शेतकरी विधेयकाविरोधात लोकभारती पक्षाच्या वतीने आळेफाटा येथे निदर्शने
लोकभारती पक्षाच्या वतीने आळेफाटा येथे मूक निषेध शेतकरी विरोधी विधेयक मंजूर झाल्याने निदर्शने
लोकभारती पुणे च्या वतीने आळेफाटा येथे पोलिस निरीक्षक मा. टी.वाय.मुजावर साहेब यांना निवेदन देण्यात आले.
सजग टाईम्स न्यूज, आळेफाटा
आळेफाटा | शेतकरी आणि शेती व्यवस्था उध्वस्त करणारी तीन विधेयक केंद्र सरकारने मंजूर करून घेतली आहेत. या विधेयकाच्या विरोधात देशभर शेतकरी आक्रमक आहेत. लोकभारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनीही आंदोलनाची हाक दिलीय. जगाचा पोशिंदा संकटात आहे. अशावेळी आपण साऱ्या बळीराजाच्या लेकरांनी सोबत उभ रहाणं गरजेचं आहे.
केंद्र सरकारने कायदे न करता स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करून लागू कराव्यात.या करीता लोकभारती पुणे च्या वतीने आळेफाटा चौक, शिवजन्मभूमी जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मूक निदर्शन करून पोलिस निरीक्षक मा. टी.वाय.मुजावर साहेब यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र संपर्क सचिव प्रमोद दिवेकर, जुन्नर तालुका लोकभारती अध्यक्ष मा.खालिदभाई पटेल,जुन्नर तालुका उपाध्यक्ष महेश थोरात, पारनेर तालुका अध्यक्ष रोहिदास डोंगरे, संगनमेर तालुक्याचे अध्यक्ष अनिल शिरोळे अणे शाखा अध्यक्ष सचिन पवार,संकेत कडुसकर, संपत शिंदे, सागर जगताप,फिरोज पटेल उपस्थित होते.तुळशीदास चौगुले व जुन्नर तालुक्यातील इतर पदाधिकारी तसेच सर्व सभासद महिला आघाडी व आदी मान्यवर उपस्तीत होते
Leave a Reply