सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित
खंडूराज गायकवाड , मंत्रालय प्रतिनिधी
मुंबई | राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे फेब्रुवारीच्या विधिमंडळ अधिवेशनात आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळाले नाही.
ही चूक उशिरा लक्षात आल्याने संबंधितांनी अखेर सध्याच्या जूनच्या अधिवेशनात ४५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून घेतली.
आज महाराष्ट्रातील हजारो वयोवृद्ध लोककलावंताकडे एक वेळचे जेवायला ही पैसे नाहीत.काही कलावंत अपुऱ्या औषधोपचारमुळे मृत्युमुखी पडलेच्या घटना घडल्या आहेत.यातच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अशा भोंगळ कारभारामुळे राज्यातील सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना फेब्रुवारी पासून ते आज जून महिना संपत आला तरी मानधन मिळाले नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी लेखानुदान सादर करणारे विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात नियमित योजनांवर सर्व खात्यांनी आर्थिक तरतूद करून घेतली होती. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्या काळात आपल्या खात्याकडे वयोवृद्ध लोककलावंताच्या मानधनासाठी अधिकृत प्रस्तावच सादर न केल्याने मोठी गडबड झाली.हे संचालनालयाच्या उशिरा लक्षात आले. मात्र यामुळेपाच महिन्यापासून गरीब गरजू लोककलावंत मानधनापासून वंचित राहिला.
सध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अनेक।वरिष्ठ अधिकारी “कार्यालयात कमी,आणि दौरे नेहमी” या प्रकारे काम करीत असल्याने अनेक योजना मध्ये अशाच अडचणी निर्माण झाल्याचे कळते.
चालू अधिवेशनात ४५कोटी रुपयांची तरतूद या मानधनासाठी करण्यात आली असून आता हे।मानधन साधारणपणे जुलै अखेर पर्यत मिळण्याची शक्यता आहे.
Leave a Reply