शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध गुन्हा दाखल
सजग वेब टीम, जुन्नर
जुन्नर -शिरोली बुद्रुक (ता.जुन्नर) येथे महिला व बालविकास विभागाची मान्यता न घेता शिवऋण प्रतिष्ठान नावाने अनधिकृत संस्था सुरू केल्याच्या आरोपावरून संस्थाचालक अक्षय मोहन बोऱ्हाडे रा.शिरोली बुद्रुक ता.जुन्नर जि.पुणे याचे विरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय बोऱ्हाडे याने शिवऋण प्रतिष्ठान संस्थेत सात लहान मुले विना परवानगी ठेवली होती. पुणे येथील बालकल्याण समिती सदस्य अर्जुन लक्ष्मण दांगट यांनी याबाबत जुन्नर पोलिसांकडे मंगळवारी ता.29 रोजी सांयकाळी तक्रार दिली. त्यानुसार बालन्याय अधिनियम 2015 कलम 42 अन्वये बोऱ्हाडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनीं सांगितले.
दरम्यान एका गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात बोऱ्हाडेला आळेफाटा पोलिसांनी अटक केली. त्याच्या शिरोली बुद्रुक येथील मनोरुग्ण संगोपन केंद्रातील रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून जुन्नर पोलिसांनी २० डिसेंबर रोजी
येथील ५३ मनोरुग्ण हलविले यावेळी येथे लहान मुले असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांच्या कारवाई येथे कोणतीही परवानगी न घेता ही बालके संस्थेत ठेवली असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे ही कारवाई करण्यात असली असल्याचे नलवडे यांनी सांगितले.
Leave a Reply