरविण्याबरोबरचं रुग्णवाहिकेच्या माध्यमातुन गावोगावी जाऊन कोरोना बाबात जनजागृती करण्याबरोबरचं नागरिकांसाठी अत्यावश्यक काळात अत्याधुनिक सुविधा असणारी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत हे दांम्पत्य आदर्श कार्य करत आहे.

परंतु आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देऊन समाजातील सर्वच घटकांना आपले सण, उत्सव, आनंदात साजरे करता यावेत यासाठी कार्यरत असणार्‍या जुन्नर तालुक्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला जाऊन पोलिस बांधवांसोबत श्री.क्षेत्र ओझरच्या आदर्श सरपंच सौ. अस्मिताताई गणेश कवडे यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

यात जुन्नरचे पोलिस निरीक्षक युवराज मोहिते, नारायणगाव सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील,आळेफाट्याचे पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर, ओतुरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे या चारही पोलिस स्टेशनचे अधिकारी यांना राखी बांधुन आपल्या भावांना समाजाबरोबर स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला बहिण म्हणुन अस्मिताताईंनी दिला व त्यांच्या उदंड आयुष्यासाठी श्री विघ्नहराकडे प्रार्थना केली.

याचबरोबर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार शरददादा सोनवणे यांनाही अस्मिताताईंनी राखी बांधली.

गावातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी व ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असणार्‍या अस्मिताताईंच्या या अनोख्या रक्षाबंधन मुळे पोलिस अधिकारीही भारावून गेले.

कोरोना पार्श्वभूमीवर समाजाच्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असुन आपल्या जीवाची बाजी लावुन आपले कर्तव्य बजावत आहेत.

पोलिस बांधव आपले कर्तव्य बजावत असताना अनेकदा त्यांना आपल्या घरच्यांसोबत सण, उत्सव, घरगुती कार्यक्रमातही सहभागी होता येत नाही. याची जाणीव असल्याने सौ. अस्मिताताईंनी कर्तव्यावर असणाऱ्या या भावांना राखी बांधुन हा सण साजरा केला असुन यापुढील काळातही समाजिक उपक्रम राबवण्याचे काम अविरत सुरु राहणार असल्याचे सरपंच अस्मिताताई कवडे यांनी सांगितले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat