नारायणगावचे विशाल दिलीप भुजबळ यांचा “राष्ट्रीय युथ आयकॉन 2020 पुरस्कार” ने सन्मान

नारायणगावचे विशाल दिलीप भुजबळ यांचा “राष्ट्रीय युथ आयकॉन 2020 पुरस्कार” ने सन्मान

केंद्रीय मानव संसाधन व सूचना, प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सजग वेब टीम

नवी दिल्ली । नवी दिल्ली येथे कार्यरत असलेले पुणे जिल्ह्यातील नारायणगांंवचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रनिर्माण युवक संघाचे सर्वेसर्वा विशाल दिलीप भुजबळ यांना राष्ट्रीय युथ फेडरेशनचा नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा “राष्ट्रीय युथ आयकॉन” हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला वाय.एम.सी.ए. ऑडिटेरियम नवी दिल्ली येथे केंद्रीय मानव संसाधन व सूचना, प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (more…)

Read more...

समानतेचे प्रतिक अन्‌ महिलांचे प्रेरणास्थळ ‘फुलेवाडा’ची भोसरीत प्रतिकृती

समानतेचे प्रतिक अन्‌ महिलांचे प्रेरणास्थळ ‘फुलेवाडा’ची भोसरीत प्रतिकृती

इंद्रायणी थडी जत्रेत मनोरंजनासह सामाजिक प्रबोधनाचा प्रयत्न

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा

सजग वेब टीम भोसरी

भोसरी । महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’मध्ये मनोरंजन अन्‌ खाद्य महोत्सवासह प्रबोधनावरही भर दिला आहे. जातीय समानता प्रस्तापित करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि शिक्षणाचे दरवाजे खुले करुन महिला सक्षमीकरणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणाची प्रवासाची साक्ष असलेला ऐतिहासिक ‘फुलेवाडा’ची प्रतिकृती या जत्रेत साकारली जाणार आहे. त्यामुळे ही जत्रा महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ भरविण्यात येणार आहे.  दि. ३०, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रवारी २०२० असे चार दिवस, सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे. विशेष म्हणजे, ही जत्रा सर्वांसाठी विनामूल्य आहे.

शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा महेश लांडगे म्हणाल्या की, महिला सक्षमीकरणाच्या हेतूने आम्ही ही जत्रा सुरू केली आहे. जत्रेचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी आम्ही ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी ‘थीम’ ठेवली आहे. माझ्यामते, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्याचवेळी खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला सुरूवात झाली होती. सावित्रीबाईंच्या त्यागामुळे आज आम्ही समाजात ताठ मानेने वावरत आहोत. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षामुळेच आज प्रत्येक आघाडीवर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालू शकतो. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचे प्रतिक आणि आम्हा सर्वांचे प्रेरणास्थळ म्हणून ‘फुलेवाड्याची’ ओळख आहे. हा वाडा पुण्यात आहे. त्याची प्रतिकृती ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत उभारुन समाजिक समानता आणि स्त्री-शिक्षणाचा संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.

जत्रेत आधुनिकतेला परंपरा अन्‌ संस्कृतीची जोड : आमदार महेश लांडगे

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘इंद्रायणी थडी’ ही सर्वसमावेशक असावी, असा हेतू आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण हा मूळ हेतू असला, तरी समाजप्रबोधन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या जत्रेमध्ये अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, ‘रामायण’वर आधारीत महाराष्ट्रातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘लेझर शो’, धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, ग्राम संस्कृती, गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, स्व-संरक्षणाचे धडे, परंपरिक नृत्य स्पर्धा अशा विविध माध्यमातून आधुनिकतेच्या काळात पारंपरिकता आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. यासह महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय आणि त्यांनी दिलेली समानता आणि महिला शिक्षणाची शिकवण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही जत्रेत ‘फुलेवाडा’ साकारला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
मनिषा थोरात : 9834138482.

Read more...

शेतकर्‍यांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार – कृषीमंत्री दादा भुसे

शेतकर्‍यांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार – कृषीमंत्री दादा भुसे

कृषीमंत्री भुसे यांनी घेतला राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा

सजग वेब टिम, पुणे 

पुणे । शेतकरी संशोधन करून नावीण्यपूर्ण प्रयोग करतात, अशा शेतक-यांच्या यशोगाथा इतर शेतक-यासांठी नक्कीच प्रेरणादायी आहेत, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांने प्रोत्साहन द्यावे, शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासोबतच चिंतामुक्त करणार असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज केले.

पुणे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषीमंत्री श्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद व राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कृषी परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने, संशोधन संचालक हरिहर कौसडीकर आदींसह चारही कृषी विद्यापिठाचे प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्रबिंदू शेतकरी असल्याचे सांगून भुसे म्हणाले, शेतक-यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कृषी विभागासह कृषी विद्यापीठांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. देशपातळीवर शेतीसबंधी सुरू असलेले नवीन संशोधनही उपयुक्त ठरणार आहे, शास्त्रज्ञांनी शेतक-यांना आवश्यक असलेल्या संशोधनावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांच्या संशोधन कार्याला निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सर्वच तालुक्यात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून प्रत्येक तालुक्यात या केंद्राची स्थापना तातडीने करावी, अशी सूचना करून श्री भुसे म्हणाले, अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यातील बिजमाता राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणे संवर्धन, नगर तालुक्यातील शेतकरी विष्णू जरे यांनी लसणाच्या वाणाचे संशोधन केले आहे. पालघर जिल्हयात महिला अत्यंत चांगल्या पदधतीने मोगरा फुलशेती करतात, अशा प्रयोगशील शेतक-यांना कृषी विद्यापीठांनी प्रोत्साहन देत मदत केली पाहीजे. कृषी विद्यापीठांचे संशोधन शेतक-यांना बांधावर पोहचण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांनी समन्वयाने काम करावे, असेही श्री भुसे यांनी सांगितले.

विदर्भ, मराठवाडयासह राज्यातील शेतक-यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अधिकचा भर द्यावा लागणार असल्याचे सांगून श्री भुसे म्हणाले, कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योग,भाजीपाला शेती वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनेही संशोधन अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी मदत होणार आहे. सर्व मिळून समन्वयाने काम करून शेतक-यांच्या जीवनात आनंद निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला , डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ- दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित होते.

Read more...

आमदार बेनके यांनी घेतला चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्पाचा आढावा

आमदार बेनके यांनी घेतला चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्पाचा आढावा

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव दि.२० | जुन्नर तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील कृषी सिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प म्हणजे चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्प. आमदार अतुल बेनके यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात हा प्रकल्प पूर्ण करू आणि तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नी दिलासा देऊ असा शब्द निवडणुकीत दिला होता.

याचपार्श्वभूमीवर या चिल्हेवाडी धरण बंदपाईपलाईन प्रकल्पाचा बेनके यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

चिल्हेवाडी पाचघरचा प्रकल्प हा माजी आमदार वल्लभ बेनके यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, हा प्रकल्प आपण प्राधान्याने पूर्ण करणार आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाणी पोहचवणार असे बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सदर पाईपलाईनच्या कामाच्या संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत तसेच जि. प. सदस्य पांडुरंग पवार साहेब यांच्यासह बैठक घेऊन बेनके यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला.

या बैठकीत आमदार बेनके यांनी प्रकल्पाची सखोल माहिती घेतली. कामाची सध्याची स्थिती, धरणालगतचे पाण्याचे पाईपलाईन मधून पाण्याचा होणारा विसर्ग व शेवटच्या टोकापर्यंत मिळणारे पाणी, एकूण वितरिका, लाभक्षेत्रातील गावांसाठी मिळणारं पाणी, आवर्तनाचा कालावधी, भिजणारं लाभक्षेत्र, प्रलंबित काम पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी या सर्वच बाबींचा अाढावा काल आमदार बेनके यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला.

नारायणगाव याठिकाणी झालेल्या या बैठकीत अशोकनाना घोडके, प्रदीपजी पिंगट, विजय कुऱ्हाडे, जयरामशेठ भुजबळ, रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश तिकोणे , मयुर मनोहर गुंजाळ, पंढरी गुंजाळ माजी (शाखा अभियंता जलसिंचन) आदी मान्यवर उपस्थित होते.

Read more...

कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे

कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१९ | संसदीय हिवाळी अधिवेशनात शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भ्रूपुष्ट मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन तीर्थक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी भीमाशंकरला जाणारा मार्ग हा राष्ट्रीय दर्जाचा व्हावा असे निवेदन दिले होते.
तीर्थक्षेत्र भीमाशंकर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी येण्यासाठी माहामार्गची नितांत आवश्यकता आहे , राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यामुळे या ठिकाणीच्या पर्यटनास निश्चितच चालना मिळेल , पर्यटनवृद्धीमुळे या भागातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोबतच मुंबईला जाण्यासाठी वेळेची बचत होईल, या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा मिळवा अशी मागणी केली होती.
खा.डॉ अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीला केंद्रिय मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे कर्जत-भीमाशंकर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषित करण्यासाठी व तसेच या संबधी राज्यमार्ग मंत्रालय सचिव यांना कळविले आहे , महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र डॉ कोल्हे यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.

Read more...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या फोटोची सर्वत्र चर्चा, कौतुकाचा वर्षाव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या फोटोची सर्वत्र चर्चा, कौतुकाचा वर्षाव

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई दि.१९| प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर दाखविणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका कृतीची सांगली भागात चर्चा आहे. निमित्त होतं इस्लामपूरमधल्या वाळवा तहसील कार्यालयाच्या नव्या, देखण्या वास्तूच्या उद्घाटनाचे !

मुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. इस्लामपूरमधील वाळवा तहसील कार्यालयाच्या एका सुंदर इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. स्वातंत्र्य लढ्यात ज्या गावातील प्रत्येक घराणे आपले योगदान दिले असे हे वाळवा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंदोलनकर्त्यांचे हक्काचे ठिकाण असलेल्या कचेरीच्या परिसरातच उभारण्यात आलेली ही इमारत म्हणजे नव्या युगातील प्रशासनाचे प्रतीक ठरावी अशीच आहे. तर अशा या इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांचे सायंकाळी आगमन झाले.

उद्घाटन झाल्यावर लगेच होणाऱ्या जाहीर सभेसाठी लोकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच इतर मंत्री व राज्यमंत्री यांच्यासमवेत आगमन झाले आणि लगोलग हे सर्व जण तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या दाराजवळ गेले. फीत वगैरे कापून मग रितीप्रमाणे मुख्यमंत्री व सर्व मान्यवर या इमारतीतील दालनांची पाहणी करू लागले. वरच्या मजल्यावरच बैठक सभागृह पाहून मुख्यमंत्री सर्वात शेवटी खालच्या मजल्यावरील तहसीलदारांच्या दालनापाशी आले. इमारतीतील हे प्रमुख कार्यालयच असल्याने स्वाभाविकच आतमध्ये येऊन त्यांनी कार्यालयाची रचना पाहायला सुरुवात केली.

समोर तहसीलदारांची खुर्ची होतीच. त्यात थोडसं बसून अचानक ते उठले आणि थोड्या दूरवर उभ्या असलेल्या तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हाताला पकडून खुर्चीपाशी आणले आणि काही कळायच्या आत त्यांना फर्मावले “ तुम्ही तहसीलदार ना? मग ही खुर्ची तुमची आहे…बसा इथे “ खुद्द मुख्यमंत्री प्रेमळ शब्दांत आदेश देत आहेत, तिथे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मंत्री, राज्यमंत्री उपस्थित आहेत त्यामुळे साहजिकच गांगरलेल्या सबनीस यांनी मुख्यमंत्र्यांना नम्रपणे मी बसू शकत नाही असे सांगितले. पण मुख्यमंत्र्यांनी ठरवलेच होते. “ ही तुमची इमारत आहे, याठिकाणी तुम्ही प्रमुख म्हणून काम पाहणार आहात,ही तुमची खुर्ची आहे. या खुर्चीवर माझ्या हस्ते तुम्हाला स्थानापन्न करायचे आहे” असे मुख्यमंत्र्यांनी आग्रहाने सांगितल्यावर मग सबनीस यांचा नाईलाज झालं आणि ते त्या खुर्चीवर बसले. “ या महत्वाच्या पदावर तुम्ही आहात. तुम्हाला मी स्वत: बसवले आहे त्यामुळे काम पण चोखपणेच करा “असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांची पाठ थोपटली.

या इमारतीच्या बाहेर एक फार जुने कडूनिंबाचे झाड होते. या झाडाला वाळव्यातील नागरिक स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार मानत, त्याला त्यांनी तोडूही दिले नव्हते मात्र नंतर त्याचे दुसरीकडे पुनर्रोपण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना या झाडाविषयी अगोदरच माहिती देण्यात आली होती. त्या झाडाच्या जागेपाशी काही काळ थांबून मुख्यमंत्री सोबतच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या लवाजम्याला म्हणाले “ कडूनिंबाच्या या झाडाप्रमाणे वागा, खूप सावली द्या, आणि या झाडासारखे प्रेम मिळवा. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना समजावून घ्या”

“ मुख्यमंत्री उद्घाटन करून तिथून निघूनही गेले, पण तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा या नवीन दालनातल्या माझ्या खुर्चीवर बसतो,मला शेजारी राज्याचे मुख्यमंत्री खुद्द उभे आहेत असा भास होतो” रवींद्र सबनीस सांगत होते. मुख्यमंत्र्यांचा विनयशीलपणा आणि दिलेल्या योग्य सन्मानामुळे केवळ तहसीलदार सबनीसच नव्हे तर तेथील सर्वच कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी अधिकच वाढली आहे याची जाणीव झाली.

Read more...

पुणे- नाशिक महामार्ग बायपाससाठी एकूण २१६ कोटी रुपये मंजूर : खा.डॉ अमोल कोल्हे

पुणे- नाशिक महामार्ग बायपाससाठी एकूण २१६ कोटी रुपये मंजूर : खा.डॉ अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१८| शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी या विभागाचे खा.डॉ.अमोल कोल्हे प्रयत्नशील आहेत असं दिसतं आहे. कोल्हे यांनी आपल्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या भाषणात लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर आवाज उठवला होता, त्यानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशनात तोच प्रश्न उपस्थित केला. भृपुष्टमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात लेखी निवेदनही त्यांनी दिले होते. याचेच फलित म्हणून खेड-सिन्नर महामार्गात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होणाऱ्या खेड बायपास , मंचर-एकलहरे,पेठ याठिकाणी बायपास करण्यासाठी २१६ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
यामध्ये एकूण १४.१३७ किमी
प्रस्तावित खेड बायपास (किमी ४२ ते किमी ४६.९८) , पेठ (किमी ५६.१००ते ५६७८०)मंचर-एकलहरे बायपास (किमी ६०.१०० ते ६८.५७६) साठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच पुणे-नाशिक महामार्ग लवकरच वाहतुक कोंडीपासून मुक्त होईल असा विश्वास खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
सदर बायपास हा ४ पदरी असेल यातील फेज-१ साठी खेड-सिन्नर महामार्ग पूर्ण करण्यासाठी २ वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल , लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Read more...

शिरुर लोकसभेच्या विकासासाठी लवकरच मेट्रो लोणी काळभोर पर्यंत : खा.डॉ अमोल कोल्हे

शिरुर लोकसभेच्या विकासासाठी लवकरच मेट्रो लोणी काळभोर पर्यंत : खा. डॉ अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१७ | स्वारगेट ते हडपसर येथील हडपसर ऐवजी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार , खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या.
शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेली विविधविकास कामांचा याठिकाणी आढावा घेण्यात आला.

स्वारगेट ते हडपसर येथील हडपसर ऐवजी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या.
ना अजितदादा पवार ,डॉ कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेली विविधविकास कामे , नव्याने सुरू करावयाची कामे याचा आढावा घेण्यात आला.

हडपसर भागात होणारे ट्राफिक समस्या दूर करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे ट्राफिक निश्चितच कमी होईल व शिरूर लोकसभेचा विकास होण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरेल . यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना अजितदादा पवार , खासदार डॉ आमोल कोल्हे , हडपसरचे आमदार श्री चेतन तुपे , खेडचे आमदार श्री दिलीप मोहिते पाटील,महानगर आयुक्त श्री विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दिक्षित व अधिकारी वर्ग उपस्थित होता .

Read more...

शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

“कृषिक २०२०” प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१६ | शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपारिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

 

शारदानागर-माळेगाव ता. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित “कृषिक 2020” प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, इस्राईलचे आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते सल्लागार दूत डॅन अलुफ, सिने अभिनेते अमिर खान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, डॉ सुहास जोशी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्हणाले, कृषिक प्रदर्शन हे प्रात्यक्षिकासह असणारे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अभिमान वाटावे असे काम झाले आहे. माळरानावर नंदनवन फुलले आहे. जग झपाट्याने बदलत असून विविध क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपला देश हा शेती प्रधान असून शेती हाच आपला मुख्य कणा आहे. देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक नैसर्गिक संसाधनांवर ताण आला आहे. सर्वजण पोटात अन्न जावे म्हणूनच काम करत असतात. या सर्वांना जगविण्याचे काम शेतकरी करतो.

मानव कोणतीही गोष्ट तयार करु शकतो, मात्र पाणी निर्माण करू शकत नाही असे सांगत मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले,भविष्याचा विचार करून आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. हे नियोजन झाल्यास शेती समृद्ध होईल. आता माती विना शेती आणि हवे वरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्याच प्रमाणे व्हर्टिकल शेतीचेही प्रयोग सुरु आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्कार होत असतात, शेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील. महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की दिशा दाखवेल, असा विश्वास व्यक्त करत शेतीसाठी आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट शासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खा.शरद पवार म्हणाले, “कृषिक”च्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. जगाची शेती बदलत आहे. त्यामुळे उत्पादकता वाढत आहे. या क्षेत्रात सातत्याने सुधारणा, बदल आणि संशोधन करणे आवश्यक आहे. देशात उपयुक्त संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहीत करण्याची भूमीका राज्य शासन नक्की घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृषी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तेथील विविध शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधला.

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचाली विषयीची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. सुहास जोशी आणि डॉ. मई नाऊ यांनी “दुष्काळ निवारण कृती आराखडा” या विषयावरील शास्त्रीय संकल्पनेचे सादरीकरण केले. यावेळी डॅन अलुफ यांचे भाषण झाले. सिनेअभिनेते आमीर खान यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात आला. प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वाटचालीची माहिती दिली.
या कार्यक्रमाला देशभरातील कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यार्थी प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read more...

सरपंच योगेश पाटे यांचा “पर्यावरण रक्षक सन्मान २०२०” पुरस्कार देऊन गौरव

सरपंच योगेश पाटे यांचा “पर्यावरण रक्षक सन्मान २०२०” पुरस्कार देऊन गौरव

जलपुरुष राजेंद्रसिंह राणा, महात्मा गांधींचे वंशज अरुण गांधी, तुषार गांधी यांच्या हस्ते गौरव

सजग ब्युरो, राजस्थान

राजस्थान (अलवर) | जुन्नरकरांसाठी अभिमानाची बातमी तरुण भारत संघ राजस्थान संघाकडुन दिला “पर्यावरण रक्षक सन्मान २०२०” पुरस्कार नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांना जलपुरुष राजेंद्रसिंह राणा, महात्मा गांधी यांचे पुतणे अरुण गांधी आणि तुषार गांधी यांच्या हस्ते राजस्थान येथील तनागाझी जिल्हा अलवर येथे प्रदान करण्यात आला.

यावेळी ज्ञानेश्वर अौटी, आरिफ आतार, गणेश पाटे, राजेश बाप्ते, धर्मेंद्र गुंजाळ, भागेश्वर डेरे, जयेश कोकणे, संदिप मुळे, अनिल खैरे, इश्वर पाटे, आकाश कानसकर, किरण ताजणे, अक्षय वाव्हळ, अजय पाटे यांसह सरपंच पाटे यांचा मित्रपरिवार व सहकारी यांसह विविध राज्यातुन आलेले पुरस्कारार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read more...
Open chat