सुदैवाने जिवीत हानी टळली, विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार
सुदैवाने जिवीत हानी टळली, विद्युत महामंडळाचा भोंगळ कारभार
सजग वेब टीम, जुन्नर
नारायणगाव | नारायणगाव शेटे मळा येथील अटलांटा सिटी सोसायटीत असणार्या विद्युत महामंडळाच्या पोलवर स्पार्किंग होत असल्यामुळे सोसायटीमधील लहान मुले व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता या त्रासाबद्दल सोसायटीने विद्युत महामंडळाला दिनांक ९ जुन रोजी पत्र दिले होते. परंतु २१ दिवस उलटुनही महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी याकडे फिरकलेही नाही.
आज सकाळी पावसामुळे सोसायटी जवळील झाड पडल्याने विजेच्या तारा पडल्या. यावेळी नागरिक सोसायटी परिसरात व्यायाम करत होते. वेळीच सावधानतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी विद्युत महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका या सोसायटीतील नागरिकांना बसत आहे.
त्यामुळे सजग टाईम्सच्या या बातमीने का होईना विद्युत महामंडळाला जाग येऊन साेसायटी नागरिकांचा प्रश्न सुटावा ही अपेक्षा.
Leave a Reply