सरपंच योगेश पाटे यांचा “पर्यावरण रक्षक सन्मान २०२०” पुरस्कार देऊन गौरव
सरपंच योगेश पाटे यांचा “पर्यावरण रक्षक सन्मान २०२०” पुरस्कार देऊन गौरव
जलपुरुष राजेंद्रसिंह राणा, महात्मा गांधींचे वंशज अरुण गांधी, तुषार गांधी यांच्या हस्ते गौरव
सजग ब्युरो, राजस्थान
राजस्थान (अलवर) | जुन्नरकरांसाठी अभिमानाची बातमी तरुण भारत संघ राजस्थान संघाकडुन दिला “पर्यावरण रक्षक सन्मान २०२०” पुरस्कार नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांना जलपुरुष राजेंद्रसिंह राणा, महात्मा गांधी यांचे पुतणे अरुण गांधी आणि तुषार गांधी यांच्या हस्ते राजस्थान येथील तनागाझी जिल्हा अलवर येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी ज्ञानेश्वर अौटी, आरिफ आतार, गणेश पाटे, राजेश बाप्ते, धर्मेंद्र गुंजाळ, भागेश्वर डेरे, जयेश कोकणे, संदिप मुळे, अनिल खैरे, इश्वर पाटे, आकाश कानसकर, किरण ताजणे, अक्षय वाव्हळ, अजय पाटे यांसह सरपंच पाटे यांचा मित्रपरिवार व सहकारी यांसह विविध राज्यातुन आलेले पुरस्कारार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply