सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी मीनल जोगळेकर यांची नियुक्ती,
सांस्कृतिक कार्यसंचालनालयाच्या सह संचालक पदी मीनल जोगळेकर यांची नियुक्ती,
लवकरच संचालक पदाचा अतिरिक्त पदभार मिळण्याची शक्यता..!
सजग वेब टिम, मुंबई
(खंडूराज गायकवाड, मंत्रालय प्रतिनिधी)
मुंबई | माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांची सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सह संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.लवकरच त्यांच्याकडे संचालक पदाचा अतिरीक्त पदभार मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.
गेले अनेक महिन्यापासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक पद रिक्त होते. त्यामुळे दैनंदिन कामकाजाचा भार हा सर्व संचालकांवर येत होता.
सध्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. संचालनायच्या कारभारावर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी प्रचंड नाराज असल्याचे कळते. म्हणून या मनमानीला चाप लावण्यासाठी सांस्कृतिक विभाग कार्यालयाने आपले वजन वापरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून प्रतिनियुक्तवर श्रीमती जोगळेकर यांची सह संचालक पदी तातडीने नियुक्ती केली आहे.
लवकरच त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्य संचालनालायच्या संचालक पदाचा अतिरिक्त पदभार येण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात सुरू आहे.
Leave a Reply