Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
'सोहळा मावळ्यांचा, स्वराज्याच्या ऐक्याचा', रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात | Sajag Times

‘सोहळा मावळ्यांचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’, रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्यावर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला.

सजग वेब टिम, रायगड

रायगड | अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला राज्यभरातून आलेले अठरापगड जाती धर्मातील हजारो मावळे राजगडावर उपस्थित होते. भगवे झेंडे, भगवे फेटे घालून आलेल्या मावळ्यांनी दिलेल्या ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणांनी रायगड परिसर दुमदुमून गेला. या सोहळ्याला खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्यावर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. राजसदरेवर शेतकरी कुटुंबाला बसण्याचा मान यंदा मिळाला. ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ संकल्पनेखाली काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत अठरापगड जाती धर्मातील लोक सहभागी झाले होते. पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

गडकोटांसाठी स्वतंत्र खाते निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत गडकोटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याकरिता जपानशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. तसेच गडाचा विकास करत असताना अनेक जण त्यातून मला काय फायदा होणार नाही, असे सांगतात. ते भुरटे, कुचके, फुटके आहेत. महिन्यातील दहा दिवस मी रायगडवर असतो. इथला एकेक दगड म्हणजे इतिहास आहे. मात्र, या लोकांची टिमटिम बंद झाली पाहिजे. रायगडचा विकास करताना अडचणी येत आहेत. तरीही त्याच्यावर मात करत कामे सुरू आहेत, असे सांगत असताना संभाजीराजे भावूक झाले. ते म्हणाले, रायगडचा विकास होत आहे. महाड ते रायगडमधून राष्ट्रीय महामार्ग जाणार असून. त्याचे काम कंत्राटदार करण्यास तयार नाही. शिवभक्त त्याला चोख प्रत्युत्तर देतील. त्यानंतर दरबारातून पालखी होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर मार्गे रवाना झाली. पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. पारंपरिक वेशभूषेत महिला, शिवभक्त, मुली सोहळ्यात सहभागी‌ झाल्या होत्या. लेझीमच्या प्रात्यक्षिकांत पालखी जगदीश्वर मंदिराकडे रवाना झाली. शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी मिरवणुकीची सांगता झाली.

तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या शेडमधून शिवछत्रपतींची पालखी ढोल ताशाच्या ठेक्यात शिरकाई देवीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. हलगी घुमकं कैताळाच्या कडकडाटात पालखी राजसदरेवर रवाना झाली. पाठोपाठ खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांचे राजसदरेवर आले. पोलिस बॅन्डने त्यांचे स्वागत केले. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी ‘रयतेचा हा राजा झाला संभाजीराजा’ हे स्वागतगीत गायिले. पोलंडच्या तिसऱ्या सचिव इव्हा स्टॅनकिव्हिसिक, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, प्रांत विठ्ठल इनामदार, जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे उपस्थित होते.

संभाजीराजे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीस सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांनी मूर्तीचे पूजन केले. यावेळी शाहीर आझाद नायकवडी यांनी शिवराज्याभिषेक गीत सादर झाले. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणा देण्यात आल्या.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat