नाम फाऊंडेशन कडून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीस प्रत्येकी ५० लाखांची मदत

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांचे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान सहायता निधीसाठीही फाऊंडेशन तर्फे ५० लाख रुपयांची मदत दिली आहे. या विषयी ची मााहिती अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्विटर द्वारे कळवली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय @OfficeofUT @CMOMaharashtra उद्धव ठाकरेजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ५० लाख रुपयांचं योगदान करत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा सामना करण्याची सामाजिक जबाबदारी ओळखून माननीय @OfficeofUT @CMOMaharashtra उद्धव ठाकरेजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाम फाउंडेशन ५० लाख रुपयांचं योगदान करत आहे. https://t.co/ZlWliTc4rO

Read more...

डॉ. कोल्हे यांची हेल्पलाईनच्या माध्यमातून विविध नागरिकांना मदत 

डॉ. कोल्हे यांची हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना मदत

– विषाणू प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याचा प्रशासनाला सल्ला

 

सजग वेब टिम,भोसरी

भोसरी | ‘कोरोना’च्या पार्श्र्वभूमीवर गरजूंना मदत करा, आपापल्या भागात विषाणू प्रतिबंधक औषधांची फवारणी करून जनतेला आधार द्या अशा सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आपल्या सहकाऱ्यांना दिले. त्यांनतर ठिकठिकाणी त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रीय झाल्याचे दिसून आले.

काल रविवारच्या दिवशी शहराध्यक्ष संजोग वाघेरे व उपाध्यक्ष आतिश बारणे यांच्या उपस्थितीत सभापती विजय लोखंडे यांनी मोशी प्राधिकरण परिसरातील विविध भागात जाऊन ठिकठिकाणी ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याचा उपक्रम राबविला. त्याचबरोबर जनतेसाठी २४ तास सेवा बजावणाऱ्या पोलीसांची पण काळजी घेण्याच्या खासदार डॉ. कोल्हे यांच्या सूचनेची अंमलबजावणी करत भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्येही ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात आली. या उपक्रमात सागर कोल्हे, मोहित शेठ दोडिया, डॉ. महेश शिरसाळकर, संजय परब, गायकवाड सर व श्री राजेंद्र कुमठे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच
सर्व सोसाट्यांमधील नागरिक सहभागी झाले होते.

त्याचबरोबर खासदारांनी उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधणाऱ्या खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथील एका कंपनीत काम करणाऱ्या मध्यप्रदेशातील आलेल्या सुमारे ३५-४० कामगारांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे या कामगारांसाठी केंद्रीयमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी स्वत: खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री. नौशाद शेख यांची रक्ताची तातडीची गरज भागवण्यासाठी रक्तपेढीच्या माध्यमातून रक्त पुरवठा करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयामार्फत मदत करण्यात आली. त्याखेरीज शिरूर तालुक्यातील मुखई येथे गेले चार दिवस वीज पुरवठा बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. याबाबत हेल्पलाईनवर तक्रार येताच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीज पुरवठा सुरू करून या गावातील लोकांचा प्रश्न सोडवण्यात आला.

गेल्या दोन दिवसांपासून खासदार डॉ. कोल्हे यांनी उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईनवर दिवसभर गरजू नागरिकांकडून संपर्क साधण्यात येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यातील अन्य भागातील नागरिकही त्यांच्या कामांसाठी संपर्क साधत आहेत. या गरजू लोकांना मदत करण्यासाठी खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयातील त्यांचे सहकारी तत्परतेने सहाय्य करीत आहेत. खासदार डॉ. कोल्हे यांनी हेल्पलाईन सुरु केल्याबद्दल अनेकांनी आभार मानले आहेत.

Read more...

शिरूरमधील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात थांबावे – विजयसिंह नलावडे

शिरूरमधील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात थांबावे – विजयसिंह नलावडे

शिरूर |आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिरूर शहर व ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी गावकामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सोसायटी सचिव, कोतवाल व पोलीस पाटील यांनी पूर्णवेळ आपापल्या कार्य क्षेत्रात थांबून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याबाबत शिरूरच्या तहसीलदार श्रीमती लैला शेख यांनी दिनांक २७/०३/२०२० रोजी आदेश काढून सूचना दिल्या आहेत.गावातील मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल याचे तपासणी पथक तयार करून गावाबाहेरील लोकांची चौकशी करावी.

शासन स्तरावरून येणाऱ्या आदेशाची नागरिकांना माहिती द्यावी. कार्य क्षेत्रात पूर्ण वेळ थांबावे व विनापरवानगी कार्यक्षेत्र सोडू नये असे आदेश असताना सुद्धा ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सोसायटी सचिव या आदेशाचे पालन करताना दिसत नाही. या बाबत विचारणा केली असता, अनेक ग्रामसेवक व तलाठी यांना दोन – तीन गावे असल्यामुळं आम्ही तरी या आदेशाचे पालन कसे करणार.असे सांगण्यात येत आहे. तर तालुक्यातील अनेक अधिकारी गावाकडे फिरकलेच नाहीत. “ग्रामसेवक जर गावात थांबले नाहीत तर कारवाई केली जाईल.”असा ईशारा शिरूरचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी दिला आहे.

ग्रामीण भागात पुणे, मुंबई व इतर शहरातून आलेल्या नागरीकांची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे आवश्यकती दखल न घेतल्यास ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अश्या परिस्थितीत तहसीलदारांनी काढलेला आदेश हा कागदावरच आहे का? असा सवाल ग्रामीण भागातील नागरीकांकडून व्यक्त केला जात आहे. तर या घटनेची दखल घेत प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Read more...

जुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

जुन्नर तालुक्यात हाय अलर्ट; डिंगोरे येथील १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | कोरोना च्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात काल आणि आज कोरोनाचा धुमाकूळ चालू झाला आहे. काल राजुरी गावातील १ संशयित रुग्ण पुणे याठिकाणी पाठविण्यात आला होता. त्यांनंतर आता डिंगोरे याठिकाणी मुंबईकहून गावी आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या व्यक्तीच्या घरातील १३ जणांना पुणे याठिकाणी कोरोना विषाणूची चाचणी आणि तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे अशी माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी फोनवरून कळवली आहे.

गेल्या दोन दिवसांत तालुक्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. प्रशासनाने कडक भूमिका घेत कुणीही घराबाहेर न पडण्याच्या सूचना सर्व नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

आळेफाटा, आळे, संतवाडी, राजुरी, बेल्हे ते आणे पर्यंत ची गावे बफरझोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर नारायणगाव आणि वारूळवाडी या दोन मोठ्या गावांमध्ये सकाळी ६ ते ८ यावेळेत फक्त दूध संकलनासाठी लोकांना बाहेर पडता येईल अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Read more...

खा.अमोल कोल्हे यांच्या फोनमुळे मिळाली आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत

खा.अमोल कोल्हे यांच्या फोनमुळे मिळाली आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत

सजग वेब टिम, पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड (दि.२७) | पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर भागातील दादाजी नानाजी सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याने सुर्यवंशी कुटुंबांचा आधार हरपला व कर्ता पुरुष गेल्याने हे कुटुंब अडचणीत आले होते.

सदर कुटुंबाविषयीची दु:खद बातमी फोनवरुन समजल्यानंतर शिरुर लोकसभेचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी तात्काळ माजी आमदार विलास लांडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आतिश बारणे यांच्याशी संपर्क साधुन सदर घटना सांगत मदत करण्यास सांगितले.

खा.कोल्हे यांच्या फोनमुळे आतिश बारणे यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करत सुर्यवंशी कुटुंबियाला किराणा माल भरुन देत मदतीचा हात पुढे केला. यामुळे सदर कुटुंबियांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष, खा.डाॅ.अमोल कोल्हे, शहर उपाध्यक्ष आतिश बारणे, मा.आ.
विलास लांडे यांचे आभार मानले.

Read more...

नारायणगाव येथे संचारबंदीचा भंग करुन माॅर्निग वाॅक करणाऱ्या ४ जणांवर गुन्हे दाखल

नारायणगाव येथे संचारबंदीचा भंग करुन माॅर्निग वाॅक करणाऱ्या ४ जणांवर गुन्हे दाखल

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव । नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दी मध्ये सकाळी ६ च्या सुमारास संचारबंदी अनुशंघाने स.पो.नि.घोडे पाटील, पो.हवा कोकणे, पो.कॉ गारगोटे, पो.कॉ.सांळूखे हे नारायणगावामध्ये पेट्रोलींग करित असताना राजेंद्र अशोक भिसे (रा येडगाव,ता जुन्नर, जि पुणे), महेश रामदास वाणी (रा.हनुमान चौक, ता जुन्नर जि. पुणे), प्रणव उत्तम दोंदे (रा खोडद रोड नारायणगाव, ता. जुन्नर जि पुणे), विवेक बाजीराव मानव (रा.नारायणगाव ता जुन्नर जि पुणे) हे संचार बंदीचा आदेश झुगारून विनाकारण फिरताना मिळुन आल्याने त्यांना बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता मॉर्निग वॉकला आलोय, सहज फिरतोय, असेच आलोय अशी उत्तरे दिली.

सदर कृती संचार बंदीचा आदेश झुगारून या व्यक्ती विनाकारण फिरताना मिळून आल्याने त्याचे विरूध्द भा.द.वि.कलम १८८ प्रमाणे पो.कॉ.योगेश गारगोटे यांनी फिर्याद दिली असून संबंधीत इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.फौ.ढमाले, पो.ना.कोबल हे करत आहे.

नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, अत्यावश्यक वस्तुची खरेदी करण्यासाठी फक्त एक इसमाने बाहेर पडावे, अत्यावश्यक सेवा बाबत फोन करून घरपोच सेवा उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे न केल्यास कायदेशिर कारवाई होवून गुन्हे दाखल करण्यात येतील असे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले.

Read more...

कोरोना संदर्भात प्रशासन सतर्क; तालुक्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष – आ. अतुल बेनके

कोरोना संदर्भात प्रशासन सतर्क; तालुक्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष – आ. अतुल बेनके

खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची उद्या बैठक

जुन्नर | पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज व्हिडीओ कॉन्फिरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील कोरोना विषाणू संदर्भातील परिस्थिती चा आढावा घेतला. या कॉन्फिरन्सिंग मध्ये जिल्ह्यातील २१ आमदारांपैकी जुन्नर चे आमदार अतुल बेनके हे एकमेव आमदार सहभागी होते. या दरम्यान बेनके यांनी प्रसाद यांच्याशी कोरोना संदर्भात विविध विषयांवर चर्चा केली. तसेच जुन्नर तालुक्यातील प्रशासकीय तयारी तसेच कामकाजाचा आढावा या संदर्भात चर्चा केली. तालुक्यातील प्रशासनाचा आढावा घेतल्यानंतर प्रसाद यांनी ‘जुन्नर पॅटर्न’ चे कौतुक करत संपूर्ण जिल्हाभर याचा अवलंब करण्याच्या सूचना याप्रसंगी इतर अधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी मी सतत संपर्क साधत आहे तसेच परिस्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. उद्या सकाळी १० वा. तालुक्यातील खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची बैठक बोलावली आहे असे जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी सजग टाईम्स शी बोलताना सांगितले.

कोरोना विषाणू संदर्भात आज तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज आमदार बेनके उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यात पुणे, मुंबई इतर शहरे तसेच विदेशातून येणाऱ्या लोकांची माहिती घेण्याचं काम आशा वर्कर्स गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. या माहितीनुसार आरोग्य विभागास लोकांचे विलगीकरण करणे सोपे जाते.

संपुर्ण जुन्नर तालुक्यात बाहेरच्या ठिकाणांहून आलेल्या लोकांची संख्या हि तब्बल १२००० इतकी आहे. यातील लहान घर असणाऱ्या लोकांसाठी ओझर, लेण्याद्री याठिकाणी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था स्वतंत्र कक्ष स्थापन करून करण्यात आली आहे. या संदर्भात प्रशासन आणि इतर विभाग मदत करत आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा मी वेळोवेळी घेत आहे. मी तालुक्यातील यंत्रणेशी सतत संपर्कात आहे. या कामात कुठलाही हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा होणार नाही याची दक्षता प्रशासन पातळीवर घेण्यात यावी अशा कडक सूचना यानिमित्ताने संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील सर्व परिस्थिती हाताळण्यास प्रशासन यंत्रणा सज्ज आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे अशी माहिती यावेळी आमदार बेनके यांनी दिली.

आजच्या या बैठकीत आमदार बेनके, तहसीलदार कोळेकर, तालुका विकास अधिकारी विकास दांगट, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच इतर विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Read more...

घोड, कुकडी व सीना विसापूर च्या प्रकल्पांचे आवर्तन सुरळीत व्हावे – हेमंत धुमाळ ( अधीक्षक अभियंता)

घोड, कुकडी व सीना, विसापुर प्रकल्पाच्या कालव्यांवरील लाभधारक शेतकऱ्यांना अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांचे आवाहन

सजग वेब टिम, पुणे

पुणे, दि.२५ | करोनाच्या पार्श्वभुमीवर घोड, कुकडी व सीना, विसापुर या प्रकल्पाच्या कालव्यांवरील लाभधारक शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी केले आहे.

घोड, कुकडी व सीना, विसापुर या कालव्यांचे ऊन्हाळी आवर्तने चालु आहेत. शेतकऱ्यांसाठी, शासनाने आजच्या बाजारभावाप्रमाणे २० ते २५ हजार कोटी रूपये निधी खर्च करून हे प्रकल्प बांधले आहेत. मागील आवर्तन काळात व आवर्तनापूर्वी बैठका घेऊन यामध्ये हे प्रकल्प जपण्याचे व आवर्तन सुरळीत होण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यास सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला.

मागील आवर्तनामधे अपुरा कर्मचारी वर्ग, कालव्यांची अपुरी वहन क्षमता व अन्य मर्यादा असताना देखील पाण्याची बचत करून सर्वांना वेळेत व पुरेसे पाणी दिले आहे.

यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. लाभधारक शेतकऱ्यांच्या सहभागावर कुकडीचे असे आवर्तन करून एक आदर्श घालुन दिलेला आहे. याबाबत लाभधारक शेतकरी व कुकडीचे कर्मचारी वर्ग यांचा सार्थ अभिमानही आहे.

सर्व जग करोनाच्या विळख्यात सापडलेले आहे. सगळीकडे जमावबंदी आहे, अशा स्थितीत
कुकडीचे अधिकारी/ कर्मचारी कुटुंबापासुन / गावापासून सर्वांसाठी अहोरात्र ही अत्यावश्यक सेवा देत आहेत.

त्यांना नियोजना मध्ये नियंत्रणामध्ये काही बाधा येईल असे अनधिकृत कृत्य कोणाकडून होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोठेही अनुचित प्रकार होताना आढळल्यास त्वरित जवळच्या शाखा कार्यालयास अथवा पोलीस स्टेशन ला कळवावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी केले आहे.

करोना विषाणु संकटाच्या पार्श्वभुमीवर हे आवर्तन सुरळीत पार पाडुया, असेही श्री. धुमाळ यांनी म्हटले आहे.

Read more...

कोरोनाच्‍या दोन व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज – विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

कोरोनाच्‍या दोन व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज- विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

सजग वेब टिम, जुन्नर

पुणे, दि. २५ | जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या पहिल्‍या ज्‍या दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, त्‍यामुळे आज त्‍यांना डीस्‍चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे तीन पेशंट अॅडमिट झाले होते, त्‍यांच्‍या पहिल्‍या टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, आज त्‍यांच्‍या दुस-या टेस्‍ट घेत आहोत, त्‍या निगेटीव्‍ह आल्‍या तर त्‍यांना उद्या डिस्‍चार्ज दिला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. गुढीपाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देतांनाच सर्वांच्‍या मदतीने कोरोनावर मात करु, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

पुणे विभागातील कोरोनाच्‍या सद्यस्‍थ‍ितीची माहिती देतांना विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, पुणे विभागात एकूण ८२५ नमुने घेतले होते, त्‍यापैकी ७३७ चे अहवाल प्राप्‍त झाले. यामध्‍ये ६९२ अहवाल निगेटीव्‍ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ ९० टक्‍के अहवाल निगेटीव्‍ह आलेत, ही समाधानाची बाब आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. त्‍याचे नागरिकांनी कुठेही उल्‍लंघन करु नये, असे आवाहन करुन ते म्‍हणाले, या २१ दिवसांत आपल्‍या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करु शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषधी, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचवण्‍याचा आमचा आटोकाट प्रयत्‍न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

आरोग्‍य यंत्रणेने पहिले दोन पेशंट बरे व्‍हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच विभागाच्‍या इतर जिल्‍ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करीत आहे, या सर्वांचे त्‍यांनी कौतुक केले. तसेच काही कर्मचारी आदेशाचे उल्‍लंघन करुन निघून जात असतील तर त्‍यांच्‍यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. म्‍हैसेकर यांनी दिला. या संकट समयी कुठेही डगमगून जावू नका, आपण सर्व एकत्र मिळून कोरोनावर मात करु या, असे आवाहन करुन स्‍वत:ला सुरक्षित ठेवा, त्‍याच बरोबर सगळयांना सुरक्षित ठेवा, असेही ते म्‍हणाले.

Read more...

२१ दिवसांच्या ‘लॉक डाऊन’च्या काळातही जीवनावश्यक सेवा सुरळीत राहील – डॉ.म्हैसेकर

२१ दिवसांच्या ‘लॉक डाऊन’च्या काळातही जीवनावश्यक सेवा पूर्वी प्रमाणेच सुरळीत राहील
-विभागीय आयुक्त डाॕ.म्हैसेकर

सजग वेब टिम, पुणे

पुणे | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसाचा ‘ लॉक डाऊन’ जाहीर केला असला तरी या काळात सर्व जीवनावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

जनता कर्फ्यूच्या काळात तसेच राज्यात लागू असलेल्या कलम १४४ च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. २१ दिवसाच्या ‘लॉक डाऊन’च्या घोषणेमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यासह जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. विनाकारण दुकानात गर्दी करू नका.कोणीही घाबरू नये. सर्व आवश्यक ती खबरदारी घ्यावी. घराबाहेर पडू नये . कोरोनाविरोधात आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे , असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read more...
Open chat