वारूळवाडीत आनंदवाडी या ठिकाणी जमिनीच्या वादावरुन चुलत भावाचा खून

वारूळवाडीत आनंदवाडी या ठिकाणी जमिनीच्या वादावरुन चुलत भावाचा खून

कुर्‍हाडीने वार करत खून करुन आरोपी फरार

नारायणगाव | वारूळवाडी (आनंदवाडी) या ठिकाणी जमिनीच्या विषयावरून सख्ख्या चुलत भावाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना दि ९ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. महेश धनराज भुजबळ वय २३ ,धंदा- शिक्षण असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून घटनेनंतर आरोपी अमोल उर्फ पामर बाळकृष्ण भुजबळ हा फरार झाला आहे.

सदर घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना व सहाय्यक पोलिस निरिक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याची माहिती सपोनि अर्जुन घोडे पाटील यांनी दिली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की, अमोल बाळकृष्ण भुजबळ वय अंदाजे ३० धंदा शेती असे खून करून फरार झालेल्या आरोपीचे नाव असून स्थानिक पातळीवरुन मिळालेल्या माहितीनुसार महेश भुजबळ व अमोल भुजबळ हे दोघे सख्खे चुलत भाऊ असून महेश हा कुरण येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता धनराज भुजबळ व बाळासाहेब भुजबळ हे दोघे सख्खे भाऊ आहेत नारायणगाव गव्हाळी मळा येथील जमिनीत लावण्यात आलेल्या खांबाबाबत काहीतरी विषय होता त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

धनराज भुजबळ हे मुंबई या ठिकाणी नोकरीतून निवृत्त झाले होते ते त्यांची मुलगी व त्यांची पत्नी मुंबईत वास्तव्यास आहेत तर महेश हा शिक्षण घेण्यासाठी गावी होता लॉकडाउन असल्यामुळे हे संपूर्ण कुटुंब गावी कुसुर या ठिकाणी मामाच्या येथे थांबले होते. आज दि ९ रोजी आरोपी अमोल भुजबळ हा चुलते धनराज भुजबळ यांना ते आनंदवाडी या ठिकाणी राहत असलेल्या घरी वसंत भुजबळ यांनी जमिनीत लावलेल्या खांबासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेला असता धनराज भुजबळ यांनी शेतात लावलेल्या खांबाबाबत मी वसंत यांच्या मोठ्या भावाबरोबर बोललो आहे असे सांगितले यावरून अमोल व धनराज यांच्या मध्ये शाब्दिक चक मक झाली आता याबाबत मीच निर्णय घेतो असे बोलून अमोल निघून गेला त्यानंतर धनराज हे आतल्या खोलीत त्यांचे काम करीत होते तर त्यांचा मुलगा महेश हा हॉलमध्ये टीव्ही पाहत बसला होता तेवढ्यात मोठ्याने आवाज आल्याने धनराज बाहेर आले त्यावेळी अमोलने महेशच्या मानेवर दोन्ही बाजूला कुर्‍हाडीने सपासप वार केले होते व तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर अमोल याने धनराज यांच्यावर सुद्धा हल्ला करणार होता मात्र सुदैवाने ते बचावले.

सदर घटनेचा पुढील तपास पोलिस अधिक्षक संदिप पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अर्जुन घोडे पाटील हे करत आहे.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat