विरोबा परिवाराने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे – अभिनेत्री प्राजक्ता माळी

विरोबा परिवाराने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे – अभिनेत्री प्राजक्ता माळी

विरोबा पतसंस्था पुरवत असलेल्या एवढ्या सुविधा कदाचित बँकाही पुरवत नसतील – अभिनेत्री प्राजक्ता माळी

सभासदाचा १० लाख रुपयांचा अपघात विमा काढणारी विरोबा एकमेव संस्था – बाळासाहेब पाटे

विरोबा परिवाराने २५ वर्षापुर्वी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला – आशाताई बुचके

बॅंकांनी विश्वास गमावला असताना विरोबा पतसंस्था विश्वास संपादन करुन उत्कृष्ट काम करत आहे – आशाताई बुचके

सजग वेब टिम, जुन्नर

खोडद | श्री.विरोबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव या पतसंस्थेच्या मार्केटयार्ड शाखा उद्घाटन सोहळा प.पु.अनंतघोष मौनीबाबाजी यांच्या हस्ते व खोडद शाखेचा उद्घाटन सोहळा बी.के.संगीता बहेनजी यांच्या शुभहस्ते व अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी जि.प.सदस्या आशाताई बुचके, संतोषनाना खैरे, पं.स.सदस्य जिवन शिंदे, पं.स.सदस्य अर्चनाताई माळवदकर, भास्कर डोके, राजश्रीताई बोरकर, गुलाब नेहरकर, एपीआय अर्जुन घोडे पाटील, बिरोबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, यांसह संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, सभासद व खोडदचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानिमित्तानं लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या कार्य दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आशाताई बुचके म्हणाल्या की, विरोबा परिवाराने २५ वर्षापुर्वी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असुन संस्थ‍ेच्या वाढीसाठी सर्वांनी सहकार्य केले यापुढेही आपल्याला संस्थेला वाढवायचं आहे असे सांगत बॅंकांनी विश्वास गमावला असताना विरोबा पतसंस्था विश्वास संपादन करुन उत्कृष्ट काम करत आहे असे सांगत संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यानिमित्तानं बोलताना विशेष उपस्थिती असलेल्या प्राजक्ता माळी यांनी विरोबा परिवाराने ग्राहकांना विश्वास संपादन केला असुन विरोबा पतसंस्था पुरवत असलेल्या सुविधा कदाचित बॅंकाही पुरवत नसतील अशा शब्दात विरोबा परिवाराचे कौतुक करत सरपंच योगेश पाटे यांनी जाहिर झालेल्या पर्यावरण संरक्षण पुरस्कारबद्दल कौतुक केले.

यावेळी अंबिका पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाब नेहरकर, जि.प.सदस्या आशाताई बुचके, बी.के.संगीता बहेनजी यांनी विरोबा पतसंस्थेच्या कार्याचे कौतुक करत वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक संचालक राजेंद्र बोरा यांनी करत पतसंस्थेची आर्थिक वाटचालीची माहिती सांगत, ही गोरगरिबांची संस्था असुन सर्वसामान्य ग्राहकांचे हित जोपासण्याचं काम विरोबा परिवार करत असल्याचं सांगितलं.

संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटे यांनी आभार व्यक्त करत सभासदांसाठी सर्वाेतरी प्रयत्नशील असणारी संस्था असुन प्रत्येक सभासदाचा १० लाख रुपयांचा अपघात विमा काढणारी एकमेव संस्था असल्याचे सांगत या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर अौटी यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटे यांनी मानले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat