सत्यशील शेरकर यांना सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
शेरकर यांना सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
सजग वेब टिम, जुन्नर
संगमनेर | दंडकारण्य अभियानाचे प्रणेते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती निमित्त आज रविवार, दि.१२ रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे प्रेरणादिन पुरस्कार व सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा ‘स्वातंत्रसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार’ एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना, तर कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘डॉ अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ पर्यावरण तज्ञ डॉ गिरीश गांधी यांना प्रदान करण्यात आला.
तसेच थोरात सेवाभावी संस्थेचा ‘सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ शिरोली बु| येथील श्री विघ्नहर सह. साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी योगिता शेरकर यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्यावेळी शेरकर यांच्या मातोश्री सुमित्राताई शेरकर, थोरात कारखान्याचे चेअरमन माधवराव कानडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व दादांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सत्यशिल शेरकर यांचे कमी वयात सहकार क्षेत्रात पदार्पण, विघ्नहर साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या ऊसाला सर्वाधिक भाव, कारखान्याची मागील निवडणूक बिनविरोध,१८ मेगावॉटचा वीज प्रकल्प तसेच विविध सहकारी संस्थाचा मुख्य पदभार स्विकारून त्या ठिकाणी योग्य निर्णय आणि उत्तम कामगिरी व याच बरोबर ही सर्व जबाबदारी पेलत असताना त्यांच्या पत्नी योगिता शेरकर यांची मिळालेली साथ व महिला वर्गासाठी त्यांनी दिलेले योगदान अशा आदी निकषांवर निवड समितीने निवड केली होती. ५१ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शेरकर यांच्या नेतृत्वाखाली विघ्नहर कारखान्याला देश व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत तसेच भारतीय शुगर संस्थेचा देश पातळीवरील ‘भारतीय युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्रीज’ हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या राज्यस्तरीय ‘सहकारातील सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्काराने जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे असे दिसून येते.
Leave a Reply