Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
March, 2019 | Sajag Times

समर्थ शैक्षणिक संकुल व महिंद्रा यांच्यात सामंजस्य करार

सुधाकर सैद (सजग वेब टिम, बेल्हे)
बेल्हे |  समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स बेल्हे आणि महिंद्रा सी आय इ यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने हा पुढाकार घेत समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट सुविधा या करारामार्फत देण्यात येणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.संकुलात प्रवेश घेतलेल्या आय टी आय,फिटर,मशिनिस्ट,सी एन सी/व्ही एम सी ऑपरेटर,प्रोग्रामिंग,वेल्डर,डिप्लोमा व डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना संस्थेतच ट्रेनिंग ची सुविधा निर्माण करून महिंद्रा सी आय इ मध्ये प्लेसमेंट देण्यात येईल असे यावेळी वरिष्ठ जनरल मॅनेजर विनायक कडस्कर यांनी सांगितले.
ट्रेनिंग च्या दरम्यान सदर विद्यार्थ्यांना स्टायपेंड म्हणून एक ठराविक रक्कम देखील कंपनीच्या नियमावलीनुसार देण्यात येणार आहे.त्याचबरोबर इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट संवाद वाढवणे,तंत्रज्ञान व नवनवीन कार्यप्रणाली माहिती होण्यासाठी औद्योगिक सहलींचे आयोजन करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हा या करारा मागे मुख्य हेतू असल्याचे यावेळी जनरल मॅनेजर सुरेश थोरात यांनी स्पष्ट केले.
Read more...

महाराष्ट्र पत्रकार संघाची जुन्नर तालुका जम्बो कार्यकारिणी जाहिर

अध्यक्षपदी प्रा.अशफाक पटेल उपाध्यक्षपदी काजल फुलसुंदर, अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन डेरे, कार्यवाह अशोक कोरडे यांची निवड

नारायणगाव | महाराष्ट्र पातळीवर कार्यरत असणार्‍या महाराष्ट्र पत्रकार संघाची “जुन्नर तालुका कार्यकारिणी” पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सचिव शेखर सुर्यवंशी, राज्य संघटक शिरिष कुलकर्णी, सरपंच योगेश पाटे, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, अशोक पाटे, आरिफ आतार, सचिन खैरे, अनिल खैरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच जाहिर करुन पदाधिकार्‍यांना कार्ड व नियुक्तीपत्र प्रदान सोहळा नारायणगाव मुक्ताई मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी जिल्हा प्रतिनिधी म्हणुन अँड.कुलदिप नलावडे, किसन गावडे, जुन्नर तालुका अध्यक्षपदी शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक प्रा.अशफाक पटेल, उपाध्यक्षपदी कालज फुलसुंदर, अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन डेरे, कार्यवाह अशोक कोरडे, सहकार्यवाह अरुण मोरे, किरण पाडेकर, संघटक अभय वारुळे, गणेश मोढवे, खजिनदार संतोष हाडवळे, सहखजनिदार राजेंद्र खेत्री, तुषार आंधळे, संपर्कप्रमुख आकाश डावखरे, सहसंपर्कप्रमुख सतिश पाटे, प्रसिद्धीप्रमुख स्वप्निल ढवळे, सुधाकर सैद, विजय चाळक, सचिन भोर, रामदास सांगळे, प्रेस फोटो- व्हिडिओग्राफर अलिअहेमद चौगुले, सचिन संते, राजेश आमले, ऋषिकेश कुर्‍हाडे, तवस्सुल अहेमद सय्यद, कायदेशीर सल्लागार अँड.केतनकुमार पडवळ, अँड.सुनिता चासकर, मार्गदर्शक म्हणुन डाॅ.मिलिंद कसबे, डाॅ.संदिप काकडे, डाॅ.मिनाक्षी काकडे या पदाधिकार्‍यांसह सदस्यपदी दर्शन फुलपगार, शितल नलावडे, सना पटेल, मनिषा औटी, भारती हांडे, धनश्री कडाळे, प्रतिक्षा चौधरी, मनिष गडगे, मंदार अहिनवे, किशोर वारुळे, शरद शेळके, गणेश चोरे, राहुल औटी, पोपट बढे, विनोद रायकर, मंगेश शेळके, प्रविण कांबळे, मिलिंद खेत्री, कार्तिकेश चौधरी, नवरोज सय्यद, आकाश रायकर यांची नियुक्ती करत ५४ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.

या सोहळ्याचे प्रास्ताविक जुन्नर तालुका अध्यक्ष प्रा.अशफाक पटेल यांनी करत पत्रकार संघामार्फेत पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहणार असल्याचे सांगतिले. यानिमित्ताने जिल्हा प्रतिनिधी अँड.कुलदिप नलावडे, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन डेरे, सदस्य मनिषा औटी, सचिन डेरे, आकाश डावखरे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिचय करुन देत कार्यकारणी सुरु केल्याबद्दल आभार मानले. यावेऴी सरपंच योगेश पाटे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा देत अभिनंदन केले. तसेच राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन करत कार्यकारिणीला सुचना दिल्या. या सोहळ्याचे सुत्रसंचालन संघटक गणेश मोढवे यांनी तर आभार सहसंपर्कप्रमुख सतिश पाटे यांनी मानले.

Read more...

आमदार लांडगे समर्थकांमध्ये धुसफूस, भोसरी भाजप आक्रमक.

सजग वेब टीम, पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड | मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर येत आहे. शिवसेनेचे शिरुरचे उमेदवार जाहीर होताच भोसरीतील भाजप गटाने बैठक घेतली. आमदार महेश लांडगे यांच्या गटातील सर्व नगरसेवक शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार न करण्याचा मनस्थितीत आहेत.

आढळराव पाटलांनी युती होण्याआधी केलेल्या आरोपांचं काय? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. भोसरी विधानसभा सध्या शिवसेनेच्या कोट्यात असल्याने हे दबावतंत्र वापरलं जात आहे. अपक्ष निवडून आलेले लांडगे हे भाजपमध्ये असल्याने, येत्या विधानसभेत हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची ग्वाही द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

आमदार लांडगे सावध भूमिकेत असल्याचं बैठकीतील चर्चेतून दिसत आहे. लांडगे युतीधर्म पाळू असं म्हणत असताना त्यांचे समर्थक नगरसेवक मात्र विरोधाची भूमिका घेत आहेत. लांडगे नगरसेवकांना पुढे करुन स्वतःसाठी विधानसभेची जागा निश्चित करत असल्याचीही चर्चा आहे.

आधी मावळ लोकसभेचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजप आमदार लक्ष्मण जगताप प्रचार करणार अशी चर्चा असताना आता शिरुरमध्येही भोसरी चेे भाजपचे आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवकांनी तीच रणनीती अवलंबली आहे

Read more...

जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड

जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचाराची धुळवड
अमोल कोल्हेंचा जुन्नर तालुका प्रचार दौऱ्याला जुन्नरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी काल आपल्या घरच्या तालुक्यात प्रचार दौरा केला. नारायणगाव येथून ग्रामदैवतांचे दर्शन घेत या दौऱ्याची सुरुवात झाली. हनुमान मंदिर ते बस स्टॅन्ड अशी पदयात्रा काढून लोकांच्या गाठीभेटी घेत या प्रचार दौऱ्याची सुरवात झाली बस स्टॅन्ड वर छोटीशी घेतलेली सभा पै. मंगलदास बांदल यांच्या वक्तृत्वाने गाजली.

नारायणगाव नंतर बोरी, पिंपळवंडी, ओतूर, उंचखडक, डिंगोरे , ओझर असा प्रवास करत या प्रचार यातत्रेचा ओझर याठिकाणी समारोप करण्यार आला. या यात्रे दरम्यान अमोल कोल्हे यांना जनतेचा मिळणारा पाठिंबा अभूतपूर्व असा होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

तत्पूर्वी बांदल यांनी नारायणगाव, ओतूर याठिकाणी बोलताना विद्यमान खासदार आढळराव यांच्यावर विमानतळ, रेल्वे, बैलगाडा,पुणे नाशिक हायवे, ट्रॅफिक या मुद्द्यांवरून तुफान टिका केली. तसेच शिवसेना अंर्तगत असलेल्या वातावरणाचाही थेट उल्लेख त्यांनी यावेळी केला. शरद पवार साहेब, अजितदादा, सुप्रिया सुळे यांच्यावर टिका करणारे आढळराव पाटील यांना सत्तेचा गर्व झाला आहे. हडपसर , भोसरी, शिरूर, खेड या सर्व विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बांदल यांनी यावेळी बोलून दाखवली. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस हि अतुलदादा बेनके यांच्या नेतृत्वाखाली एकसंधपणे काम करत आहे सर्व कार्यकर्त्यांनी या सर्वांच्या मागे उभे राहावे. तसेच अतुल बेनके यांच्या मध्ये आता वल्लभशेठ बेनके दिसायला लागलेत.

 

नारायणगाव येथे स्टॅन्ड जवळ झालेल्या सभेत नारायणगाव च्या उद्याच्या शिवजयंती चे आमंत्रण देत गावची शिवजयंती आहे डॉक्टर तुम्हीही उपस्थित राहा डॉ अमोल कोल्हे यांना आमंत्रित केले. त्याचवेळी मागे आपल्या कार्यकर्त्यांसह उभ्या असलेल्या सरपंच बाबूभाऊ पाटे यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. या क्षणी मात्र संपूर्ण सभेचे वातावरण च बदलून गेले. या सभेनंतर सरपंच योगेश (बाबूभाऊ) पाटे यांनी डॉ अमोल कोल्हे यांना मारलेली मिठी आणि सरपंचांनी गावच्या उमेदवाराला दिलेल्या शुभेच्छा यामुळे काल नारायणगाव मध्येच राजकीय धुळवडीला सुरुवात झाली.

प्रचार सभांना मिळत असलेल्या उस्फुर्त प्रतिसाद पाहता जुन्नरकर जनता घरच्या उमेदवाराच्या मागे भक्कमपणे उभी राहील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच बांदल यांच्या वक्तृत्वाने सभांचे वातावरण रंगत असून कार्यकर्तेही उत्साहात प्रचार करत आहेत. भाजप च्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आढळराव यांनी कायम सापत्न वागणूक दिलेली आहे त्यामुळे भाजप च्या आमदारांना कार्यकर्त्यांना दुखवू नका ते आपलेच आहेत तसेच खेडचे आमदार सुरेश गोरे हे अमोल कोल्हे यांच्यामुळेच आमदार झाले त्यामुळे तेही आपल्याच बरोबर आहेत असे भुवया उंचावणारे राजकीय वक्तव्य करत त्यांनी काल च्या सभांमध्ये मोठे खुलासे केले.

ओतूर याठिकाणी झालेल्या सभेत जुन्नरकरांचा स्वभाव हा दिलदार असून मोठ्या मनाची प्रेमळ माणसं याठिकाणी राहतात. पोटतिडकीने सांगतो एकदा फक्त सर्वांनी ठरवा आणि समस्त जुन्नरकरांनी शपथ घेऊन आपल्या लाडक्या उमेदवाराला निवडून आणावे असे आवाहन बांदल यांनी यावेळी केले.

Read more...

पार्थच्या पहिल्याच भाषणाची सोशल मीडियाने उडवली खिल्ली

पिंपरी चिंचवड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ अजित पवार याच्या पहिल्या भाषणाची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवलेली दिसून येत होती. मावळ मतदार संघात पार्थ पवार याचे पहिले जाहीर भाषण होते परंतु भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचा साधा कार्यकर्ता सुद्धा पार्थ याच्या पेक्षा चांगले भाषण करू शकतो असेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवत होते. पार्थ याला लिहून दिलेले मराठी भाषण वाचून बोलताना सुद्धा तो अनेक वेळा अडखळत होता. एकाद्या नव्या कलाकाराला दिलेले भाषण चांगल्या प्रकारे रट्टा मारून बोलू शकतो या कलेची सुद्धा पार्थ पवार याच्याकडे कमी दिसून येत होती.

शरद पवार आणि पार्थ यांचे वडील अजित पवार यांच्याकडे असलेले वक्तृत्वाची कमी पार्थ पवार मध्ये दिसून येत होती. आज मावळ मध्ये पार्थ याला मिळालेली लोकसभेची उमेदवारी फक्त अजित पवार यांच्या हट्टापायी देण्यात आलेली आहे असेच समजते. ज्या पार्थ पवार याला साधे लिहून दिलेले भाषण नीट वाचता येत नाही तो लोकसभेत जनतेचे प्रश्न काय मांडणार, आज महाराष्ट्रात कुशल कौशल्य असणारे शरद पवार यांच्या नातवाला साधा आजोबाचा वक्तृत्वाचा गुण घेता आलेला नाही असेच आज नेटकरी पार्थ पवार यांची खिल्ली उडवत आहे.

” ह्याला लिहिलेले भाषण धड वाचता येत नाही..हा निवडुण येवुन संसदेत काय दिवे लावणार आहे…हा तर राहुल गांधी पेक्षा टिंब…..टिंब…..निघाला..” , ” याच्या इच्छे साठी अख्खा लोकसभा मतदारसंघ ताब्यात कशाला द्यायचा त्याला ग्रामपंचायती पासुन सुरुवात करायला सांगा म्हणजे त्याची इच्छा पूर्ण होईल आणि अनुभव सुध्दा येईल” , ” अररारारार…. काय हे… भाव तू खासदार होणार का?? तुझा पेक्षा मी भारी बोलतो… तू स्वतःचे प्रश्न व्यवस्थित मांडू नाही शकत जसनतेचे प्रश्न काय मांडणार… फक्त श्रीरंग अप्पा.. बारणे ” , ” दादाच पोरगं कस बोलतो म्हणून आवर्जून एकल परंतु ह्याने पहिल्या बोलातच विकेट दिली..”, ” काय राव भाषण आमचं दहावीचं पोर चंगल भाषण करतय आणि म्हणे भावी खासदार” अश्या प्रकारे मावळ मधील सुजाण नागरिकांनी आपल्या सूचना पार्थ पवार आणि राष्ट्रवादीला दिलेल्या आहे. यावर येणाऱ्या लोकसभेला मावळ मधील जनता पार्थ पवार सारख्या नवख्या उमेदवाराला संधी देणार का यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read more...

मला दिलेले प्रेम कोल्हे यांना द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची – विलास लांडे

सजग वेब टीम, राजगुरूनगर

चाकण | शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित चाकण येथील सभेत ते बोलत होते. या सभेसाठी विलास लांडे आणि मंगलदास बांदल हे दोन्ही उमेदवारी न भेटल्याने नाराज नेते यावेळी उपस्थित होेते.

सभेत विलास लांडे यांचे भाषण सुरू असताना बांदल आले त्यावेळी लांडे म्हणाले की या बांदल बसा. आता आपल्याला बसायचे आहे. लांडे असे म्हणताच उपस्थित नागरिकांत एकच हशा पिकला.

यावेळी बोलताना विलास लांडे म्हणाले की, मोहिते पाटलांचे आणि आम्हा दोघांचे मनोमिलन झाले आहे. या निवडणुकीत साहेबांच्या विचारांना ताकद द्यायची आहे. ७१ हजार कोटींचे कर्ज माफ करणारा पहिला मंत्री म्हणजे पवार साहेब आहेत. १५ वर्षात काही काम नाही. विमानतळ नाही. रेल्वे नाही. सीएसआर निधी देखील  स्वतःच्या शाळेसाठी नेला अशी टिका आढळराव पाटील यांच्यावर त्यांनी केली. मला दिलेले प्रेम कोल्हे यांना द्या, डॉ. अमोल कोल्हे यांना निवडून आणण्याची आपली जबाबदारी आहे असे आवाहन लांडे यांनी यावेळी केले.

Read more...

मंत्रिपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या पायावर माथा ठेऊ – शरद सोनवणे

सजग वेब टीम

शिरूर | नरेंद्र मोदी यांच्या पायावर शिरुर लोकसभेचा माथा ठेऊ पण आढळरावांसाठी मंत्रीपद मागूच, असं वक्तव्य नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले शरद सोनावणे यांनी केलं आहे. ते एका सभेत बोलत होते.

आपण सर्व लोकं विमान बुक करु दिल्लीला जाऊ आणि तिथे दिल्लीश्वराच्या पाया पडू, जनतेसाठी हे करु, असंही ते म्हणाले आहेत.

शिवाजी आढळरावांना केंद्रीय मंत्री करा अशी मागणी आपण पंतप्रधान नरेद्र मोदींकडे करु, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली.

Read more...

संभाजी ब्रिगेड पक्षाचे अॅड.मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात ? सांगितला राजीव सातवांच्या जागेवर दावा !

सजग वेब टीम

हिंगोली – संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे सुञाकडून समजले आहे.अॅड.आखरेंनी त्यांच्यासाठी राहुल गांधींचे निकटवर्तीय व हिंगोली काॅंग्रेरसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या जागेवर दावा सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे.अॅड.मनोज आखरे हे सुद्धा हिंगोलीचेच रहिवासी असल्यामुळे त्यांनी काॅंग्रेसकडे सदर जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते.तर या मागे राजीव सावत व अॅड.आखरे यांच्या मधील स्थानिक पातळीवरील मतभेद कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे.
अॅड.मनोज आखरेंच्या माध्यमातून हिंगोलीची लोकसभेची जागा काॅंग्रेसने संभाजी ब्रिगेडला सोडण्यासाठी सध्या एक शिष्ठमंडळ दिल्ली येथे ठाण मांडून असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळामध्ये संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर,मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव व संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर व गंगाधर बनबरे आदीचा समावेश असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळाने काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन,त्यांचे कडे सदर जागा संभाजी ब्रिगेडला सोडण्यासंदर्भात जोरदार मागणी केल्याचे व राजीव सातव यांच्या निष्र्कियेतेचा पाढा वाचल्याचे सुञांकडून समजले आहे.काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या मागणीला वरिष्ठापर्यंत पोहचवण्याची भुमिका घेऊन,धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकञित लढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची भुमिका मांडली असली तरी अंतिम निर्णय काय झाला.हे अद्याप समजलेले नाही.परंतु,या निमित्ताने अॅड.मनोज आखरे व खासदार राजीव सातव यांच्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील जागेवर संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Read more...

शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही: अजित पवार

पुणे : “शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही. विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी मी आज सकाळी चर्चा केली. सर्वांची समजूत काढली आहे. काही कार्यकर्त्यांनी सकाळी फलक लावल्याचे समजल्यानंतर चर्चा झाली. आता सर्व कार्यकर्ते एकदिलाने प्रचाराला लागले आहेत. याची प्रचिती शिरूरसाठी होणाऱ्या प्रचारात दिसून येईल” असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडून शिरुर मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करुन आपला निषेध व्यक्त केला आहे. गेल्या निवडणुकीत विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शिरुर मतदारसंघात उभे होते. यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना याबाबत साशंकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादीकडून शिरुर मतदारसंघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे विलास लांडे यांचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे शिरुर मतदार संघात कोल्हेंविरोधात बॅनरबाजी करुन नाराजी व्यक्त केली. अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघात पाडणार अशी भूमिका लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली असून त्यांना समजावण्याचा प्रयत्न लांडे यांनी केला.

या प्रकारावरुन राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु असल्याची चर्चा सुरु होती. याचा फायदा विरोधी पक्षांना नक्कीच होऊ शकतो. याबाबत अजित पवार यांनी विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन सर्वांची समजूत घातली असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विलास लांडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज मुंबईत भेट घेतली. शरद पवार यांनी, कामाला लागा असा आदेश दिला असून लांडे यांनी देखील ”पक्ष जे काम देईल ते मी करणार” अशी भुमिका स्पष्ट केली.

Read more...

डीजेच्या दणदणाटावर आळेफाटा पोलिसांची कारवाई

सुधाकर सैद, बेल्हे ( सजग वेब टीम)

बेल्हे |  बुधवारी दि. १३ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास गुळूंचवाडी(बेल्हे) येथे कल्याण-नगर महामार्गावर एक नाही दोन नाही जवळजवळ दहा ते बारा डीजेंचा कानठळ्या बसवणारा आवाज अचानक सुरू झाला तो गुळूंचवाडी येथील एका लग्नाच्या मांडवडहाळ्यांच्या मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट चालू होता व त्यापुढे तरुणांची अलोट गर्दी नाचत होती. वाहतुकीच्या गोंगाटापेक्षाही या डीजेचा दणदणाट अधिक होता याचवेळी कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच तत्पर बेल्हे पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि डीजेचा आवाज अचानक शांत झाला पण यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन पाच ते सहा डीजेच्या गाड्या पलायन करण्यात यशस्वी झाल्या असून पोलीस कारवाईत सहा गाड्या सापडल्या असून त्यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम चालू होते विशेष म्हणजे ज्यांच्या घरी लग्न होते त्यांचा स्वतःचाही एक डीजे या कारवाईत सापडला आहे आणि दुसरे विशेष म्हणजे ते स्वतः एक किर्तनकार असून त्या माध्यमातून जनजागृती करण्याचेही काम करतात.

सध्या लग्नसराई त्यातच असणाऱ्या लग्नामध्ये अजूनही डीजे लावण्याचा मोह वधू-वर पक्षाला टाळता येत नाही,त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मिरवणूक व वरातीसाठी महागडे डीजे लावले जात आहेत त्याचा दणदणाट कानठळ्या बसवणारा असून वयोवृद्ध,रुग्ण व सध्या चालू दहावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत असून याचे काहीही सोयरसुतक डीजेचालक व वधू-वर पक्षाला नसते.स्त्यावरील काही मंगल कार्यालयांच्या बाहेरही अशाच प्रकारे मिरवणूका काढून डीजेचा दणदणाट केला जातो. परिसरात रुग्णालये व शाळा असल्याने हा परिसर शांतता क्षेत्रात मोडतो तरीही या भागात नेहमीच अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाते.यावेळी झालेल्या कारवाईमध्ये अक्षय आशिर्वाद पवार,एम एच-०४-सीजी-३७७० (रा.गुळूंचवाडी),दगडू भाऊ येलमार,एम एच-०४-सीजी-३१५३ (रा.खापरवाडी,आळे),संतोष हरिष राठोड,एम एच-१४-एफ-५७७४(रा.आळे),गणेश दिनकर औटी,(७०९टेंपो) रा.गुंजाळवाडी,बाळासाहेब विठ्ठल चव्हाण,एम एच-१६-क्यू-११५५(रा.वडगाव आनंद),ऋषीकेश संतोष हुलावळे,एम एच-१२-डीजी-३११४ या सहाही डीजेचालकांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र गोराणे व संदीप फड हे करीत आहेत,जुन्नर तालुक्यातील डीजेवरील सर्वात मोठी कारवाई आळेफाटा पोलीस ठाण्याने केल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे,न्यायालयाची डीजे वाजविण्यावर मनाई असतानाही भयानक आवाजाच्या नवनवीन सिस्टीम्स कोणाच्या आशिर्वादाने चालतात हाही एक प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

Read more...
Open chat