सक्तीने होणारी कर्ज वसुली हप्ते थांबवावी – जुन्नर भाजप युवा मोर्चाची मागणी
सक्तीने होणारी कर्ज वसुली हप्ते थांबवावी – जुन्नर भाजप युवा मोर्चाची मागणी
नायब तहसिलदार सचिन मुंढे यांच्याकडे दिले निवेदन
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर | कोरोना लाॅकडाऊनमुळे नागरिकांचे काम बंद असल्याने सक्तीने व अवाजवी दंड आकारुन सुरु असलेली बॅंका व फायनान्स कंपन्यांची सक्तीने होणारी कर्जाची हप्ते वसुली थांबविणे बाबत भाजप युवा मोर्चा जुन्नर तालुक्याच्यावतीने जुन्नर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसिलदार यांच्यावतीने नायब तहसिलदार सचिन मुंढे यांनी हे निवेदन स्विकारले.
त्यावेळी भाजप युवा मोर्चा जुन्नर तालुका अध्यक्ष प्रतिक जाधव, सरचिटणीस उमेश साळी, जुन्नर शहराध्यक्ष मयुर दिवेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना सारख्या मोठ्या आजारामुळे देश नाही तर पूर्ण जगाला ग्रासले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी निसर्ग चक्रीवादळामुळे शेतकर्यांसह अनेकांचे नुकसान झाले आहे. मात्र काही बँका, पतसंस्था, फायनान्स तसेच मायक्रोफायनान्स कंपन्या जुन्नर तालुक्यातील कर्जदारांची सक्तीने वसुली करत आहेत त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. यालाच कंटाळुन जर भविष्यात काही जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण असेल..?
हे कुठे तरी थांबले पाहिजे. म्हणून तहसिलदार यांनी स्वतः यात लक्ष घालावे तसेच वरिष्ठ पातळीवरुन यासंदर्भात बंधने घालावीत यासाठी हे निवेदन देण्यात आल्याचे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रतिक जाधव यांनी सांगितले.
Leave a Reply