समर्थ शैक्षणिक संकुलात ५५ पदवी व पदव्युत्तर प्रवेश सेतू सुविधा
sajagtimes2019-06-08T14:55:32+00:00
सजग वेब टिम, जुन्नर (सुधाकर सैद)
बेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात अभियांत्रिकी सह विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सेतू केंद्र कार्यान्वित होणार असल्याची माहिती प्रा.राजीव सावंत यांनी दिली.राज्यात या वर्षीपासून अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, अॕग्रीकल्चर, एम बी ए, एम सी ए, बी एड, विधी, हॉटेल मॅनेजमेंट,डेअरी टेक्नॉलॉजी आदींसह ५५ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सेतू सुविधा केंद्रामार्फत करण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामायिक परीक्षा कक्षाने घेतला आहे.
सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेश एकाच छताखाली होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांची प्रवेशासाठीची वणवण थांबणार असल्याचे फार्मसी चे प्राचार्य डॉ.वैभव आहेर यांनी सांगितले.हे सुविधा केंद्र समर्थ शैक्षणिक संकुलातील पुरेसे संगणक व आवश्यक असणारे तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने प्रदान करण्यात आलेले आहे.या सेतू केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक अभ्यासक्रमाची,प्रवेश पात्रतेची, महाविद्यालयाची माहिती उपलब्ध असणार आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक महाविद्यालयाचा विडिओ,तेथील पायाभूत सुख सुविधा, अभ्यासक्रम,परिसर,शैक्षणिक शुल्क आदी सर्व बाबींची माहिती ‘सफलता डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर पाहता येईल व विद्यार्थी घरबसल्या आपला प्रवेश कुठे घ्यायचा हे निश्चित करू शकेल अशी माहिती अभियायांत्रिकी महाविद्यालयाचे डीन डॉ.दिपराज देशमुख यांनी दिली.हे सुविधा केंद्र सुरू झाल्याने प्रवेशापासून कुठलाही विद्यार्थी अपुऱ्या माहितीमुळे वंचित राहणार नाही असा ठाम विश्वास अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अण्णासाहेब गोजे यांनी व्यक्त केला.
Leave a Reply