सचिन तेंडुलकर चे गुरू रमाकांत आचरेकर सरांचे निधन

मुंबई – क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला क्रिकेटचे बाळकडू देणारे गुरुजी रमाकांत आचरेकर यांचे काल निधन झाले. शिवाजी पार्क येथील निवासस्थानी त्यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

रमाकांत आचरेकर यांचा जन्म १९३२ झाला. त्यांनी १९४३ साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. सचिनसारख्या महान खेळाडूला घडवणाऱ्या आचरेकर सरांनी फक्त १ प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. भारतातील सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते. क्रिकेटपटूपेक्षा प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द खूप गाजली.
दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या रमाकांत आचरेकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना १९९० मध्ये साली द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविले गेले. आचरेकर मुंबईत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यायचे. भारतरत्न तेंडुलकरसह बलविंदर संधू, चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, संजय बांगर, रमेश पोवार खेळाडूंना घडवले.
क्रिकेट विश्वातील अनेक दर्जेदार खेळाडू तयार करणाऱ्या आचरेकर संराच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat