राहत्या घरात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
sajagtimes2019-05-08T15:10:32+00:00
सजग वेब टीम, जुन्नर (सुधाकर सैद)
बेल्हे | बेल्हे-मंगरुळ रस्त्यावर असणाऱ्या मटाले मळ्यात राहणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार रोजी दुपारी घडली. किसन (बाळू) बळवंता मटाले (वय ४५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की सोमवारी दुपारी मटाले मळ्यात राहणारे किसन मटाले आपल्या घरी आल्यानंतर घरी फक्त लहान मुले होती व पत्नी शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतावर कामाला गेली असताना घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा बंद करुन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. अशी खबर संतोष मटाले यांनी पोलीसांना दिली, पोलीसांनी मृतदेह आळे येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीष डवले हे करीत आहेत. किसन मटाले यांच्या पश्चात आई, पत्नी ,दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. शांत व सुस्वभावी असणाऱ्या किसन मटाले यांच्या अकस्मात केलेल्या आत्महत्येने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Leave a Reply