श्री.विघ्नहर देवस्थानच्या वतीने जुन्नर, आंबेगाव, खेड, चाकण परिसरातील पोलिसांना मास्कचे वाटप
श्री.विघ्नहर देवस्थानकडून जुन्नर, आंबेगाव, खेड, चाकण परिसरातील पोलिसांना मास्कचे वाटप
सजग वेब टिम, जुन्नर
अोझर । कोरोनाने भारतात लाॅकडाऊन सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस, डाॅक्टर आज जीव धोक्यात घालुन दिवसरात्र काम करत आहे.
या पोलीस कर्मचार्यांच्या कामाची दखल घेऊन सुरक्षा उपाययोजना म्हणून श्री.विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट,ओझर यांच्यावतीने जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, ओतूर, मंचर, खेड, चाकण पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांसाठी प्रत्येक पोलिस स्टेशनला १०० मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
हा उपक्रम देवस्थान अध्यक्ष श्री.बी.व्ही.मांडे, अश्वमेघ युवा मंचचे संस्थापक व देवस्थानचे विश्वस्त गणेश कवडे व सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे राबविण्यात आला.
याप्रसंगी नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील,आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर आणि ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांसह मंचर, खेड, चाकण पोलिसांनाही हे मास्क सुपुर्त करण्यात आले.
Leave a Reply