नारायणगाव परिसरातील आधार कार्ड सुविधा केंद्र त्वरित चालू करावे – बाबूभाऊ पाटे

सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव | नारायणगाव-वारूळवाडी परिसरात एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एकही आधार कार्ड केंद्र सध्या चालू नाहीये. नवीन जन्मलेल्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रात आधार मागतायेत. मुलांच्या ऍडमिशन साठी आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड मधील काही तांत्रिक दुरुस्त्या करण्यासाठी आधार केंद्रांमध्ये सुविधा उपलब्ध नाहीये. या संदर्भात अनेक तक्रारी नागरिकांनी ग्रामपंचायत कडे केल्या आहेत त्यामुळे पालक विद्यार्थी आणि इतर नागरिकांची गैरसोय होत आहे. या सुविधेसाठी नागरिकांची मागणी रास्त आहे. हे लक्षात घेऊन नारायणगाव ग्रामपंचायत ने पोस्ट ऑफिस ला पत्र व्यवहार करुन या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

सरपंच बाबूभाऊ पाटे यांनी स्वतः या तक्रारीकडे लक्ष देऊन संबंधित यंत्रणा त्वरित चालू करण्याची मागणी केली आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat