शंभुराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले पुरंदर ते वढू तुळापूर पायी पालखी सोहळा
सजग वेब टीम
कोरेगाव भीमा | धर्मवीर श्री शंभुराजांचा कार्याचा प्रचार , प्रसार करण्यासाठी व हजारो शिवशंभुभक्तांना ३ दिवस एक छताखाली एकत्र करण्यासाठी पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष पै संदीप आप्पा भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील ४ वर्षांपासुन शंभुराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी शंभुराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर ते समाधी स्थळ श्री क्षेत्र वढु तुळापुर असा ३ दिवसाचा व ८० किलो मिटर अंतराचा पायी पालखी सोहळा आयोजित केला जातो.
या वर्षी ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान पालखी सोहळा आयोजित होणार आहे .. या पालखी सोहळ्यात हजारो शंभुभक्तांना सहभागी करुन घेण्यासाठी व पालखी सोहळ्याची माहीती जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हवेली , शिरुर , खेड , दौंड व पुरंदर तालुक्यातील २५० गावांमध्ये संपर्क केला जाणार आहे तसेच प्रत्येक गावामध्ये छ.संभाजी म.पा.सो च्या नावाने व्हाटसअप ग्रुप स्थापण्यात येणार आहे . त्या व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून शिवशंभुची व पालखी सोहळ्याची माहीती संयोजकांच्या माध्यमातून शंभू भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येणार आहे.
आपल्या राजांबद्दलची आस्था टिकवण्यासाठी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या शंभू भक्तांनी ९९२१६६५५५५ या मोबाईल नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष पै संदीप आप्पा भोंडवे यांनी केले आहे.
Leave a Reply