स्वागत सभेत अमोल कोल्हे उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचे लागले लक्ष
सजग वेब टीम, जुन्नर
जुन्नर : शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे लगेच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिरूर मतदारसंघासाठीचा विधानसभास्तरीय मेळावा उद्या दुपारी २.०० वा. नारायणगाव याठिकाणी तर सायं. ०५.०० वा. भोसरी याठिकाणी होत असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार आणि धनंजय मुंडे हे जाहीर मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
या स्वागत मेळाव्यात उद्या ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी कोल्हे यांना करावा लागलेला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि त्या संदर्भातील काही मुद्दे राजकिय आणि सामाजिक वर्तुळात सध्या चर्चेत आहेत. याच मालिकेवरून शिवसेनेतील काही नेते आणि पुणे जिल्ह्यातील एका महत्वाच्या खासदार व्यक्तीचे नाव न घेता त्यांनी केलेली टिका आणि वक्तव्ये यावर देखील ते प्रकाश टाकणार का? त्यांच्या स्वतःचे गाव नारायणगाव याठिकाणीच हि स्वागत सभा होत असल्याने कोल्हे या सभेत काय बोलणार याकडे राज्यातील सर्व राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मातब्बर नेते जिल्ह्यात येत असल्याने या दोन्ही ठिकाणच्या सभांना मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या महत्वाच्या दोन सभांमुळे शिरूर मतदार संघातील राजकिय वातावरण मात्र ढवळून निघणार आहे यात मात्र शंका नाही.
Leave a Reply