श्री क्षेत्र दावलमलिक बाबा व आदिनाथ बाळेश्वर मंदीर रस्त्याचे सर्वेक्षण काम सुरू
श्री क्षेत्र दावलमलिक बाबा व आदिनाथ बाळेश्वर मंदीर रस्त्याचे सर्वेक्षण काम सुरू
बांगरवाडी | बांगरवाडी, बेल्हे येथील श्री क्षेत्र दावलमलिक बाबा व श्री.आदिनाथ बाळेश्वर मंदीर येथे डोंगरावर जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे करत होते. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे व जुन्नर तालुका आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न करुन आज श्रीक्षेत्र दावलमलिक बाबा व आदिनाथ बाळेश्वर मंदीर रस्त्याच्या कामासाठी आज सर्वेक्षण सुरू केले. या रस्त्याची मागणी बांगरवाडी गावचे सरपंच जालिंदर बांगर व अन्य ग्रामस्थांनी केली होती. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असून या रस्त्याचे सर्वेक्षण आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पांडुरंग पवार (उपाध्यक्ष व सदस्य जि. प.पुणे) यांच्या उपस्थितीत विभूते साहेब (कार्यकारी अभियंता RP PWD पुणे), दाते साहेब (उपअभियंता RP PWD पुणे), कांबळे साहेब(सर्वेअर RP PWD पुणे), खंडारे साहेब(सार्वजनिक बांधकाम विभाग, जुन्नर) यांनी पाहणी केली. उद्या पासून प्रत्यक्षात सर्वेक्षणाचे काम सुरु होईल. यावेळी बांगरवाडी चे सरपंच जालिंदर बांगर, सदनाना पतसंस्थेचे चेअरमन प्रदीपशेठ पिंगट, फकिरा पाबळे, गणेश पाबळे व निवृत्ती पवार आदी उपस्थित होते.
Leave a Reply