समानतेचे प्रतिक अन्‌ महिलांचे प्रेरणास्थळ ‘फुलेवाडा’ची भोसरीत प्रतिकृती

समानतेचे प्रतिक अन्‌ महिलांचे प्रेरणास्थळ ‘फुलेवाडा’ची भोसरीत प्रतिकृती

इंद्रायणी थडी जत्रेत मनोरंजनासह सामाजिक प्रबोधनाचा प्रयत्न

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा

सजग वेब टीम भोसरी

भोसरी । महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’मध्ये मनोरंजन अन्‌ खाद्य महोत्सवासह प्रबोधनावरही भर दिला आहे. जातीय समानता प्रस्तापित करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि शिक्षणाचे दरवाजे खुले करुन महिला सक्षमीकरणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणाची प्रवासाची साक्ष असलेला ऐतिहासिक ‘फुलेवाडा’ची प्रतिकृती या जत्रेत साकारली जाणार आहे. त्यामुळे ही जत्रा महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ भरविण्यात येणार आहे.  दि. ३०, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रवारी २०२० असे चार दिवस, सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे. विशेष म्हणजे, ही जत्रा सर्वांसाठी विनामूल्य आहे.

शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा महेश लांडगे म्हणाल्या की, महिला सक्षमीकरणाच्या हेतूने आम्ही ही जत्रा सुरू केली आहे. जत्रेचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी आम्ही ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी ‘थीम’ ठेवली आहे. माझ्यामते, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्याचवेळी खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला सुरूवात झाली होती. सावित्रीबाईंच्या त्यागामुळे आज आम्ही समाजात ताठ मानेने वावरत आहोत. सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षामुळेच आज प्रत्येक आघाडीवर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालू शकतो. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचे प्रतिक आणि आम्हा सर्वांचे प्रेरणास्थळ म्हणून ‘फुलेवाड्याची’ ओळख आहे. हा वाडा पुण्यात आहे. त्याची प्रतिकृती ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत उभारुन समाजिक समानता आणि स्त्री-शिक्षणाचा संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.

जत्रेत आधुनिकतेला परंपरा अन्‌ संस्कृतीची जोड : आमदार महेश लांडगे

आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘इंद्रायणी थडी’ ही सर्वसमावेशक असावी, असा हेतू आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरण हा मूळ हेतू असला, तरी समाजप्रबोधन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या जत्रेमध्ये अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, ‘रामायण’वर आधारीत महाराष्ट्रातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘लेझर शो’, धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, ग्राम संस्कृती, गड-किल्ले छायाचित्र प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, स्व-संरक्षणाचे धडे, परंपरिक नृत्य स्पर्धा अशा विविध माध्यमातून आधुनिकतेच्या काळात पारंपरिकता आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. यासह महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय आणि त्यांनी दिलेली समानता आणि महिला शिक्षणाची शिकवण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही जत्रेत ‘फुलेवाडा’ साकारला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
मनिषा थोरात : 9834138482.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat