शिरूरमधील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात थांबावे – विजयसिंह नलावडे

शिरूरमधील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात थांबावे – विजयसिंह नलावडे

शिरूर |आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिरूर शहर व ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी गावकामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सोसायटी सचिव, कोतवाल व पोलीस पाटील यांनी पूर्णवेळ आपापल्या कार्य क्षेत्रात थांबून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याबाबत शिरूरच्या तहसीलदार श्रीमती लैला शेख यांनी दिनांक २७/०३/२०२० रोजी आदेश काढून सूचना दिल्या आहेत.गावातील मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल याचे तपासणी पथक तयार करून गावाबाहेरील लोकांची चौकशी करावी.

शासन स्तरावरून येणाऱ्या आदेशाची नागरिकांना माहिती द्यावी. कार्य क्षेत्रात पूर्ण वेळ थांबावे व विनापरवानगी कार्यक्षेत्र सोडू नये असे आदेश असताना सुद्धा ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सोसायटी सचिव या आदेशाचे पालन करताना दिसत नाही. या बाबत विचारणा केली असता, अनेक ग्रामसेवक व तलाठी यांना दोन – तीन गावे असल्यामुळं आम्ही तरी या आदेशाचे पालन कसे करणार.असे सांगण्यात येत आहे. तर तालुक्यातील अनेक अधिकारी गावाकडे फिरकलेच नाहीत. “ग्रामसेवक जर गावात थांबले नाहीत तर कारवाई केली जाईल.”असा ईशारा शिरूरचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी दिला आहे.

ग्रामीण भागात पुणे, मुंबई व इतर शहरातून आलेल्या नागरीकांची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे आवश्यकती दखल न घेतल्यास ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अश्या परिस्थितीत तहसीलदारांनी काढलेला आदेश हा कागदावरच आहे का? असा सवाल ग्रामीण भागातील नागरीकांकडून व्यक्त केला जात आहे. तर या घटनेची दखल घेत प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat