शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प दिल्ली सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प

सजग वेब टिम, स्वप्नील ढवळे

दिल्ली| दिल्ली सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे विविध शासकीय शाळांमध्ये राबविण्यात येत असलेला सौर ऊर्जेचा प्रकल्प. प्रत्येक शाळेच्या इमारतीच्या टेरेस वर सोलर पॅनेल्स बसवून त्यामार्फत ऊर्जा निर्मिती करून शाळांमध्ये विजेचे बील शून्यावर आणण्याचा या प्रकल्पामागील हेतू आहे.

सध्या हा प्रकल्प एका शाळेत यशस्वीपणे राबविण्यात दिल्ली सरकारला यश आले आहे. या शाळेतील वीजबिल ३५हजार रुपयांवरून शून्यावर आले आहे तसेच अधिकची वीजही उत्पादित होत आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सरकारने याआधी २१ शाळांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून आणखी १०० शाळांमध्ये सध्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.

एकूण ५०० शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा दिल्ली सरकारचा मानस आहे. शिक्षण मंत्री सिसोदिया यांनी हा प्रकल्प म्हणजे ऊर्जेच्या विषयी दिल्ली ला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी चा महत्वाचं पाऊल आहे अस म्हंटल आहे. यासंबंधीच ट्विट ही त्यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून केलं आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat