शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व द्या -विश्वजित शिंदे
शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व द्या -विश्वजित शिंदे
सज वेब टीम
नारायणगाव | प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व द्यावे.खेळामुळे शरीर सुंदर व निरोगी होते,मन आनंदी राहते असे मनोगत आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू विश्वजित शिंदे यांनी व्यक्त केले.ग्रामोन्नती मंडळाच्या गुरूवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिराच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, उपकार्याध्यक्ष डाॅ.आनंद कुलकर्णी,कार्यवाह रविंद्र पारगावकर, उपकार्यवाह अरविंद मेहेर,जयश्रीताई खिलारी,याशिका शिंदे,डी.के.भूजबळ,एकनाथ शेटे,मुख्याध्यापक रविंद्र वाघोले,उपमुख्याध्यापक रमेश घोलप,बी.एफ.पावडे,पर्यवेक्षक रंजना बो-हाडे,दत्तत्राय कांबळे,अनुराधा पुराणिक,अनिल गायकवाड,शिक्षक प्रतिनिधी विजय कापरे, विद्यार्थी प्रतिनिधी नेहा ढोमसे,आदिती टाव्हरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्वजीत शिंदे पुढे म्हणाले की शालेय जीवनात एन.सी.सी.मधूनच अनेक खेळाडू तयार होतात.कोणत्याही आवडीच्या खेळात आपण सतत सहभागी असले पाहीजे.सातत्य असेल तर यश नक्कीच मिळते नारायणगावसारख्या ग्रामीण भागात राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतात ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी अनिलतात्या मेहेर म्हणाले की आपल्या शिक्षकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा.ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेहमी आदर्श विचार देण्याचा प्रयत्न केला जातो.
यावेळी क्रीडासमुपदेशक जयश्रीताई खिलारी, नवोदित खेळाडू याशिका शिंदे,यांचेही भाषणे झाली.
याप्रसंगी आदर्श शिक्षक म्हणून क्रीडाशिक्षक भिमराव पालवे,विजय साबळे,शंकर केंगले, वनिता वायकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.तसेच सर्व राज्य व राष्ट्रीय खेळाडू व सर्व क्रीडा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध क्रीडास्पर्धेचे बक्षिस वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रविंद्र वाघोले यांनी केले.सुत्रसंचालन अनुपमा पाटे,मेहबूब काझी यांनी केले व आभार उपप्राचार्य बबन पावडे यांनी मानले.
Leave a Reply