पत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी

पत्रकारांवर चुकीचे गुन्हे दाखल करणार्‍यांची चौकशी करावी – अतुल परदेशी

मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर च्यावतीने नारायणगाव पोलिस स्टेशनला निवेदन

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | जुन्नर तालुक्यात पत्रकारांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आरोपींसह तक्रारदार यांचीही योग्य ती चौकशी करुन पत्रकारांवर बदनामी करण्याच्या दृष्टीने दाखल करण्यात येणार्‍या गुन्ह्याबाबात चौकशी करुन योग्य तो न्याय द्यावा अशा आशयाचे निवेदन मी एक पत्रकार ग्रुप जुन्नर तालुक्याच्यावतीने नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना देण्यात आले. हे निवेदन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदिप पाटील, पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना य‍ांनाही देण्यात आले आहे.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला पत्रकारांचे नेहनीच सहकार्य आहे. चुकीच्या पद्घतीने किंवा कायद्याचा दुरुपयोग करुन काही होणार नाही असे सांगत आरोपींसह तक्रारदार यांचीही चौकशी करुन योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी अतुल परदेशी म्हणाले की सर्व पत्रकार एकत्र आहेत पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने सहकार्य करावे व पत्रकारांना योग्य न्याय द्यावा अशी भुमिका पत्रकारांच्यावतीने मांडली.

यानिमित्तानं अतुल परदेशी, सुरेश वाणी, रविंद्र पाटे, सचिन कांकरिया, अॅड. कुलदिप नलावडे, अतुल काकंरिया, किशोर चौरे, प्रा.अशफाक पटेल, स्वप्निल ढवळे, पवन गाडेकर, आयुब शेख, दर्शन फुलपगार, मंगेश पाटे, चेतन बोर्‍हाडे, रफिक शेख, तान्हाजी तांबे, सुभाष घुले यांसह प्रिंट व ईलेक्ट्राॅनिक मिडीयाचे मी एक पत्रकार ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

यानिमित्तानं उपस्थित पत्रकारांची कोरोना सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन मिटिंग संपन्न झाली. यावेळी अतुल परदेशी, सचिन कांकरिया, रविंद्र पाटे, सुरेश वाणी, अॅड.कुलदिप नलावडे यांनी पत्रकार सुरक्षा व पुढील कार्यवाही विषयी मार्गदर्शन केले.

या मिटिंगचे प्रास्ताविक प्रा.अशफाक पटेल यांनी केले तर आभार किशोर चौरे यांनी मानले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat