Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
September, 2019 | Sajag Times

जुन्नरच्या जागेसाठी काँग्रेसही आग्रही, कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे केली मागणी

जुन्नरच्या जागेसाठी काँग्रेसही आग्रही, 

कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्षांकडे केली मागणी

 

 

 

 सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेसही आग्रही असून त्याबाबत कोणताही निर्णय़ झाला नाही. तरीही जुन्नरमधून राष्ट्रवादी काँग्रेसने आपलीच उमेदवारी जाहीर केल्याच्या चर्चेने आघाडीमध्ये या जागेवरून संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, वरीष्ठ पातळीवर आघाडीत जो निर्णय़ होईल तो मान्य असेल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, जुन्नर, खडकवासला, इंदापूर, मावळ आणि खेड अशा सात जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे. आघाडीच्या बैठकीत पुरंदर, भोर, जुन्नर या जागांचा तिढा सुटला आणि त्या जागा काँग्रेसकडे देण्यास एकमत झाल्याचे काँग्रेसने सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसकडून पुरंदरमधून जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भोरमधून आमदार संग्राम थोपटे आणि जुन्नरमधून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस कडून जुन्नरमधून अतुल बेनके यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याची चर्चा सुरू झाली. येत्या ३ ऑक्टोबरला अर्ज भरणार असून काँग्रेसचे सत्यशील शेरकर हे उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह अन्य ठिकाणच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये गर्दी केली होती. या दरम्यान जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक काल झाली. त्या बैठकीत जुन्नरची जागा काँग्रेसला मिळावी, अशी आग्रही मागणी शेरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा काँग्रेसकडे केली. कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसला जुन्नरची जागा द्यावी लागेल, अशा मागणीची घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. ते म्हणाले, ‘जिल्हा काँग्रेसने यापूर्वी सात जागा आघाडीकडे मागितल्या होत्या. त्यापैकी पुरंदर, भोरचा प्रश्न सुटला आहे. जुन्नरची जागा आमचीच आहे. मात्र, अचानक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला उमेदवारी दिल्याचे जाहीर केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात आघाडीकडून जुन्नरची जागा राष्ट्रवादीला जाहीर झाल्याची कोणतीही माहिती नाही. अद्याप वरिष्ठांकडून त्याबाबत कोणताही निर्णय़ झाला नाही. पक्षश्रेष्ठींकडून जो काही निर्णय़ येईल तो आम्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मान्य असेल. जुन्नरची जागा काँग्रेसकडे आल्यास त्यासाठी सत्यशील शेरकर यांचे नाव स्पर्धेत राहील. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे दोन्ही काँग्रेस कडून कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज होईल असे कोणतेही वक्तव्य करण्यात येऊ नये अशी विनंती केली.’

Read more...

जुन्नरचा आघाडीचा उमेदवार ठरला, येत्या ३ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

जुन्नरमध्ये आघाडीचं ठरलं, बेनके हेच उमेदवार

जागावाटपात जुन्नर राष्ट्रवादी कडे

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव  😐 “विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी  काँग्रेस ची आघाडी झाली आहे. जागा वाटपामध्ये जुन्नर विधानसभा हा मतदारसंघ राष्ट्रवादी कडे आला असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानुसार ३ ऑक्‍टोबर रोजी आघाडीच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे,” अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली आहे.

पिंपळगावजोगे पाटबंधारे उपविभाग कार्यालय हस्तांतराविरोधात बेनके यांनी आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आंदोलन केले होते. बेनके हे १३ दिवसांच्या आंदोलनानंतर काल सकाळी नारायणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या स्वागतानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

जुन्नर मतदारसंघ काँग्रेस ला द्या अशी मागणी काही काँग्रेस च्या नेत्यांनी याआधी केली होती आणि अशी चर्चाही काँग्रेस च्या नेत्यांमध्ये होती. या पक्षाच्या नेत्यांनी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना तयारीही करण्यास सांगितले होते. शेरकर यांनीही कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या होत्या.

या वेळी बोलताना बेनके म्हणाले, “”मी धरणग्रस्त असल्याने शेतकरी प्रश्‍नांची मला जाण आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी मी हे आंदोलन केले. जुन्नर तालुक्‍यातील शेतकरी, विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे सरकारला झुकावे लागले. विधानसभा निवडणुकीत जुन्नर तालुक्‍याच्या समस्त जुन्नरकरांच्या हितासाठीची दुसरी लढाई लढण्यास मी सक्षम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार मी ३ ऑक्‍टो. रोजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मार्गदर्शक संजय काळे, तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. नियोजनासाठी बुधवारी (ता. २५) जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नारायणगाव येथे बैठक होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Read more...

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिलीच राष्ट्रीय परिषद – ट्रायबेकॉन.

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिलीच राष्ट्रीय परिषद – ट्रायबेकॉन.

सजग वेब टिम, महाराष्ट्र

प्रवरानगर | प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारपासून दि. १९ ते २१ सप्टेंबर २०१९ या कालावधी मध्ये लोणी येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.
आदिवासींच्या संस्कृती व परंपरां संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात मात्र प्रथमच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करून त्यावर योग्य उपाययोजना करता याव्यात तसेच शासकीय पातळीवर आदिवासी आरोग्य संदर्भात धोरण निश्चिती करता यावी या उद्देशाने ‘ट्रायबेकॉन’ ही राष्ट्रीय परिषद घेण्यात येत असल्याचे विद्यापीठाचे प्र. कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारत सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने होत असलेल्या या ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे’चे उदघाट्न केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सहसचिव डॉ. नवलजीत कपूर यांच्या हस्ते करण्यात येणार असून, या प्रसंगी राज्य आदिवासी विकास मंत्रालयाच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा, गडचिरोली सोसायटी फॉर एज्युकेशन रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) फाउंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग, बेंगलोर येथील व्ही,जी,के,के, अँड करूणा ट्रस्टचे सचिव डॉ. एच. सुदर्शन , जबलपूर आय सी एम आर चे संचालक डॉ. अप्रूप दास, दिल्ली येथील जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. चंद्रकांत लहारीया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. वाय एम जयराज हे उपस्थित राहणार आहेत.

या तीन दिवसीय परिषदेकरिता महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल तसेच पॉन्डीचेरी आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासह एकूण २० राज्यांचे सुमारे तीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून आदिवासी समाजासाठी काम करणारे सुमारे ३० तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेदरम्यान आदिवासी संस्कृती व त्यांच्या पारंपरिक उपचार पद्धतींचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. यासह सीड मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या देशी बियाणांचेही प्रदर्शन याठिकाणी असणार आहे.

Read more...

वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे नेतृत्व करेन – वळसे पाटील.

– शासनाने जनभावनेचा आदर करावा

पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थलांतर

जुन्नर | पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय स्थलांतर मुद्द्यावरून ठिय्या आंदोलनास बसलेल्या अतुल बेनके यांची आज आंबेगाव चे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली आणि या आंदोलनास आपला पाठींबा जाहीर केला .
या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांच्यासोबत विघ्नहर चे चेअरमन सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जि. प. सदस्य शरद लेंडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वळसे पाटील यांनी शासनाच्या या निर्णया संदर्भात आपले म्हणणे मांडले
” पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय कुठलीही अडचण नसताना नगर जिल्ह्यात नेण्याचं सरकारचं प्रयोजन नक्की काय आहे हे कळत नाही. खात्याचे सचिव म्हणतात जी आर कधी निघाला माहीत नाही. या सर्व बाबी पाहिल्या तर निश्चितच आज हे कार्यालय गेले उद्या अधीक्षक कार्यालय ही नेले जाईल परंतु यासाठी सरकारकडे ठोस कारण नाहीये. उद्या पूरपरिस्थिती निर्माण झाली तर या बाबत ची यंत्रणा पुणे जिल्ह्यात आणि धरणांची पाटबंधारे विभागांची कार्यालये नगर जिल्ह्यात हे नियोजन कस करणार या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने इथल्या जानभावनेचा आदर करावा.
या आंदोलनास सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा द्यावा तसेच जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही पाठिंबा आहे आणि वेळ प्रसंगी तुमच्या सर्वांसोबत मी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. अतुलशेठ बेनके आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मागे मी भक्कमपणे उभा आहे.” असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

Read more...

कार्यालय द्या आणि पाणी घ्या – शरद सोनवणे

आमदार सोनवणे यांनी पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी केले बंद 

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय नारायणगाव येथून अळकुटी ला हलविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्गाने सरकार आणि प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या या निर्णयाचे पडसाद राजकीय पटलावरही पाहायला मिळत आहेत. ९ सप्टेंबर पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल बेनके यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन पुकारून आळेफाटा येथे ठिय्या आंदोलन चालू केले. त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस, आज सकाळी आंबेगाव चे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी ही या आंदोलनास भेट दिली आणि आपला पाठिंबा आंदोलनाला दिला. त्यानंतर आता आमदार शरद सोनवणे यांनी ही या निर्णयाला विरोध करत पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याचे पुढे जाणारे पाणी बंद केले.

जोपर्यंत शासन हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत पाणी पुढे जाऊ देणार नाही. तसेच उद्या सकाळी येडगाव आणि माणिकडोह धरणाचेही पुढे जाणारे पाणी बंद करणार असा इशारा आमदार सोनवणे यांनी दिला आहे.

Read more...

पिंपळगाव जोगे उपविभागीय कार्यालय स्थलांतरास जुन्नर तालुक्याचा विरोध

पिंपळगाव जोगे उपविभागीय कार्यालय स्थलांतरास जुन्नर तालुक्याचा विरोध.
अतुल बेनके यांचे ठिय्या आंदोलन
सजग वेब टिम, जुन्नर

आळेफाटा | पिंपळगाव जोगे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय कार्यालय हे नगर जिल्ह्यात हलविण्यात येणार आहे. सदर कार्यालय सध्या जुन्नर तालुक्यात असून या कार्यालयाच्या स्थलांतराला राष्ट्रवादी काँग्रेस ने जोरदार विरोध केला आहे. लोकप्रतिनिधी आणि शासनाने या संदर्भात पावले उचलून हा निर्णय शासनाने लवकरात लवकर मागे घ्यावा मी हे कार्यालय नगर जिल्ह्यात जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार अतुल बेनके यांनी घेतलाय. बेनके हे दुपार पासून आळेफाटा येथील छत्रपती शिवाजी चौक याठिकाणी ठिय्या आंदोलनास बसले आहेत. रात्रीचे १०.३० झालेत अनेक नेते आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली परंतु बेनके हे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

तालुक्याच्या पाणी वाटपात या वर्षी नियोजन शून्यतेचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यावरून आधीच वातावरण गरम असताना आता या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात रोष पसरला असून विविध गावच्या ग्रामपंचायतींनी, संघटनांनी या निर्णयास विरोध केला आहे.

जुन्नर च्या तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयास या विषयी चे पत्र पाठवले असून या निर्णया संदर्भात जुन्नर तालुक्याची भूमिका त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळवली आहे. दिलीप वळसे पाटील यांनीही या निर्णया संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे कळत आहे.
बेनके हे आपलं ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याने दिवसभर आणि रात्रीही कार्यकर्त्यांची आणि विविध नेत्यांची त्यांना भेटण्यासाठी रीघ लागली आहे. नुकत्याच काही वेळापूर्वी जि. प. सदस्य आशाताई बुचके,विघ्नहर चे संचालक संतोषनाना खैरे यांनीही बेनके यांची भेट घेतली.

Read more...
Open chat