‘वी वॉण्ट इट बॅक’ प्रदर्शनाचे नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

‘वी वॉण्ट इट बॅक’ प्रदर्शनाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सजग वेब टीम

मुंबई | भारतातील ऐतिहासिक अनेक गोष्टी परराष्ट्राच्या ताब्यात आहेत. त्या पुन्हा सन्मानाने भारतात परत आणण्यासाठी कलेच्या माध्यमातून चळवळ उभारण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून नेहरू तारांगण येथील ‘आर्ट गॅलरीत’ ‘वी वॉण्ट इट बॅक’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी झाले. आर्टिस्ट सुमित पाटील यांनी ही चळवळ उभी करण्याचा निर्धार केला आहे.

आपल्या भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे. जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध, स्वाभिमानाने जगायला शिकवत स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सत्याची ताकद जगाला दाखविणारे महात्मा गांधी, भारताला राज्य घटना देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांची आपल्या देशाला परंपरा आहे. या महापुरुषांशी संबंधित काही महत्त्वाच्या वस्तू परदेशात आहेत. तो आपला स्वाभिमान आहे. त्या परत मिळविण्यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून सुमित पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

ज्या मौल्यवान वस्तू परदेशात आहेत, त्याची चित्रे आणि शिल्प प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. अशा प्रकारचे प्रदर्शन वेगवेळय़ा ठिकाणी उभारण्याचा आपला संकल्प असल्याचे पाटील यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्या सोबत सौ. ऋतुजा नितेश राणे, कु. निमिष नितेश राणे आणि स्वाभिमान पक्षाचे मुंबई अध्यक्ष राजेश हाटले उपस्थित होते. आपल्या देशाचा ऐतिहासिक ठेवा परत आणण्यासाठी सुमित पाटील यांनी जे प्रयत्न सुरू केले आहेत, ते अत्यंत स्तुत्य आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना नक्कीच यश येईल, असे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat