सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे देशातील पहिल्या पाच खासदारांमध्ये
सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे देशातील पहिल्या पाच खासदारांमध्ये
सजग वेब टिम, पुणे
पुणे | लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशातील पहिल्या पाच खासदारांत पहिले तीन खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत तर, त्यांच्या पाठोपाठ सुभाष भामरे (धुळे), डॉ.अमोल कोल्हे (शिरूर), सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) आणि बिद्युत महतो (जमशेदपूर) यांचा समावेश आहे.
खासदारांच्या लोकसभेतील कामगिरीची ३१ मे पर्यंतची दखल पुण्यातील परिवर्तन या संस्थेने घेतली आहे, अशी माहिती पुण्यातील परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने ऑनलाईन पत्रकार परिषदेत या बाबतची माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी तब्बल २१२ खा. डॉ. अमोल कोल्हे आणि खा. सुभाष भामरे यांनीही २०२ प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशातील मंदसौर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार सुधीर गप्ता यांनी १९८ तर झारखंडमधील जमदेशपूर मतदारसंघातील भाजपचे खासदार बिद्युत महतो यांनी १९५ प्रश्न विचारले आहेत.
सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांत सुळे, भामरे आणि डॉ.कोल्हे यांसह शिवसेनेचे मुंबई उत्तर पूर्वमधील खा. गजानन किर्तीकर यांनी १९५ प्रश्न उपस्थित करून चौथा क्रमांक मिळविला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी १९४ प्रश्न विचारून पाचवा क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक प्रश्न
विचारणाऱ्या देशातील पहिल्या पाच खासदारांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन तर भाजपचे तीन खासदार आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या पाच मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, भाजपचा एक आणि शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश आहे.
Leave a Reply