निसर्ग संवर्धन शिकविणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज :डॉ राजेंद्रसिंह

निसर्ग संवर्धन शिकविणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज :डॉ राजेंद्रसिंह

‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१९’ चे वितरण

पं.वसंत गाडगीळ,डॉ.विवेक सावंत, सरफराज अहमद,जांबुवंत मनोहर,सतीश शिर्के,सतीश खाडे यांचा
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते सन्मान 

सजग वेब टिम, पुणे

पुणे (दि.२६)| ‘भूगर्भातील ७२ टक्के पाणी संपले आहे, देशातील २६५ जिल्हे दुष्काळी झाले आहेत ,रिझर्व्ह बँकेतील संचय कमी होत असल्याच्या काळजीपेक्षा भूगर्भातील पाण्याची ‘वॉटर बॅंक’ संपत असल्याची काळजी करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रगती -विकासासाठी निसर्ग शोषण शिकविणाऱ्या शिक्षण प्रणाली ऐवजी निसर्ग संवर्धनावर भर देणारी शिक्षणप्रणाली आणली पाहिजे ,त्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युएकेशन सोसायटीने पुढाकार घ्यावा’,असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी बुधवारी पुणे याठिकाणी केले.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारया ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी सकाळी आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे जलतज्ञ डॉ राजेंद्रसिंह यांच्या हस्ते पार पडला .त्यावेळी डॉ. राजेंद्रसिंह बोलत होते. या सन्मान सोहळ्याचे हे अकरावे वर्ष आहे

पंडित वसंत गाडगीळ (संस्कृत प्रसार आणि सर्वधर्मीय सलोख्यासाठी योगदान),डॉ.विवेक सावंत(ग्रामीण भागातील रोजगारासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर),सरफराज अहमद(इतिहास संशोधन),जांबुवंत मनोहर(युवक क्रांती दलाच्या माध्यमातून आंदोलनात्मक काम),सतीश शिर्के(साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकच्या माध्यमातून बालकांवर संस्कार),सतीश खाडे(ग्रामीण भागातील जलसंधारण) यां मान्यवरांना ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ पारितोषिक देवून गौरविण्यात आले .

आझम कॅम्पस परिवारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ पारितोषिक देऊन डॉ.अनिता फ्रान्त्झ आणि शबनम शोएब सय्यद यांना गौरविण्यात आले . महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या असेंब्ली हॉलमध्ये गुरूवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झाला.

डॉ राजेंद्र सिंह म्हणाले, ‘एकविसावे शतक हे मानवजातीसाठी आव्हानात्मक आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपाने पृथ्वीला ताप आलेला आहे. हा ताप वाढत चालला आहे . दुसऱ्या बाजूला पृथ्वीच्या पोटातील पाणी संपत चालले आहे. त्याचे पुनर्भरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.विकास आणि प्रगती करण्याचे जे शिक्षण आताच्या शिक्षण प्रणालीत दिले जाते ,त्यातून प्रदूषण ,अतिक्रमण ,शोषण होत राहते . निसर्गाची साधन संपत्ती वापरण्याचे शिकवले जाते ,मात्र निसर्ग संवर्धनाबद्दल शिकवले जात नाही. निसर्ग संवर्धनालाच प्राधान्य देणारी शिक्षणप्रणाली आणली पाहिजे ,त्यासाठी महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युएकेशन सोसायटीने पुढाकार घ्यावा. त्यातूनच सामुहिक भवितव्य घडू शकेल .

‘पाणी बचत करणे हे धर्म ग्रंथांमध्ये सांगितलेले काम आहे. भूगर्भातील ७२ टक्के पाणी संपले आहे , देशातील २६५ जिल्हे दुष्काळी झाले आहेत ,रिझर्व्ह बँकेतील संचय कमी होत असल्याच्या काळजीपेक्षा भूगर्भातील पाण्याची ‘ वॉटर बॅंक’ संपत असल्याची काळजी करण्याची वेळ आली आहे. समाजातील अस्वस्थता आणि असंतोष वाढण्यामागे पाण्याचा साठा कमी होणे ,हेही एक कारण आहे’,असेही डॉ राजेंद्र सिंह म्हणाले.

पंडित वसंत गाडगीळ म्हणाले,’ डॉ पी ए इनामदार यांचे कार्य मोठे असून, शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल केंद्र आणि राज्य सरकारने घेतली पाहिजे . डॉ पी ए इनामदारांच्या मार्गदर्शनखाली महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीने काश्मीरमध्येही शैक्षणिक काम सुरु केले पाहिजे.

डॉ विवेक सावंत म्हणाले,’महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशनच्या माध्यमातून टीन एजर्स ना क्लीन एजर्स आणि ग्रीन एजर्स करण्याचे काम केले जात आहे . ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवजातीचे कल्याण आणि पृथ्वीची जपणूक केली पाहिजे .

सरफराज अहमद ,जांबुवंत मनोहर ,सतीश खाडे,सतीश शिर्के,डॉ अनिता फ्रान्त्झ,शबनम सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले .

‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी डॉ.पी. ए. इनामदार यांचा ७५ वा वाढदिवस असून, सन्मानाचे अकरावे वर्ष आहे.

सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. शब्बीर फुलारी यांनी सूत्रसंचालन केले. लतीफ मगदूम यांनी आभार मानले.

यावेळी हरीश बुटले ,इरफान शेख ,संदीप बर्वे ,गौरी बीडकर,डॉ मुश्ताक मुकादम ,डॉ किरण भिसे ,वाहिद बियाबानी,डॉ शैला बुटवाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Read more...

जुन्नर तालुक्यात होणार राजकीय घडामोडी

जुन्नर तालुक्यात होणार राजकीय घडामोडी

सजग वेब टिम, जुन्नर 

जुन्नर | जुन्नर तालुक्यात होणार मोठ्या राजकीय घडामोडी, २०२० च्या पहिल्याच आठवड्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांची माहिती.

येत्या आठवड्यात जुन्नर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०२० च्या पहिल्याच आठवड्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे काही राजकिय नेत्यांनी या गोष्टीला दुजोरा दिल्याचे समजते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

पंचायत समिती जुन्नर मध्ये सध्या शिवसेनेचे सभापती विराजमान आहेत. परंतु येत्या काळात यात बदल होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. पंचायत समिती मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास बदल होऊ शकतो.

Read more...

योगेश पाटे यांना पर्यावरण रक्षक सन्मान पुरस्कार जाहीर

योगेश पाटे यांना पर्यावरण रक्षक सन्मान पुरस्कार जाहीर

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांना राजस्थान येथील तरुण भारत संघ या संस्थेच्या वतीने पर्यावरण रक्षक सन्मान २०१९ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

१५ जानेवारी २०२० रोजी महात्मा गांधी यांचे पुतणे अरुण गांधी आणि जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते हा पुरस्कार पाटे यांना प्रदान करण्यात येणार असून हा कार्यक्रम अलवर, राजस्थान याठिकाणी होणार आहे.

पाटे यांनी गावामध्ये वृक्षारोपण आणि संगोपन यावर भर देऊन नदी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यातही पुढाकार घेतला आहे. याच कामाची पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

Read more...

अखेर खा. अमोल कोल्हेंंच्या मोठ्या घोषणेचं गुपित उलगडलं

खा.डॉ. अमोल कोल्हे यांच्या किल्ले शिवनेरीवर “शिवसृष्टी” व “रोपवे” , वढू तुळापूर येथे ऐतिहासिक वारसास्थळ “शंभूसृष्टी” निर्मिती करण्याच्या मागणीला केंद्राकडून ग्रीन सिग्नल : खा.डॉ अमोल कोल्हे

अखेर १८ डिसेंबर च्या मोठ्या घोषणेचं उत्तर मिळालं

सजग वेब टिम, महाराष्ट्र

नवी दिल्ली | खा.डॉ अमोल कोल्हे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी निर्मितीसह रोप-वे निर्मिती करण्यात यावी तसेच वढू तुळापूर या ठिकाणी शंभूसृष्टी उभारण्यात यावी अशी आग्रही मागणी केली होती. आज त्यांच्या प्रयत्नांना प्रहलाद सिंह पटेल (पर्यटन व सांस्कृतिक मंत्री) यांनी खा.डॉ अमोल कोल्हे यांना लेखी पत्राद्वारे लवकरच या निर्मितीसाठी फंड उपलब्ध करून दिला जाईल असे कळवले आहे.

लोकसभा प्रचारामध्ये अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टीची निर्मिती तसेच शौर्यपीठ वढू तुळपुर येथे शंभुसृष्टी निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची मागणी दि.१० डिसेंबरच्या संसदीय कामकाजात खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी शून्यप्रहारामध्ये केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि तमाम शिवभक्तांचे शक्तीतीर्थ असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे आबालवृद्धांना दर्शन घेता यावे यासाठी रोपवे आणि पायथ्याशी शिवप्रभूंचा पराक्रम आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती याचे दर्शन घडवणारी “शिवसृष्टी” उभारण्यास आता लवकरच सुरुवात होईल.

वढू तुळापूर या ठिकाणी “शंभूसृष्टी” हे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसास्थळ व शौर्यपीठ म्हणून शंभूराजे प्रेमींना इतिहास अनुभवता येईल.
भक्ती-शक्ती कॉरिडोअर निर्मितीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात हजारो रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील व पर्यटनवृद्धी होण्यास निश्चितच फायदा होईल. कोल्हे यांच्या अभ्यासपूर्ण मागणीस केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने लवकरच यासाठी फंड उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे लेखी पत्राद्वारे कळविले असून या ऐतिहासिक कार्यास लवकरच सुरवात होईल असे कोल्हे यांनी सांगितले आहे.

Read more...

खासदार डॉ.अमोल कोल्हे करणार मोठी घोषणा.

खासदार डॉ.अमोल कोल्हे करणार मोठी घोषणा.

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | येत्या १८ डिसेंबर ला शिरूर चे खासदार डॉ.अमोल कोल्हे करणार मोठी घोषणा. आपल्या सोशल मिडिया प्रोफाईल वरून त्यांनी आज सकाळीच याबाबत एक पोस्ट केली आहे.

या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की
A Big Announcement….On

18th December!!!

आता खासदार अमोल कोल्हे नक्की कोणती मोठी घोषणा करतात ते येत्या १८ डिसेंबर ला च कळेल. कोल्हे यांच्या या पोस्ट मुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे तसेच येत्या १८ डिसेंबर कडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3159159370767242&id=100000196298119

 

Read more...

राज्य मंत्रिमंडळाचे तात्पुरते खातेवाटप जाहीर, सहा मंत्र्यांकडे कारभार

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई, दि. १२ | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे.

१. उद्धव बाळासाहेब ठाकरे –

मुख्यमंत्री – कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.

२. एकनाथ संभाजी शिंदे –

गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.

३. छगन चंद्रकांत भुजबळ –

ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.

४. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात –

महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.

५. सुभाष राजाराम देसाई –

उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.

६. जयंत राजाराम पाटील –

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.

७. डॉ. नितीन काशिनाथ राऊत-

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

Read more...

चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे

चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे – खा.अमोल कोल्हे

सजग वेब टिम, महाराष्ट्र

नवी दिल्ली | चाकण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात यावे अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा. अमोल कोल्हे यांनी आज
लोकसभेत शून्यप्रहराच्या कामकाजात सहभाग घेताना केली. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी चाकण या मध्यवर्ती ठिकाणी विमानतळ निर्मिती व्हावी अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात आज तीन मोठ्या एमआयडीसी असून येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय, छोटया मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत, सोबतच या भागातील प्रगतशील शेतकरी यांच्या कष्टामुळे मोठया प्रमाणावर जागतिक दर्जाचे शेतमालाचे उत्पन्न घेतले जाते आणि ते जगाच्या बाजारपेठेत पाठवले जाते.

तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघात आळंदी , भीमाशंकर भक्तिपीठे आहेत, ऐतिहासिक वारसास्थळे किल्ले शिवनेरी, वढू तुळापूर, अष्टविनायकांपैकी ४ भक्तीपीठे मतदारसंघात येतात .

खेड तालुक्यातील चाकण या ठिकाणी कृषीनिर्यात,औद्योगिक देवाण-घेवाण,करणाऱ्या विमानतळाची निर्मिती केल्यास या भागातील पर्यटन, औद्योगिक क्षेत्र व कृषीमाल निर्यात करण्यासाठी निश्चितच फायदा होईल यासाठी आज चाकण विमानतळ निर्मिती करण्याची मागणी केली खा. कोल्हे यांनी केली आहे.

Read more...

उद्या शरद पवारांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री शिवनेरीवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरीवर; शेतकरी कर्जमाफी घोषणेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष?

सजग वेब टिम, पुणे

पुणे | काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यावर शिवनेरीवर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता गुरुवारी ता.१२ रोजी मुख्यमंत्री शिवनेरी गडावर येणार आहेत.

ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होत असल्याने या निमित्ताने
शिवनेरी किल्ल्यावरुन मुख्यमंत्री कोणत्या घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवनेरीवरुन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करत सातबारा कोरा करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी मुख्यमंत्री ठाकरे शिवनेरीवर येत आहेत. मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच येत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व आहे. हा दौरा ऐतिहासीक ठरावा म्हणून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
पवारांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read more...

शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांचे प्रयत्न

शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांचे प्रयत्न

सजग वेब टिम, महाराष्ट्र

नवी दिल्ली | शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी खा.डॉ अमोल कोल्हे यांनी रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली व वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय योजना सुचविल्या. पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने त्वरीत डीपीआर कन्सल्टंटची नेमणूक करून रस्ता रुंदीकरणाविषयीचे निवेदन कोल्हे यांनी दिले.

पुणे-नगर महामार्गावरील वाघोली , शिक्रापूर , रांजणगाव या परिसरात रस्ता वाहतूक कोंडीची समस्या रस्ता रुंदीकरणामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. सोबतच त्यांनी पुणे-नाशिक महामार्गाच्या संदर्भात नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याविषयी गडकरींशी चर्चा केली. चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकण आणि एमआयडीसी चौक या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली.

नितीन गडकरी यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती खा.कोल्हे यांनी आज त्यांच्या फेसबुक पेजवरून पोस्टद्वारे दिली आहे.

Read more...

किल्ले ‘शिवनेरी’ वर जाण्यासाठी रोप वे ची उभारणी करा – अमोल कोल्हे

सजग वेब टिम, महाराष्ट्र

नवी दिल्ली | शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे ची उभारणी करण्यात यावी तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मित्ती करण्याची मागणी आज संसदेत केली. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टीची निर्मिती करण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. याच आश्वासनाची मागणी त्यांनी आज संसदेत शून्यप्रहारामध्ये सहभाग घेऊन केली.

बैलगाडा शर्यतीच्या मागणीनंतर, संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिल्या भाषणात, कोल्हे यांनी शिवसृष्टीची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेले किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मिती झाली तर सर्व शिवभक्तांसाठी हे एक प्रेरणास्थळ असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आणि जीवनपट अनुभवता येईल. तसेच, रोजगार निर्मिती होऊन पर्यटनास चालनाही मिळेल, असे म्हणत अमोल कोल्हेंनी आपला मुद्दा मांडला.

तसेच आबाल-वृद्ध, माता-भगिनी यांना शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर जाण्यासाठी रोप-वेची निर्मिती करून द्यावी, अशीही आग्रही मागणी कोल्हेंनी संसदेत केली.

Read more...
Open chat