जि. प. सदस्य देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय? 

देवराम लांडेंची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय? 

पश्चिम भागात नवीन युवा चेहरा राजकारणात येणार?

सजग राजकीय – (स्वप्निल ढवळे, मुख्य संपादक)

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील पाडळी निरगुडे गटाचे जि.प.सदस्य देवराम लांडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढत असल्याची चर्चा सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. देवराम लांडे हे याआधीही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि सध्या शिवसेना या सर्व पक्षांकडून विविध निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत. मागील वर्षीही शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते पद, जिल्हा नियोजन समिती सदस्य पद आदी विषयांवरून लांडे यांनी व समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती.

जुन्नर तालुक्यातील राजकीय समीकरणे कधी बदलतील याचा काही नेम नसतो. येत्या काळात येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यात मोर्चे बांधणी करत आहे. याआधीही लांडे यांच्या बाबत पक्ष पातळीवर देखील आमदार बेनके यांच्या निवासस्थानी विविध नेत्यांशी चर्चा घडल्या आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यातच दिवाळीच्या काळात लांडे यांनी घेतलेल्या नवीन वाहनाची पूजा देखील आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी लांडे यांचा मुलगा अमोल लांडे हा देखील उपस्थित होता. यावरून देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसशी चांगलीच जवळीक साधून आहेत हे स्पष्ट होत आहे परंतु ते काय निर्णय घेतात हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

आमदार वल्लभ बेनके यांच्या काळातही देवराम लांडे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. सध्या लांडे यांचा मुलगा अमोल हा आदिवासी भागातील युवा नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसत आहे. विविध गावातील सरपंच आणि कार्यकर्ते घेऊन ते लवकरच राष्ट्रवादीत दाखल होतील अशीही चर्चा आहे. आगामी काळात देवराम लांडे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आमदार अतुल बेनके व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Read more...

राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – ॲड. अनिल परब

शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर – परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई, (दि.१०) | एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली आणि यावर मार्ग काढण्यात आला आहे.

शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

परिवहनमंत्री परब म्हणाले, टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे  आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचेही परब यांनी सांगितले.

Read more...

सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील

सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे – जयंत पाटील

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई (दि.११) | बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक केले आहे.

तेजस्वी यादव यांच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे सांगतानाच जयंत पाटील यांनी
अभिनंदन ! Well done असे ट्वीट करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान जयंत पाटील यांनी ‘मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है ।’ असा शेयर सादर करत तेजस्वी यादव यांना प्रोत्साहन दिले आहे.

Read more...

जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके

जुन्नर तालुक्यातील गुळंचवाडी शिवारात होणार फेर पंचनामे – आमदार अतुल बेनके

सजग टाईम्स न्यूज, बेल्हे

बेल्हे | निसर्ग चक्रीवादळात नुकसान भरपाई न मिळालेल्या या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानभरपाई पासून वंचित राहिलेल्या गुळुंचवाडी शिवारातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर पंचनामे करण्यात येणार आहे. निसर्ग चक्रीवादळात घरे आणि समाज मंदिर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे फेर पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी सजग टाईम्स ला दिली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे २८ कोटी रुपयांची रक्कम महसूल विभागाने नुकतीच वर्ग केली असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली. पूर्व पट्ट्यातील गुळुंचवाडी शिवारातील समाज मंदिरे आणि घरं यांचे निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान झाले होते. या भागाचा दौरा त्यांनी केला. या वेळी अतुल भांबेरे मित्र मंडळ आणि स्वराज सोशल फाउंडेशन यांच्या वतीने या शिवारातील गरीब व गरजू कुटूंबांना दिवाळी फराळ वस्तूंचे वाटप आमदार बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल भांबरे,विजय कुऱ्हाडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यात सिंचन क्षेत्र अर्थात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानभरपाईसाठी सर्वाधिक २१ कोटी ८७ लाख २१ हजार ६४५ रुपये त्या खालोखाल घरांच्या नुकसानी साठी चार कोटी २२ लाख ७० हजार रुपये इतर नुकसानीसाठी दोन कोटी १९ लाख २० हजार रुपये असे एकूण २८ कोटी रुपयांची मदत निधी महसूल विभागाकडे जमा झाला होता. ही मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

Read more...

देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके 

देशातील पर्यटकांसाठी आदर्श ठरेल असे पर्यटन जुन्नर तालुक्यात करणार : अतुल बेनके

सजग टाईम्स न्यूज, जुन्नर

खोडद | “सध्या पर्यटनाच्या संधी मोठ्या आहेत.जुन्नर तालुक्याला निसर्गसंपदेचं वरदान मिळालेलं आहे.निसर्गसंपदेचा हा वारसा जपत यातूनच स्थानिक नागरिकांच्या उज्वल भविष्याचा विचार करून देशातील पर्यटकांना जुन्नर तालुक्यात येण्याची ओढ लागेल व देशातील पर्यटकांसाठी आदर्श असे ठरेल असे पर्यटनजुन्नर तालुक्यात निर्माण करणार आहोत.पर्यावरण व पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना सोबत घेऊन हे काम केले जाईल.”असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले.

या संस्थेमार्फत जुन्नर तालुक्यातील १४२ गावांचा जैवविविधता सर्वेक्षणाचा (नोंदवही)  पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या त्रुटी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात दुरुस्ती करणार आहोत.या कामासाठी जुन्नर तालुक्यातील निसर्गमित्र,पर्यावरणप्रेमी,वनस्पती अभ्यासक, सर्पमित्र, दुर्गसंवर्धक आदींची मदत घेतली जाणार आहे.या नियोजनासाठी आयोजित बैठकीत आमदार जुन्नरचे अतुल बेनके बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे,पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब देवाडे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी,ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे अध्यक्ष डी.के.वळसे,जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष धनराज खोत,जुन्नर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती ढोबळे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार विनायक खोत यांनी व्यक्त केले.

यावेळी  आमदार बेनके म्हणाले की, “पर्यटन वाढलं पाहिजे, पण निसर्गाच्या ऱ्हास झाला नाही पाहिजे.पर्यटक मुक्कामी राहण्यासाठी येथे येतील तसेच पर्यटकांचा  कल कशाकडे आहे ही बाब लक्षात घेऊन  जुन्नर पर्यटनाच्या बाबतीत बिझनेस मॉडेल तयार केलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यास मान्यता देखील दिली आहे. शिवनेरीवर रोप वे, यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प हे प्रकल्प बांधा आणि हस्तांतरित करा या तत्वावर केले जाणार आहेत.केवळ महाराष्ट्रच तर नाही देशातल्या प्रत्येक पर्यटकाला जुन्नरला येण्याची ओढ लागेल अशाप्रकारचा प्रकल्प केला जाणार आहे.डॉ.अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून वडज धरणाच्या शेजारी केली जाणार आहे.या प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून त्याचे लवकरच सादर केला जाईल.”

     “आदिवासी भागात हेल्थ टूरिझम हा १०० कोटींचा  प्रकल्प असून निसर्गोपचार आणि अन्य बाबींचा यात समावेश असणार आहे.शिवनेरी रोपवेचा सुमारे ७० कोटींचा प्रकल्प आहे.बीओटी तत्वावर हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पासाठी शासन खर्च करणार आहे.जीएमआरटी प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात औद्योगिक वसाहती व कारखानदारी आली नाही. त्यामुळे जीएमआरटी प्रकल्प हा आपल्यासाठी एकप्रकारे वरदानच ठरला आहे,यामुळे आपल्या तालुक्याचं वातावरण अत्यंत शुद्ध व स्वच्छ राहिले आहे.या तालुक्यातील निसर्गसंपदा देखील अबाधित राहिली आहे.”

अतुल बेनके, (आमदार,जुन्नर तालुका)

“जुन्नर तालुक्यात पर्यावरण व पर्यटनासाठी काम करणारे लोक सर्वसामान्य असून केवळ निसर्गाप्रति असलेल्या तळमळीने पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी काम करत आहेत.जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून जाहिर झाल्यामुळे तालुक्याचा ऐतिहासिक , सांस्कृतिक वारसा ,पर्यावरणीय बदल व जैवविविधता , लेखन , कृषि इ.अनेक अंगाने त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे म्हणून या सर्व क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यरत आसणा-या तालुक्यातील  अभ्यासकांना एकाच व्यासपीठावर दर १५ दिवसांतून एकदा एकत्र करुन चर्चा घडत रहावी जेणेकरून तालुक्याचा अधिक तपशिलवार अभ्यास होण्यास मदत होइल या उद्देशाने ‘जुन्नरी कट्टा’  सुरु केला आहे.”असेही श्री.अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.

Read more...
Open chat