शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, हिवाळी अधिवेशनात करणार मागणी – आ.अतुल बेनके

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, हिवाळी अधिवेशनात करणार मागणी – आ. अतुल बेनके

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | शेतकरी संपातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत हि मागणी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने मांडणार असे आमदार अतुल बेनके यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर आमदार बेनके यांनी आज नारायणगाव येथे प्रथमच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेस जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, बबन तांबे, तालुका युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष सुरज वाजगे, राष्ट्रवादी अपंग सेलच्या तालुकाध्यक्ष पुष्पलता गोसावी, प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, विकास दरेकर, ज्ञानेश्वर निलख, गणेश वाजगे, अमित बेनके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आदिवासी गावांना उन्हाळ्यात टँकरने होणारा पाणी पुरवठा उशिरा होतो. त्यासाठी आदिवासी दहा गावात माणिकडोह धरणातून लिफ्ट योजनेद्वारे मध्यवर्ती ठिकाणी पाणी एकत्र करून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांसाठी शीतगृहे उभारून पणन महामंडळाच्या वतीने शेतमाल प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार.
याशिवाय रखडलेले क्रीडा संकुल पूर्ण व्हावे, ग्रामीण रुग्णालय जुन्नर, नारायणगाव येथे अद्ययावत सुविधा उपलब्ध करणे, वडज धरणाचे पाणी मीना नदी पुरते सीमित ठेवणे, पोलिस खाते, महसूल विभाग कार्यालयात नागरिकांना त्रास होतो त्या ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्याकडे लक्ष देणार असे आश्वासन यावेळी बेनके यांनी दिले.

सर्वांना सोबत घेऊन व राजकारण न करता एक आदर्श जुन्नर तालुका घडवणार असल्याचे बेनके यांनी सांगितले.
प्रत्येक गुरुवारी सकाळी ७ ते १२ नारायणगाव ला जनता दरबार भरविण्यात येणार असून महिन्यातील एका गुरुवारी सर्व अधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती बेनके यांनी यावेळी दिली.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat