शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी २४ तास उपलब्ध – चेअरमन सत्यशिल शेरकर
विरोधकांना पुन्हा कारखान्याला उभे राहण्याची इच्छा होणार नाही अशा भव्य मतांनी शिवनेर पॅनेलला विजयी करा – संजय काळे
पाण्यासाठी जेलमध्ये जायलाही दादा मागे हटले नाही. शेतकर्यांसाठी सत्यशिलदादा सदैव कार्यरत – अशोक घोलप, व्हाईस चेअरमन
सजग वेब टीम जुन्नर
जुन्नर । श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि.जुन्नर आंबेगाव संचालक मंडळ निवडणुक २०२० चा जुन्नर गटाची उस उत्पादक व सभासदांची सभा शिवनेर पॅनेलचे प्रमुख चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या प्रमुख उपस्थित कोंडाजीबाबा डेरे सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
शेठबाबा, सोपानशेठ यांच्यानंतर सत्यशिलदादा समर्थपणे कारखाना सांभळतायत. पाण्यासाठी जेलमध्ये जायलाही दादा मागे हटले नाही. शेतकर्यांसाठी सत्यशिलदादा सदैव कार्यरत आहेत. त्यामुळे ९ तारखेला बहुमताने शिवनेर पॅनेलला निवडुन देण्याचे आवाहन व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.
ऐतिहासिक निर्णयासाठी आपण अाज एकत्र जमा झालो आहोत. कारखान्याने जुन्नर तालुक्याचं भाग्य बदललं. यात शेरकर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. आज सत्यशिलदादांच्या नेतृत्वाखाली कारखाना रोल माॅडेल म्हणुन समोर येतोय ही गौरवाची बाब आहे. राजकारण बाजुला ठेवुन सर्वांना सोबत घेत दादा काम करतायत असे प्रतिपादन डाॅ.सुनिल शेवाळे यांनी केले.
शेठबाबांपासुन विरोधकांना सभासद थारा देत नाही. शेठबाबांच्या विचारांवर आणि आण्णांच्या आदर्शांवर सत्यशिलदादा कार्यरत आहेत. यापुढेही दादांनी असवच चांगले काम करुन त्यांनी सभासदांचे हित जपत चांगला बाजारभाव द्यावा असे मनोगत लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष शंकरराव ताम्हाणे यांनी व्यक्त केले.
भारतात असलेल्या कारखान्यांमध्ये विघ्नहर कारखान्याचं नाव आवर्जुन येतं ही कौतुकाची बाब आहे. दिवसेंदिवस कारखान्याचा आलेख उंचावत चालला आहे. पाच वर्ष विरोधी पॅनेलवाले कुठ असतात असा सवाल यावेळी मनोगत व्यक्त करताना अोबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी उपस्थित केला.
सत्यशिलदादांचा कारभार शेतकर्यांना न्याय देणार आहे. त्यामुळे राज्यासह देशात विघ्नहर कारखान्याचा नावलौकिक आहे. कारखान्यापुढील आव्हाने पेलुन सत्यशिलदादा शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी कार्यरत आहेत असे जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे यांनी सांगितले.
सभासद उत्स्फुर्तपणे सत्यशिलदादांच्या शिवनेर पॅनेल सोबत आहेत. विरोधकांना पुन्हा कारखान्याला उभे राहण्याची इच्छा होणार नाही अशा भव्य मतांनी शिवनेर पॅनेलला विजयी करा असे वक्तव्य सभापती संजय काळे यांनी व्यक्त केले.
राजकारणामुळे अनेक कारखाने बंद पडलेत. काही सहकारी कारखान्यांच्या चेअरमनी खाजगी कारखाने उभे केलेत ही खेदाची बाब. आपल्याला विघ्नहर कारखाना संस्था टिकवायची, वाढवायची आहे. त्यासाठी सर्व संचालक कार्यरत आहेत. शेतकर्यांचा ऊस चांगला यावा यासाठी तज्ञांकडुन मार्गदर्शन केलं जातयं आणि त्यामुळे अनेकजण १०० टनाच्यापुढे उत्पादन घेतायतं ही तसेच विघ्नहर कारखान्याचा हुमनी किड पॅटर्न राज्याने स्विकारला कौतुकाची बाब आहे. पुणे जिल्ह्यात दोन नंबरचा बाजारभाव विघ्नहर कारखाना देतोय. शासनाच्या निर्णयामुळे कारखानदारी अडचणीत येतेय. शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी २४ तास उपलब्ध आहे तसेच कारखान्याच्या माध्यमातुन कुकडेश्वर मंदिराचे कामे पुर्ण केले आहेच परंतु पुरातत्त्व खात्याने परवानगी दिल्यास कुकडेश्वर मंदिराचा कळसही लावु देऊ असे मनोगत शिवनेर पॅनेल प्रमुख चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी व्यक्त केला.
या सभेच्या निमित्ताने अॅड.मारुती ढमढेरे, मच्छिंद्र कबाडी, सिताराम खिलारी, हिराताई चव्हाण, सुरेखाताई गांजाळे, संतोष ढोबळे यांची मनोगते झाली.
यावेळी शिवनेर पॅनेलचे पॅनेल प्रमुख सत्यशिल शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, सभापती संजय काळे, जि.प.सदस्य शरद लेंडे, देवेंद्र खिलारी, पं.स.गटनेते दिलीप गांजाळे, उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी, फिरोज पठाण, भाऊ कुंभार, अविनाश कर्डिले, बाबा परदेशी, दिनेश दुबे, पापा खोत, बाजीराव ढोले, भाजपाचे उल्हास नवले, यांसह शिवनेर पॅनेलचे सर्व उमेदवार, कारखान्याचे महिला – पुरुष सभासद व विविध पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेचे प्रास्तविक व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी केले. सुत्रसंचालन व्हि.डी.पानसरे यांनी तर आभार जुन्नर गटाचे उमेदवार देवेंद्र खिलारी यांनी मानले
Leave a Reply