मराठी भाषेची उपयोजितता वाढवण्याची गरज – डॉ. संजय घोडेकर


मराठी भाषेची उपयोजितता वाढवण्याची गरज – डॉ. संजय घोडेकर

– राजगुरू महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनाचे आयोजन

बाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)

राजगुरूनगर-मराठी भाषेच्या उपयोजनातून जास्तीत जास्त व्यावसायिक संधी उपलब्ध होण्यासाठी साहित्यव्यवहार आणि दैनंदिन व्यवहार यांची प्रयत्नपूर्वक सांगड घालण्याची गरज असून मराठी भाषेची उपयोजितता वाढली तर तर तिचा अधिक वापर वाढू शकेल असे प्रतिपादन पाबळच्या पद्ममणि जैन कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांनी केले ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात मराठी भाषेतील व्यावसायिक संधी या विषयावर बोलत होते.  या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.बी.पाटील, डॉ. संजय शिंदे, डॉ. बी.डी.अनुसे, प्रा. डी. एम. मारकड, प्रा. एम. एल. मुळूक, प्रा.एस.एस.आल्हाट व कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. संजय घोडेकर पुढे म्हणाले की, जेवढया व्यावसायिक संधी इंग्रजीतून शक्य आहेत तेवढयाच संधी मराठीतूनही उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी मराठी ज्ञानभाषा होण्याची गरज आहे. जगातील अन्य भाषांमधील ज्ञानाचा खजिना मराठीत आणण्यासाठी विद्यार्थ्यांना भाषांतरकार म्हणून आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात व्यवसायिक संधी उपलब्ध आहेत. बहुश्रुतता, श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता असेल तर रेडीओ जॉकी, सूत्रसंचालक आदी घटकांकडे व्यवसाय म्हणून पाहता येईल. तसेच लेखनविषयक नियमांची माहिती करून घेतल्यास मुद्रितशोधनाचे नवे दालन व्यवसाय म्हणून खुले होऊ शकेल. या वेळी त्यांनी कवी कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान सांगून मराठीच्या उत्पत्तीपासूनचा आढावा सांगितला.

प्राचार्य डॉ. एस.बी.पाटील यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी करताना मराठी ज्ञानभाषा व उच्चशिक्षणाची भाषा असावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

मराठी विभागाच्या वतीने मराठीतील म्हणींच्या जतन व संवर्धनाचा विचार करून ‘चला मराठी म्हण जपू या’ असा संकल्प करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुमारे एक हजारांपेक्षा अधिक म्हणींचे संकलन करण्यात आले. कवी कुसुमाग्रज आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे अभिवाचनही या प्रसंगी करण्यात आले. मराठी भाषेतून राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय शिंदे, सूत्रसंचालन कु. ऋक्षिकेश गरुड याने तर आभार डॉ.बाळासाहेब अनुसे यांनी केले.

Read more...

पुणे नाशिक महामार्गावर दुचाकीस्वार झालेत ‘बळीचा बकरा’

पुणे नाशिक महामार्गावर दुचाकीस्वार झालेत ‘बळीचा बकरा’
– कंत्राटदारांचा आणि प्रशासनाचा गलथनपणा नागरिकांच्या जीवावर

सजग वेब टीम, जुन्नर
नारायणगाव | नारायणगाव अंतर्गत पुणे नाशिक महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे, काही ठिकाणी खडी पसरवून ठेवण्यात आली आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्र समोरील मूळ रस्त्याचा बराचसा भाग कामासाठी उकरून ठेवण्यात आला आहे. परंतु या ठिकाणी कुठलाही सूचनादर्शक फलक ठेवण्यात आला नाहीये त्यामुळे नाशिक च्या दिशेने येणाऱ्या गाड्यांना मुख्यतः दुचाकीस्वारांना काम झालेल्या भागातील रस्त्यावरून जाताना त्याच लेन मध्ये काम सुरू असलेल्या उकरून ठेवलेल्या रस्त्यावरून जावे लागत आहे. अचानक गाडीचा वेग आणि तोल सांभाळताना दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे.
याठिकाणी कुठलाही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही अथवा सुचनाफलकही नसल्याचे आढळून आले आहे.

काल याभागात जवळपास ७ जणांना गाडी घसरून दुखापत झाली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सजग टाईम्स शी बोलताना सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते तुषार कोऱ्हाळे यांनी आणि याभागात राहणाऱ्या नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी ठेकेदार आणि प्रशासनाच्या या गलथनपणाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. जर कामाला उशीर लागणार होता तर रस्ता खोदण्याची घाई का केली आणि खोदल्यानंतर त्याठिकाणी सूचनाफलक का लावण्यात आला नाही असा सवाल नागरिक संबंधित प्रशासनाला विचारत आहेत.

आधीच बायपास चे रखडलेले काम, धुळीचा होणारा त्रास, ट्रॅफिक, रस्त्याच्या रुंदीकरणाचे संथ गतीने चाललेलं काम आणि त्यातच हे अपघात यामुळे प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी, राजकारणी यांच्याविषयी जनतेच्या मनात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी नारायणगाव आणि वारुळवाडी गावच्या नागरिकांनी रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जावरून संबंधितांना धारेवर धरले होते. त्यांनंतरही संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडून बेजबाबदार वर्तन सुरूच असल्याचे दिसून येत आहे. काल झालेल्या अपघातांनंतर त्याठिकाणी अडथळे (बॅरिगेट्स) लावण्यात आले आहेत. विद्यमान खासदार आणि विरोधकांमध्ये बळीचा बकरा कोण ची चर्चा जोरात सुरू आहे परंतु यांच्या भांडणात नक्की कुणाचा बळी जातोय हे या अपघाताच्या घटनांमधून पाहायला मिळत आहे.

Read more...

सन २०१९-२० साठी राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टये

सन  २०१९-२० च्या अंतरीम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टये

 •        कोरडवाहू शेतीला स्थैर्य, पायाभूत सुविधांचा गतीमान विकास,
  वाढत्या शहरीकरणानुरूप सुविधा, शेतकरी व युवकांच्या प्रश्नांना
  प्राधान्य.
 •       शेती व शेतीपूरक व्यवसायाला प्राथमिकता देण्यासाठी शेततळे, सिंचन
  विहिरींवर भर.
 •       सामाजिक न्यायाच्या माध्यमातून विषमतामुक्त महाराष्ट्राच्या
  निर्मितीचा ध्यास.
 •       महाराष्ट्र ऊर्जासंपन्न करणार. वीजनिर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र
  स्वयंपूर्ण करण्यासाठी वीजनिर्मिती व वितरण प्रणाली आराखडा.
 •        महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या 53 वर्षांच्या तुलनेत मागील
  साडेचार वर्षात 13000 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची भर.
  नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग,  शिवडी-न्हावा शेवा बंदर प्रगती पथावर.
 •       मुंबई उपनगरीय वाहतूक सेवा सुधारण्याचा निर्धार. मुंबई मेट्रोची
  व्याप्ती 276 कि.मी. पर्यंत विस्तारणार.
 •       नागपूर व पुणे मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी
  निधीची उपलब्धता.
 •       अहमदनगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड, वडसा-देसाईगंज,
  इंदौर-मनमाड रेल्वे कामे प्रगती पथावर.
 •        मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या
  माध्यमातून 12 लक्ष कोटी रूपयांचे सामंजस्य करार.
 •       अपुऱ्या पावसामुळे बाधित 151 दुष्काळग्रस्त तालुके व 268 महसूल
  मंडळे व 5449 दुष्काळी  परिस्थिती असलेल्या गावात मदत पाहोचवणार.
 •       दुष्काळग्रस्त भागात थकीत वीज देयकांअभावी बंद असलेल्या ग्रामीण
  व शहरी पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी वीज बिलाची 5 % रक्कम
  शासन देणार.
 •       जलसंपदा विभागासाठी सन 2019-20 मध्ये रू. 8 हजार 733 कोटी
  नियतव्यय प्रस्तावित.
 •       क्रांतिकारी ठरलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा 1500 कोटी
  रूपयांची तरतूद.
 •        ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत आजवर 1 लक्ष 30 हजार शेततळी पूर्ण.
  यंदा 5 हजार 187 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
 •        कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 3 हजार 498 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
 •        शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून हाती घेतलेल्या छत्रपती
  शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्यातला शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त
  होईपर्यंत निधी उपलब्ध करून देणार.
 •        कृषी पंपांना विदयुत जोडणी देण्यासाठी यंदा 900 कोटींचा नियतव्यय
  प्रस्तावित.
 •        राज्यातील दूध, कांदा, तूर, हरभरा, धान उत्पादकांना विविध
  योजनांच्या माध्यमातून अनुदान.
 •       ‍ग्रामीण विकासात सहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांच्या कृषी व
  कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी 500 कोटींच्या अनुदानाची तरतूद.
 •       राज्याच्या गतिमान विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या युवकांना
  ‘प्रमोद महाजन कौशल्य व विकास अभियान’ अंतर्गत सक्षमीकरणासाठी यंदा 90
  कोटींची तरतूद.
 •        अटल अर्थसहाय्य योजना राबविण्यासाठी रूपये 500 कोटी रूपयांचे अनुदान.
 •        ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती’ योजनेचा
  लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरण्याकरीता उत्पन्नाची मर्यादा आता रू. 8 लक्ष
  असेल. राज्यातील रस्त्यांचा लक्षणीय विकास. मागील साडे चार वर्षात 12
  हजार 984 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती.
 •        राज्यातील रस्ते विकासासाठी यंदा 8 हजार 500 कोटींचा नियतव्यय
  प्रस्तावित. नाबार्डद्वारे सहाय्यित रस्ते विकास योजनेसाठी 350 कोटी
  रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित.
 •        हायब्रीड ॲन्युईटी तत्वावर रस्त्यांचा सर्वांगीण विकास
  करण्यासाठी यंदा 3 हजार 700 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
 •        नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी भूसंपादनाची कामे वेगात.
 •       ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम
  सडक योजनेअंतर्गत यंदा 2 हजार 164 कोटींची तरतूद.
 •        सागरमाला योजनेंतर्गत सागरी किनारपट्टीवरील बंदरांमध्ये
  जलवाहतूकीसाठी जेट्टी बांधण्यासाठी यंदा 26 कोटींची तरतूद.
 •        मुंबई उपनगरीय लोकल रेल्वे वाहतूक व्यवस्थेतील सुधारणेत
  राज्याचाही मोलाचा वाटा. परिवहन प्रकल्प टप्पा-3 साठी मुंबई रेल्वे विकास
  कार्पोरेशन मार्फत 55 हजार कोटींची कामे.
 •        अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगांव, नांदेड, सोलापूर,
  कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग विमानतळ विकास मोहिम वेगात.
 •        सुमारे 67 लक्ष प्रवासी रोज प्रवास करतात त्या एस.टी. च्या
  विकासाचा निर्धार. 96 बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटी खर्चाला
  मान्यता. बसेसची खरेदी प्रक्रियाही वेगात.
 •        100 % गावांच्या विदयुतीकरणाचे लक्ष्य पूर्ण. ऊर्जा विभागाच्या
  पायाभूत सुविधांसाठी यंदा 6 हजार 306 कोटींची तरतूद.
 •       अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीजनिर्मिती करण्यावर भर. यंदा
  1 हजार 87 कोटींची तरतूद.
 •        शेतकरी, उदयोजक, यंत्रमागधारकांना दयावयाच्या वीजदर सवलतीसाठी
  यंदा 5 हजार 210 कोटींची तरतूद.
 •       मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या
  माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक.
 •       प्रस्तावित 42 माहिती तंत्रज्ञ उद्यानांतून 1 हजार 500 कोटींची
  गुंतवणूक अपेक्षित. त्यातून 1 लक्ष रोजगार निर्मितीची शक्यता.
 •       इलेक्ट्रॉनिक धोरणांतर्गत 18 प्रकल्प प्रगती पथावर. 6 हजार 300
  कोटींची गुंतवणूक. 12 हजार रोजगार निर्मिती अपेक्षित.
 •        सुक्ष्म, लघु औद्योगिक उपक्रमांच्या समूह विकास कार्यक्रमांतर्गत
  (Cluster) यंदा 65 कोटींची तरतूद.
 •        मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल
  कार्यक्रमासाठी राज्याचा वाटा म्हणून 735 कोटी रूपयांची तरतूद.
 •        राज्यात स्वच्छता अभियानांतर्गत 254 शहरामंध्ये 2 हजार 703 कोटी
  रूपयांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रगतीपथावर.
 •        स्मार्ट सिटी अभियानात पुणे, सोलापूर, कल्याण-डोंबिवली, नागपूर,
  नाशिक, ठाणे, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड या 8 शहरांसाठी यंदा 2 हजार 400
  कोटींची तरतूद.
 •        दारिद्रय रेषेखालील नागरिकांच्या आरोग्य उपचारासाठी प्रधानमंत्री
  जनआरोग्य योजनेअंतर्गत रूपये 1 हजार 21 कोटींची तरतूद.
 •        राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या योजनेसाठी रूपये 2 हजार 98
  कोटींची तरतूद.
 •        वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वैद्यकीय महाविदयालयांची बांधकामे व
  इतर उपक्रमांसाठी रूपये 764 कोटींची तरतूद.
 •        राज्यातील प्रदूषित नदी व तलाव संवर्धन तसेच अन्य बाबींसाठी
  पर्यावरण विभागासाठी रू. 240 कोटींची तरतूद.
 •        समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगिण विकासासाठीच्या अनुसूचित
  जाती उपयोजनेसाठी 9 हजार 208 कोटींची तरतूद.
 •        महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग
  वित्त व विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास
  महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळांना भागभांडवल
  उभारण्यासाठी शासनाची हमी म्हणून 325 कोटींची तरतूद.
 •        आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जनजाती उपयोजनेअंतर्गत विविध
  योजनांसाठी 8 हजार 431 कोटींची तरतूद.
 •        राज्यातील अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या
  विविध योजनांसाठी 465 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित.
 •        ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या
  कल्याणासाठीच्या विविध योजनांसाठी 2 हजार 892 कोटींची तरतूद.
 •        अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल 400 कोटींनी वाढविणार.
 •        महिला व बालविकासाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी 2 हजार 921
  कोटींची तरतूद.
 •        ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी नव तेजस्वीनी योजना.
 •        यंदाच्या वर्षात 5 हजार अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी
  केंद्रात रूपांतरित करण्याचे  उदीष्ट.
 •        एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बालक, गरोदर व स्तनदा माता
  यांना पोषण आहार देण्यासाठी 1 हजार 97 कोटींची तरतूद.
 •        प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील 385 शहरातील
  नागरिकांकरता 6 हजार 895 कोटींची तरतूद.
 •        औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागातील 14 जिल्हयातील दारिद्रय
  रेषेवरील शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने तांदूळ व गहू पुरविण्यासाठी 896
  कोटी 63 लक्ष रूपयांची तरतूद.
 •        अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाटय
  संमेलन आदी उपक्रमांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ.
 •        राज्यातील किल्यांचे जतन व संवर्धन उपक्रमासाठी निधीची तरतूद.
  रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना. प्रत्येकी 14 किल्यांचा 2 टप्प्यात
  विकास.
 •        मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी
  योजनेंतर्गत 2 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत
  इमारत बांधण्यासाठी रूपये 75 कोटींची तरतूद.
 •        शासनाच्या विविध विभागांशी संबंधित सेवा नागरिकांना ऑनलाईन
  उपलब्ध करून देण्यासाठी 60 कोटींची तरतूद.
 •        सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची महारष्ट्रात 1 जानेवारी 2016
  पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी. विद्यमान कर्मचाऱ्यांसोबतच
  निवृत्तीधारकांनाही लाभ.
 •        राज्यातील न्यायालय इमारती, न्यायाधीशांची निवासस्थाने आदींच्या
  प्रयोजनार्थ यंदा 725 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.
 •        पोलीसांसाठी राज्यात 1 लक्ष निवासस्थाने बांधण्याचे उद्दिष्ट.
  यंदा 375 कोटींची तरतूद.
 •        विविध कायद्यातील थकीत व विवादीत कर, व्याज, दंड, विलंब शुल्क
  आदींच्या तडजोडीसाठी ‘अभय योजना’ प्रस्तावित.
 •        यंदाच्या आर्थिक वर्षात कार्यक्रम खर्चाची रक्कम 99 हजार कोटी
  रूपये  निश्चित.  यात विशेष घटक योजनेच्या 9 हजार 208 कोटी, आदिवासी
  विकास योजनेच्या 8 हजार 431 कोटी तर जिल्हा वार्षिक योजनेच्या 9 हजार
  कोटी नियतव्ययाचा समावेश.
 •        मार्च 2018 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 2018-19 मध्ये 54 हजार
  996 कोटी एवढी निव्वळ कर्ज उभारणी करावयाची होती. मात्र जाणीवपूर्वक
  केलेले प्रयत्न व योग्य नियोजनामुळे राज्यावरील कर्ज उभारणी 11 हजार 990
  कोटी रूपयांपर्यंत सीमित करण्यात यश. परिणामी राज्यावरील एकूण कर्जाची
  रक्कम 4 लक्ष 14 हजार 411 कोटी एवढी झाली आहे. राज्याच्या
  अर्थव्यवस्थेच्या एकूण आकारमानाच्या तुलनेत हे कर्ज वाजवी प्रमाणात
  असल्याचा वित्तीय  निर्देशांकाचा निष्कर्ष.
 •        राज्यावरील कर्जाचे प्रमाण राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 14.82
  % एवढे आहे. मागील पाच वर्षात कर्जाचे हे प्रमाण 15 टक्क्यांहून कमी
  करण्यात सरकारला यश लाभले आहे.
 •        राज्याचा यंदाचा अर्थसंकल्पात महसुली जमा 3 लक्ष 14 हजार 489
  कोटी रूपयांची तर महसुली खर्च 3 लक्ष 34 हजार 273 कोटी रूपयांचा अंदाजित
  आहे. परिणामी 19 हजार 784 कोटी रूपयांची महसुली तूट अंदाजित आहे.
 •        वेतन आयोगाच्या तरतूदी लागू केल्यानंतर राज्याच्या
  अर्थव्यवस्थेवर काहीसा ताण आल्याने ही तूट स्वाभाविकच. मात्र अनावश्यक
  खर्चात बचत आणि महसुली वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादीत
  करण्याचा प्रयत्न असेल.
Read more...

बेल्हे परिसरात ऊसाला आगीचे सत्र; दिड एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी

सुधाकर सैद , बेल्हे (सजग वेब टीम)

बेल्हे | जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात  यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत असून असलेल्या जेमतेम पाण्यावर आपापली पिके जगविण्याची धडपड करत असून कल्याण-नगर महामार्गावरील गुंजाळवाडीच्या (बेल्हे ) शिवारात दत्तात्रय सखाराम गुंजाळ यांचा दिड एकर उस आगीच्या भक्षस्थानी पडला असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून अर्धवट ओढलेल्या विडी, सिगारेट किंवा आगपेटीच्या काडीमुळे लागलेल्या आगीमध्ये ऐन दुष्काळात जगविलेला व त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून काही आडाखे बांधलेले असतानाच   दिड एकर उस जळून खाक झाला यावेळी वीजपुरवठा बंद असल्याने व जवळपास पाण्याची काहीही सोय नसल्याने आगीने रौद्र स्वरुप धारण केले व संपूर्ण उस आगीच्या भक्षस्थानी पडला,याचवेळी कारखान्याचे ऊसतोड कामगार ऊस तोडण्याचे करत होते, तसेच या आगीमुळे शेजारीच असणाऱ्या राजेंद्र गंगाधर गुंजाळ या शेतक-याच्या द्राक्ष बागेतील ५००झाडांना या आगीची झळ पोहोचली असून चालू हंगामासह नवीन झाडांच्या लागवडीसह जवळजवळ पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले,या आगीचे कारणही अज्ञात असल्याचे समजते.या अचानक लागलेल्या आगीचा पंचनामा बेल्हे महसूल कार्यालयाने केला.

Read more...

लग्नातील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळासाठी १५ हजारांची मदत

सुधाकर सैद , बेल्हे (सजग वेब टीम)

बेल्हे | बांगरवाडी(ता.जुन्नर) येथील प्रमोद बांगर यांनी आपल्या पुतण्याच्या लग्नामधील अनावश्यक खर्च टाळून सामाजिक संस्था व बांगरवाडी येथील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोरांसाठी चारापाण्याची व्यवस्था करण्यासाठी मदत केली. त्यांनी  १५ हजार रुपयांची मदत तीन सामाजिक संस्थांना केली. बांगरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व बांगरवाडी विकास पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रमोद बांगर यांनी आपल्या पुतण्याच्या लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपत राजुरी व आळे येथील निराधार वृद्धांसाठी जेवणाची व्यवस्था करणाऱ्या अन्नपूर्णा संस्थेला प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली तसेच स्वतःच्या बांगरवाडी गावातील  निसर्गाचा अमूल्य ठेवा असणारा राष्ट्रीय पक्षी मोरांच्या चारा व पाण्याच्या व्यवस्थेसाठी पाच हजार रुपयांची मदत केली.या त्यांच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले व ईतरांनीही यापासून बोध घेण्याची गरज आहे अशी चर्चा बांगरवाडी परिसरात चालू आहे.

Read more...

राष्ट्रवादी शिवसेना यांच्यात झालेल्या वादात दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल

प्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)

मंचर | काल निरगुडसर येथे शिवसेना शाखा उदघाटन झाल्यानंतर दोन जमावा मध्ये झालेल्या भांडणे मारामारी नंतर दोन्ही पक्षाने एकमेका विरुद्ध अँट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केला असून यात विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसेपातील यांचे पुतणे व भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसेपाटील यांच्या सह 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर माजी उपसरपंच रवी वळसेपाटील यांच्या पत्नी मनीषा वळसेपाटील यांच्या सह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून
फिर्यादीचे अमरजीत नामदेव गायकवाड( वय 30 वर्ष, धंदा खाजगी नोकरी, रा. निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे.)
,प्रदीप प्रताप वळसे,रामदास पांडुरंग वळसे,राहुल झुंजारराव हांडे,विश्वास भिकाजी गोरे,मिलिंद बाजीराव वळसे, मंगेश संभाजी वळसे,संदीप भाऊ सो वळसे,संतोष बापूराव वळसे,संदीप सदाशिव टेमकर,संतोष महादू टाव्हरे,विकास बाबाजी टाव्हरे , उदय हंबीराव हांडे ,अक्षय बाळासाहेब थोरात,शुभम अंबादास भोंडवे,ज्ञानेश्वर उर्फ माउली आदक (पूर्ण नाव माहित नाही),प्रमोद दिनकर वळसे,शाम तुळशीराम टाव्हरे,धीरज हांडे (पूर्ण नाव माहित नाही), वैभव रामचंद्र वळसे, पंकज वळसे पूर्ण नाव माहित नाही अ न 1ते 20 सर्व रा निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे संजय नामदेव गोरे, तुषार सोपान टाव्हरे,संतोष दत्तात्रय मेंगडे,मंदाकिणी प्रताप वळसे, उर्मिला संतोष वळसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शांताराम रामभाऊ उमाप (वय,४६,रा.निरगुडसर) यांनी गणपत मारुती वळसे, मनीषा रवींद्र वळसे,राजेंद्र बबन वळसे,रेश्मा राजेंद्र वळसे,वसंत शंकर वळसे, अलका वसंत वळसे,विशाल वसंत वळसे,विकास वसंत वळसे,विद्या विशाल वळसे,अमर नामदेव गायकवाड,विकास कडवे,महेश गणपत राऊत,वैभव बाळासाहेब किरे,राजेंद्र पंचरास आदी वर गुन्हा दाखल केला आहे परिस्थिती शांत असून
सदर गुन्ह्याचा तपास खेड आंबेगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे करत असून त्यांनी ग्रामस्थांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे.

Read more...

शौर्यपदक सन्मानित वीर जवान प्रसाद बाजीराव थोरात यांचे दुःखद निधन


प्रमोद दांगट, आंंबेगाव (सजग वेब टीम)

मंचर | चांडोली बु. ता. आंबेगाव येथील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेले शौर्य पदक सन्मानित झालेले प्रसाद बाजीराव थोरात वय ३२ यांचा आजारपणामुळे दुःखद निधन झाले आहे

प्रसाद बाजीराव थोरात यांनी २००५ साली पुणे येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दला मध्ये नोकरीची सुरवात केली , संपूर्ण कार्यकाळात १४ वर्षे सेवा केली असून,आसाम,बिहार,पुणे,मुबंई,ओरिसा,चेन्नई, हैदराबाद येथे त्यांनी सेवा केली असून आसाम मध्ये उल्फा आतंकवाद्या सोबत केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी शौर्यपदकाने त्यांचा सन्मान केला होता ड्युटीवर असताना ते आजारी पडले व दीड महिना ते शुश्रषा हॉस्पिटल शासकीय येथे दाखल होते पहाटे चार वाजता त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ गोरक्ष,पत्नी सारिका,आई शारदा असा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read more...

कडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत मनोज खांडेभराड प्रचंड मतांनी विजयी

सजग वेब टीम, चाकण

चाकण | कडाचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक मनोज खांडेभराड प्रचंड मतांनी विजयी.
खेड तालुक्यातील कडाचीवाडी गावी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहा जागांवर उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत लोकनेते व भाजपामधल्या
दिग्गजांनी घरोघर केलेल्या प्रचाराने पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही.जो बरसतो तो कधी गरजत नसतो अशी समज मनोज यांनी खरी ठरवली.येथील गावकऱ्यांना ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे नियोजन होते,परंतु तालुक्यातील राजकारण करणाऱ्या नेत्यांनी त्या प्रक्रियेला विरोध केल्याचा आरोप या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला.

गावात बऱ्याच ठिकाणी सत्तांतर झाले. वर्षानुवर्षे गावकीचा कारभार पाहणाऱ्यांना मतदारांनी बाजूला केले. नव्याने आलेल्या तरुणाईला मतदारांनी पसंती दिल्याचे दिसून येते. निवडून आलेल्यांमध्ये अनेक जण पदवीधरही आहेत.

पक्षीयदृष्ट्या विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या गटाचीच सत्ता आली आहे,असे म्हणावे लागेल .सहज उपलब्ध,सदैव संपर्कात.
प्रामाणिक सोबत,प्रत्येक संघर्षांत.युवकांचे आशास्थान समर्थशाली नेतृत्व प्रत्येक सामान्यजणाच्या सुख-दुःखात सहभागी असणारे मनोज खांडेभराड यांच्या विजयाचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक केलेमा,आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक खेङ तालुका राष्ट्रवादी कार्याध्यक्ष म्हणून मनोज खांडेभराड परिचित आहे ,सरपंच सुनंदा लष्करे या बिनविरोध निवडून आल्या होत्या निवडून आलेल्या मध्ये बाळासो कड, सपना कड ,निर्मला शाम कड,सोनल कोतवाल,तर बिनविरोध रुपाली खांडेभराड, महादेव बुचुटे आले आहेत,
स्वयंघोषित नेते बाबत खदखदत असलेला संताप मतदारांनी निवडणुकीतून व्यक्त करीत मनोज खांडेभराड व पाडुरंग लष्करे समर्थक उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देत सेना व भाजपच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

Read more...

भारताचा पाकवर एअर स्ट्राईक, ‘जैश’च्या तळांवर फेकला हजार किलोचा बॉम्ब

ए एन आय वृत्तसंस्था

दिल्ली | पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यातआले आहेत. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती.अखेर मंगळवारी भारताने हवाई दलाने पाकला सडेतोड उत्तर दिले आहे.

Read more...

गिरिप्रेमी संस्थेच्या वतीने माउंट कांचनजुंगा शिखरावर सर्वात मोठ्या नागरी मोहीमेचे आयोजन

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था ‘गिरिप्रेमी’ येत्या एप्रिल- मे महिन्यामध्ये जगातील तिसरे उंच शिखर व भारतातील सर्वात उंच शिखर ‘माउंट कांचनजुंगा’वर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जात आहे. या मोहिमेचा भगवा ध्वजप्रदान कार्यक्रम रविवारी, २४ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी येथे पार पडला.

श्री साई बाबा संस्थान, शिर्डीचे अध्यक्ष व हावरे बिल्डर्स व इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचा भगवा ध्वज मोहिमेचे नेते उमेश झिरपे व इतर संघ सदस्यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच, मोहिमेतील सर्व सदस्य, गिरिप्रेमीचे सदस्य व हितचिंतक यांनी श्री शिव छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून मोहिमेसाठी आशीर्वाद घेतले.
महाराष्ट्राचा भगवा ध्वज म्हणजे शोर्याचे प्रतिक. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या धीरोदात्त कामगिरीचे, साहसाचे व हिंदवी स्वराज्याचे निशाण. गौरवशाली परंपरेचे प्रतिक असलेला भगवा गिरिप्रेमी आता भारतातील सर्वात उंच शिखरावर घेऊन जात आहे. ही ‘मोहीम महाराष्ट्राची’ असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नागरी मोहिमेच्या माध्यमातून भगवा ‘माउंट कांचनजुंगा’वर फडकणार आहे.

८५८६ मीटर उंच असलेले ‘माउंट कांचनजुंगा’ हे जगातील उंचीनुसार तिसरे शिखर आहे. तसेच भारतातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखरावर खूप कमी मोहिमा आखल्या जातात, या शिखरावर आत्तापर्यत फक्त ४०० च्या आसपास गिर्यारोहकच चढाई करू शकले आहेत.

तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या या शिखरावर गिरिप्रेमीने महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम आयोजित केली आहे. चढाईसोबतच ही मोहीम पर्यावरणपूरक असून कांचनजुंगा शिखरपरिसरामध्ये व कांचनजुंगा जैवविविधता क्षेत्रामध्ये पर्यावरण संवर्धनाचे व स्वच्छतेचे विशेष काम मोहिमेअंतर्गत हाती घेण्यात आले आहे.भगवा ध्वजप्रदान कार्यक्रमाच्या माध्यमातून मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला.

Read more...
Open chat