श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी घरातच साजरी करावी – रेवणनाथ गायकवाड

श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी घरातच साजरी करावी – रेवणनाथ गायकवाड

सजग वेब टीम, जुन्नर   

जुन्नर |कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण संख्या वाढत आहे व ही साखळी खंडित करण्यासाठी पुणे जिल्हयात पुनःश्च लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या महिन्यात येत असलेला संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा घरात राहूनच साजरा करावा असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा संपर्क प्रमुख रेवणनाथ गायकवाड यांनी केले आहे.

१९ जुलै रोजी संत शिरोमणी सावता महाराज यांचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा पुण्यतिथी असुन दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अखंड हरिनाम सप्ताह, किर्तने, प्रवचने,अन्नदान महाआरती यांचे भव्य आयोजन करुन साजरा करण्यात येत असतो. परंतु यावर्षी संपूर्ण जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला असल्यामुळे शासन व प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांत लाॅकडाऊन जाहिर केल्यामुळे सर्व समाजबांधवांनी भाविकांनी संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी घरातच प्रतिमापूजन, दिपप्रज्वलन करुन विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करावी. तसेच कोरोना सारख्या महामारीच्या संकटात स्वतःची तसेच कुटुंब व आपल्या मित्रपरिवाराची काळजी घ्यावी असेही आवाहन केले आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat