Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल – खा.अमोल कोल्हे | Sajag Times

सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल – खा.अमोल कोल्हे

सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल – खा.अमोल कोल्हे

मोदींच्या वादग्रस्त पुस्तकावरुन खा.कोल्हे यांची भाजपवर परखड शब्दांत टीका

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई | भाजपाच्या दिल्ली कार्यालयातून प्रकाशित करण्यात आलेलं ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदींची छत्रपती शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून शिवभक्तांसह नेटिझन्सकडुनही भाजपवर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे यांसह अनेक संघटनांनी पुस्तक मागे घेण्याचा इशारा देत निषेध नोंदवला आहे.

या वादग्रस्त पुस्तकातील मोदींच्या छत्रपती शिवरायांशी केलेल्या तुलनेवरुन खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार शिवेंद्रराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. तर, उदयनराजे भोसले आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. यावर शिरुर लोकसभेचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पेजवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

खा.कोल्हे म्हणतात की, ”एखाद्या बाजारू लांगूलचालन करणाऱ्या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया देण्याची गरज नाही परंतु ‘काळ सोकावू नये’ म्हणून एवढंच सांगतो की दगडाला शेंदूर फासला जाताना अनेकदा पाहिला आहे पण सूर्याचं आवरण घालण्याचा प्रयत्न केला तर भस्मसात व्हाल!

छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वातंत्र्याची ओळख आहे, रयतेच्या राज्याचे प्रतीक आहे! ते एकमेवाद्वितीय आहेत…. कैक जन्म घेतले तरी त्यांची तुलना नाही.. हा अंगार साडेतीनशे पावणेचारशे वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या मनामनात धगधगत आहे…याचं भान ठेवा … नाहीतर जाणीव करून द्यावी लागेल!” अशा परखड शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी टीका करत सुनावले आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat