शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांचे प्रयत्न
शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांचे प्रयत्न
सजग वेब टिम, महाराष्ट्र
नवी दिल्ली | शिरुर लोकसभा मतदारसंघातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी खा.डॉ अमोल कोल्हे यांनी रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली व वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय योजना सुचविल्या. पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने त्वरीत डीपीआर कन्सल्टंटची नेमणूक करून रस्ता रुंदीकरणाविषयीचे निवेदन कोल्हे यांनी दिले.
पुणे-नगर महामार्गावरील वाघोली , शिक्रापूर , रांजणगाव या परिसरात रस्ता वाहतूक कोंडीची समस्या रस्ता रुंदीकरणामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. सोबतच त्यांनी पुणे-नाशिक महामार्गाच्या संदर्भात नाशिक फाटा ते चांडोली या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याविषयी गडकरींशी चर्चा केली. चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकण आणि एमआयडीसी चौक या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली.
नितीन गडकरी यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती खा.कोल्हे यांनी आज त्यांच्या फेसबुक पेजवरून पोस्टद्वारे दिली आहे.
Leave a Reply