प्रणाली कोद्रे यांची महा स्पोर्ट्सच्या संपादकपदी नियुक्ती

 

पुणे, ता. २९ । देशातील पहिली प्रादेशिक स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट अशी ओळख असलेल्या महा स्पोर्ट्सच्या (mahasports.co.in) संपादकपदी प्रणाली कोद्रे यांची आज नियुक्ती करण्यात आली. महा स्पोर्ट्सला २९ डिसेंबर रोजी दोन वर्ष पुर्ण होत असून याचे औचित्य साधून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

गेली दीड वर्ष महा स्पोर्ट्समध्ये विविध पदांवर काम केल्यानंतर २२ वर्षीय कोद्रे यांनी आज ही सुत्रे स्विकारली. “ही एक मोठी जबाबदारी असून येत्या काळात महा स्पोर्ट्सला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे”, असा विश्वास यावेळी कोद्रे यांनी व्यक्त केला.

महा स्पोर्ट्स ही पुणे स्थित मराठी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट असून याची मालकी ‘डीजी राईस्टर’ (digiroister.com) या डिजीटल मॅनेजमेंट फर्मकडे आहे. महा स्पोर्ट्सबरोबरच याच वर्षी ‘डीजी राईस्टर’ने खेल कबड्डी (khelkabaddi.in) ही केवळ कबड्डी क्षेत्रावरील न्यूज वेबसाईट सुरु केली असून तिलाही क्रीडाप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

गेल्या दोन वर्षात महा स्पोर्ट्ने अनेक खेळांवर अतिशय सुरेख वार्तांकन केले असून सध्या दरमहा सरासरी ४० लाखांपेक्षा जास्त वाचक या वेबसाईटला प्रत्यक्ष किंवा विविध अॅपच्या माध्यमातून भेट देतात. फेसबुकवर महा स्पोर्ट्सचे ४ लाखांहून अधिक फाॅलोवर्स असून ट्वीटर, इंस्टाग्राम आणि युट्युबवरही वेबसाईटवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

येत्या काळात महा स्पोर्ट्सने महिन्याला १ कोटी वाचकांचे लक्ष ठेवले असून जास्तीत जास्त मल्टिमीडिया स्टोरीला वेबसाईटच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे.

Read more...

भाजपचे दोन विद्यमान सरपंच विवाह बंधनात अडकणार …१३ जानेवारीला #सरपंचविवाह सोहळा रंगणार ..

 

पुणे – सध्या लग्न सराई चे दिवस चालू आहेत सगळीकडे लग्नांची धूम पाहायला मिळतेय. पुणे जिल्ह्यात मात्र चर्चा आहे एका अनोख्या विवाह सोहळ्याची. असं काय आहे खास या विवाहासंबंधी जाणून घेऊयात. भाजप युवा मोर्चा चे पुणे जिल्हाध्यक्ष, हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गावचे विद्यमान सरपंच सुदर्शन चौधरी यांचा विवाह भाजप युवा मोर्चा च्या प्रदेश सचिव, खेड तालुक्यातील मेदनकरवाडी (चाकण) च्या सरपंच प्रियांका मेदनकर यांच्याशी येत्या १३ जानेवारीला होणार आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही विद्यमान सरपंच असल्याने या विवाह सोहळ्याची चर्चा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगलीये. दर रविवारी स्वच्छ भारत अभियान, गणेश फेस्टिव्हल, सीएम चषक सारख्या वेगवेगळ्या उपक्रमांनी आपल्या गावाला आणि पक्षाला वेगळी दिशा देणारे सुदर्शन चौधरी यांनी एक युवा सरपंच म्हणून वेगळी छाप पाडली आहे. तसेच त्यांच्या घरात सून म्हणून येणाऱ्या प्रियांका मेदनकर याही MIT School of Govt. मधून पदवीधर आहेत तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातील आहेत आणि विद्यमान सरपंच असून त्याही भाजप च्याच पदाधिकारी आहेत. प्रियांका यांनीही मेदनकरवाडी येथे महिला आणि आरोग्य संदर्भात असेल किंवा एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन वाटप, सरपंच आपल्या दारी हा उपक्रम, डिजिटल ग्रामपंचायत अशा विविध उपक्रमांमधून आपली छाप पाडली आहे. या दोघाही उभयतांचा सरपंच पदाचा कार्यकाळ हा २०२० पर्यंत आहे.

Read more...

शिलेदार म्हणवून घेणारे फक्त पाट्या लावत सुटलेत – सुरज वाजगे

शिलेदार म्हणवून घेणारे फक्त पाट्या लावत सुटलेत – सुरज वाजगे

जुन्नर – जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निरगुडे शाखा उदघाटन समारंभात बोलताना युवक चे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे यांनी आमदार सोनवणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की पूर्वीच्या काळी किल्लेदार हा जनतेच्या सुख दुःखाची काळजी घेत असे रयतेचे अन्न, पाणी, जनावरांचा चारा असेल या सर्वच गोष्टींची काळजी किल्लेदार घेत असे. परंतु आज स्वतःला किल्लेदार म्हणवून घेणारे मात्र काम न करता फक्त पाट्याच लावत सुटलेत अशी खरमरीत टिका त्यांनी आमदार सोनवणे यांचे नाव न घेता केली. युवकांनी फक्त शिवाजी महाराजांच्या नावे घोषणा देणाऱ्यांच्या मागे जाऊ नये तर कामे करणाऱ्यांच्या मागे उभे राहावे. माजी आमदार वल्लभ बेनके यांनी केलेल्या शिवनेरी किल्ला विकासाचे मॉडेल हे रोल मॉडेल असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले. शरद पवार साहेब, अजितदादा आणि अतुल बेनके यांच्या मागे आपली ताकद उभी करून त्यांना भक्कम साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित युवकांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्याने आणि टिकेने आता तालुक्याच्या राजकारणाची हवा ऐन हिवाळयात गरम होऊ लागली आहे.

Read more...

जुन्नर तालुक्यात सध्या चर्चा या फोटो ची

 

जुन्नर – जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध नेत्यांमध्ये असलेलं सख्य हे पूर्ण तालुक्याला माहित आहे. त्यात कायम चर्चेत राहिलेलं उदाहरण म्हणजे बाजार समितीचे सभापती संजय काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अतुल बेनके यांचे. या दोघांचेही याआधीचे मतभेद आणि राजकीय कारस्थानं तालुक्याने पाहिली आहेत. परंतु सध्या जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मधील एकी मात्र वाढताना दिसतेय वरील फोटो मात्र हेच काहीसं सांगतोय. अतुल बेनके, पांडुरंग पवार, शरदराव लेंडे, मोहित ढमाले, अंकुश आमले यांची बूथ कमिटी व्यवस्थापन कामात चाललेली लगबग आणि बूथ कार्यकारिणीचा घेतलेला आढावा हे पाहता सर्वच स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने पुढे चाललीये असं वातावरण मात्र सध्या तालुक्यात दिसतेय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बूथ कमिटी व्यवस्थापन बैठकीत सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या कानपिचक्यांचा हा फरक आहे की काय? अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगताना दिसतेय आणि युवानेते रोहित पवार यांचे वाढते दौरे ही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणूक तयारीसाठी हि चांगली गोष्ट आहे असं म्हणावं लागेल.

Read more...

युवा नेतृत्व रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या – मोहिते पा.

 

 

राजगुरूनगर – शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण यावर अनेक मत मतांतरे येत असताना आता खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही आता याविषयावर मत व्यक्त केलं आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यांवर शरद पवारांचे खुप मोठे उपकार आहेत. त्यामुळे याच उपकारांची परतफेड करण्यासाठी युवा नेतृत्व रोहित पवारांना शिरुर लोकसभेची उमेदवारी द्या. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केली होती.

शिरूर मतदारसंघातून रोहित पवार याना उमदेवार द्यावी. रोहित पवार हेच शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुरून उरतील असे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते यांनी केले.

Read more...

राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत १३ निर्णयांना मान्यता

राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत १३ मंत्रिमंडळ निर्णयांना मान्यता

#मंत्रिमंडळनिर्णय –

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय.

सातारा जिल्ह्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ४०८९ कोटी किंमतीस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी भाडेकराराने देण्यात येणाऱ्या महापौर बंगल्याच्या भाडेकरार दस्तावर देय असलेले मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ.

मुंबई येथे डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता.

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील तलावांमधील पाण्याचा सिंचन व पिण्यासाठी उपयोग करण्यास प्रशासकीय मान्यता.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ फेब्रुवारीऐवजी २५ फेब्रुवारी २०१९ पासून घेण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यास मान्यता.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेसाठी (सारथी) व्यवस्थापकीय संचालक हे पद निर्माण करण्यास मान्यता.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे ग्राम न्यायालयाऐवजी दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापण्यात येणार.

राहता (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायालय (वर‍िष्ठ स्तर) स्थापन करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यास मान्यता.

रस्ता सुरक्षाविषयक राज्यस्तरीय कामकाज हाताळण्यासाठी राज्यस्तरीय शीर्ष संस्थेची स्थापना करण्यासह या संस्थेसाठी सहपरिवहन आयुक्त हे पद निर्माण करण्यात येणार.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम – २०१६ तरतुदीनुसार विद्यापीठांसाठी विद्याशाखा अधिष्ठाता ही पदे निर्माण करण्यात येणार.

राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांशी संबंधित बाबींसाठी तरतूद करण्यासाठी असणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

राज्याचे नवीन वस्रोद्योग धोरण – २०१८ – २३ सुधारणा करण्याचा निर्णय.

Read more...

अयंssss बाबू पाटे…

नारायणगाव : नारायणगाव चे विद्यमान लोकनियुक्त सरपंच यांच्या मागील वर्षी झालेल्या निवडणूक प्रचाराचा प्रभाव अजूनही तसाच आहे याची प्रचिती काल नारायणगाव मध्ये आली. नारायणगावमधील अनेक लहान मुले आज त्यांच्या गावच्या सरपंचांना ओळखतात त्यांना त्यांचे नावही माहीत आहे. अनेक पालकांना त्यांची मुले त्यांना भेटण्याचा हट्ट ही करतात.

काल मात्र वेगळाच किस्सा घडला. ग्रामपंचायतीच्या कामांचा आढावा घेत असताना वार्ड क्र. ३ च्या खेबडे मळा आणि वैदवस्ती भागात सरपंच, ग्रा. पं. सदस्य अरीफभाई अत्तार, गणेश पाटे सतीश पाटे आदी कार्यकर्ते कामांची पाहणी करताना एका लहान मुलाने बाबूभाऊंना बिनधास्तपणे हाक मारली तीही चक्क अशी “अयंssss बाबू पाटे” ती हाक ऐकून सर्व उपस्थित हास्यकल्लोळात बुडाले. त्या मुलाला मात्र आपण थोडंस अतिउत्साहीपणा दाखवलाय याची जाणीव झाली तो मात्र गर्दीतून हळूच गायब झाला. त्या मुलाने मारलेली हाक त्याचे वय पाहता मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत जे गाणं वाजत होतं ‘बाबू पाटे हे एकच नाव’ त्याचाच हा प्रभाव लहान मुलांमध्ये अजूनही पाहायला मिळत. नारायणगाव मधील सर्वच स्तरातील लोकांमध्ये आपली ओळख पोहोचविण्यात बाबूभाऊ मात्र यशस्वी झालेत हे प्रचाराच्या एकवर्षा नंतरही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या २७ डिसेंबर ला त्यांच्या निवडणूक विजयाची वर्षपूर्ती होत आहे. या धर्तीवर नारायणगाव मध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

शब्दांकन – (स्वप्नील ढवळे)

Read more...
Open chat