विघ्नहर सहकारी निवडणूक; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची मुदत
विघ्नहर सहकारी निवडणूक; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची मुदत
शेरकर विरुद्ध शेरकर सामना रंगणार का ?
सजग वेब टिम, जुन्नर
नारायणगाव | श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगावच्या संचालक मंडळाचा २०२१ ते २०२५ या पंचवार्षिक कालावधीतील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदान ०९ फेब्रुवारीला होणार आहे तर निवडणूक निकाल १० फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
या पंचवार्षिक निवडणुकीचा उमेदवारी दाखल करण्याचा दिनांक ६ जानेवारी ते १० जानेवारी कालावधी आहे. तर उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. होणार आहे. तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा कालावधी दिनांक १४ ते २८ जानेवारी या कालावधीत सकाळी ११:३० ते दुपारी ०३.०० पर्यंत आहे.
दिनांक २९ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटपाचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११.०० वा. होणार आहे.
निवडणुक बिनविरोध न झाल्यास अर्जांची संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार अाहे. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी दुसर्याचं दिवशी सकाळी ०९.०० वा मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहिर केला जाणार आहे.
या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन स्नेहा जोशी या काम पाहणार आहेत.
अनेकदा बिनविरोध झालेल्या श्री.विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यावेळी मात्र विद्यमान चेअरमन सत्यशील शेरकर विरुद्ध नंदुशेठ शेरकर असा काका – पुतण्याचा सामना रंगणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
Leave a Reply