विशाल महाराज गडगे यांना संत सावता महाराज जीवन-कार्यगौरव पुरस्कार प्रदान

विशाल महाराज गडगे यांना संत सावता महाराज जीवन-कार्यगौरव पुरस्कार प्रदान

सजग वेब टिम

आळेफाटा | श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य आयोजित श्री संत सावता महाराज जीवनगौरव पुरस्कार सोहळा नुकताच संत सावता महाराज जन्मभूमी श्री क्षेत्र अरण येथे पार पडला. यावेळी आळेफाटा (ता.जुन्नर) येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल महाराज गडगे यांना सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल संत सावता महाराज जीवन-कार्यगौरव पुरस्कार आद्य संत श्री सावता महाराज यांचे वंशज हभप. रमेश महाराज वसेकर, रविकांत महाराज वसेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रभुषण लोकनेते सचिनभाऊ गुलदगड, राज्यसचिव सुनिलभाऊ गुलदगड, चित्रपट दिग्दर्शक घनश्याम येडे, विभागीय अध्यक्ष जितेंद्र महाजन, सातारा जिल्हा अध्यक्ष अजिंक्य फुले, सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय दुधाळ सर, माढा तालुकाध्यक्ष विठ्ठल सातव, संत सावता माळी सेवाभावी न्यास श्री क्षेत्र अरण अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष बंडोपत घाडगे आदि उपस्थित होते.
विशाल महाराज गडगे यांनी संत सावता महाराजांचे जीवनकार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सावता सागर प्रेमाचे आगर हा ग्रंथ प्रकाशित करुन प्रवचने, व्याख्यांनाच्या माध्यमातून जनजागृती केली तसेच त्यांनी जुन्नर तालुक्यात समाज संघटित करुन विविध समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना हा संत सावता महाराज जीवन कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat